थत्तेंच्या गगनभेदी थापा : पत्रकार हेमंत जोशी
साधारणतः १९९९ पासून म्हणजे मनोहर जोशी मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताच अनिल थत्ते पत्रकार म्हणून आणि त्यांचे गगनभेदी हे पाक्षिक वृत्तपत्र सृष्टीतून जवळपास संपुष्टात आलेले थोडक्यात सतत २० वर्षे अनिल थत्ते लिखाणात बोलण्यात फारसे कुठेही नव्हते म्हणजे ते गगनभेदी गप्पांच्या मोठमोठ्या जाहिराती अनेक दैनिकातून करायचे पण त्या जाहिरातीच असतात किंवा असायच्या त्यांचे प्रत्यक्ष कार्यक्रम असे फारसे कुठे नक्की झालेले नाहीत, मी सांगतो ते खोटे असेल तर त्यांनी तसे पुरावे द्यावेत मिंयेथे ते सादर करिन, त्यांना जवळून ओळखणाऱ्या किंवा बघणार्यांना त्यांच्या या अशा थापांची सवय झाली आहे, मनोरंजन म्हणून आम्ही त्याकडे बघतो. अशातच थत्ते पुन्हा एकदा पावसाळ्यातल्या मश्रुमसारखे उगवलेले दिसताहेत त्यांना मश्रुमची उपमा यासाठी कि पावसाळा संपला कि जसे शेणखतावर किंवा घाणीच्या ठिकाणी उगवलेले मश्रुम गायब होतात, मला खात्री आहे पुढल्या काही महिन्यात फारतर एखाद्या दोन वर्षात शंभर टक्के अनिल थत्ते यांचा पावसाळ्यात उगवणारा मश्रुम होणार आहे, त्यांचे आजचे अनेक वर्षानंतर हे असे अचानक उगवणे सेम टु सेम मश्रुम सारखे असल्याने त्यांच्या याही वेळेच्या बोलण्याला आणि पत्रकारितेला उदंड आयुष्य नक्की लाभणारे नाही कारण थापा मारणारी पत्रकारिता फारतर नवख्या वाचकांना काही काळ नक्की गुंतवून ठेवू शकते पण एकदा का नवख्यांना देखील थापा मारणे लक्षात आले कि ते अशा पत्रकारितेकडे पाठ फिरविणे पसंत करतात. अनिल थत्ते यांचा प्रत्येक व्हिडीओ मी बारकाईने वाचतो बघतो आहे प्रत्येक व्हिडीओ मध्ये ते अधिक वेळ टाइम पास करतांना आणि नंतर केव्हातरी गप्पांच्या ओघात एखादा मुद्दा तोही तद्दन खोट्या पद्धतीने मांडतांना दिसतात, विशेषतः त्यांनी अनेक मुद्दे ज्यांना बेस आहे ते तर मी आदल्या दिवशी जे लिहितो त्यावरूनचप्रामुख्याने उचलले दिसतात. स्वतः बोलण्यातून अधिक टाइम पास थत्ते करतांना हमखास दिसतात आणि इतरांना मात्र ते त्याच मुद्द्यांवर टॉन्टिंग करतांना दिसतात….
थापाडे थत्ते यांच्या बोलण्यातून प्रामुख्याने पत्रकार भाऊ तोरसेकर यांना टॉन्टिंग असते आणि केवळ भीती पोटी त्यांनी संजय राऊत यांची तारीफ केलेली आढळते. अनिल थत्ते हे काही या राज्यातल्या लोकांचे मतपरिवर्तन करण्याची ताकद ठेवणारे कधीही पत्रकार नव्हते ज्याची बाळासाहेब ठाकरे यांना भीती वाटली आणि त्या भीतीपोटी बाळासाहेबांनी थत्ते यांचे पाक्षिक गगनभेदी बंद केले. म्हणजे हि देखील लोणकढी थाप कि त्यांचा गगनभेदी थेट बाळासाहेब ठाकरे यांनी बंद केला, अजिबात अजिबात तसे घडलेले नाही, वृत्तपत्राला आणि त्याच्या मालकाला दमदाटी करण्याचा प्रयोग बाळासाहेबांनी केवळ महानगर आणि निखिल वागले यांच्यावर करून बघितला जो प्रयोग पुढे बाळासाहेबांच्याच अंगलट आला, बाळासाहेबांचे त्यात नुकसान झाले आणि उगाचच उथळ निखिल वागले यांचे महत्व त्यांनी वाढवून ठेवले. वाचक मित्रांनो, आत्ता याक्षणी लिहून घ्या कि अनिल थत्ते यांची पत्रकारितेतली दुकानदारी त्यांचे विनाकारण वाढवून ठेवलेले महत्व त्यांचे गगनभेदी पाक्षिक त्यांची वादग्रस्त राजकीय ढवळाढवळ विशेषतः त्यांचे सतत लोणकढ्या थापा मारण्याची सवय या सार्या दुर्गुणांना जर चाप ओढला बसवला असेल म्हणजे त्यांचे हे नाही ते उद्योग बंद केले असतील तर ते फक्त आणि फक्त भाऊ तोरसेकर आणि संजय राऊत या दोघांनी. या वीस वर्षात आपल्या पुन्हा आड राऊत यांनी येऊ नये केवळ या भीतीपोटी अनिल थत्ते यांनी अनेकदा संजय राऊत यांची तशी अजिबात इच्छा नसतांनाही भेट घेतली, मधुर संबंध जोपासण्याचा मोठा प्रयत्न केला आणि यापुढे संजय राऊत पूर्वीची ती खतरनाक वेळ पुन्हा आपल्यावर आणणार नाहीत याची खात्री पटल्यावर अलीकडे पुन्हा पूर्वीचे वायफळ यावेळी लिहिणे नाही तर बोलणे सुरु केले आहे. मात्र अनिल थत्ते हे विसरलेले दिसतात कि तोरसेकर अद्याप पत्रकारितेतून निवृत्त झालेले नाहीत म्हणजे जेव्हा केव्हा थत्ते यांच्या वागण्याचा अतिरेक होईल, भाऊ त्यांना क्षणार्धात सरळ करून मोकळे होतील…
अमुक एखादा माणूस जवळ बाळगण्याने आपले फायदे होतात किंवा नुकसान होते. पुण्यात एक सुप्रसिद्ध तारांकित हॉटेल आहे सयाजी नावाचे. या हॉटेलचे मालक पुण्यात राहायला नाहीत ते वेगळ्या शहरात राहतात पण गेली अनेक वर्षे हे खूप चालणारे हॉटेलचे सरव्यवस्थापक पराग साळुंखे आहेत आणि पराग यांच्या बुद्धिमत्तेतून कल्पकतेतून सयाजी हॉटेल अत्यंत चांगल्या पद्धतीने अगदी कोरोना महामारीत देखील चांगले चाललेले आहे. वास्तविक सयाजी तसे पुण्यात आड वळणाला म्हणजे पुणे बंगलोर महामार्गावर तरीही खाणारे आणि राहणारे तेथे गर्दी करतात आणि त्याचे श्रेय आमचे आवडते मित्र पराग साळुंखे यांनाच जाते. खाण्या पिण्याची चंगळ आणि स्वच्छ रूम्स त्याभरंवशार साळुंखे प्रचंड सभोवताली स्पर्धा असतांना देखील बाजी मारून मोकळे होतात. पराग साळुंखे यांना सतत डोक्यात हेच असते कि सयाजी हॉटेलचे आणखी आणखी भले कसे करावे. माझे आणखी एक मित्र आहेत माजी शिक्षण मंत्री अमरीश पटेल, याच पटेल यांची एकेकाळी मुंबईत सांताक्रूझ व अंधेरीला मारोती कार्सची फार मोठी डीलरशिप होती पण त्यांच्या एका व्यवस्थापकाने असे काही घोटाळे करून ठेवले कि पुढे पटेल यांना हि डीलरशिप सोडावी लागली फार मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. ज्या व्यक्तीवर पटेल कुटुंबाचा मोठा विश्वास होता त्यानेच त्यांना लूट लूट लुटले लुबाडले अर्थात याच पटेलांच्या बाबतीत आमदार कपिल पाटील यांनी देखील पत्रकारितेच्या माध्यमातून फारसे काही वेगळे केले नाही त्यांनी देखील लुटले लुबाडले आहे. थोडक्यात अमुक एखादा जवळ केलेला माणूस एकतर तुम्हाला मोठा करतॊ किंवा एकतर तुम्हाला बरबाद करून सोडतो, पत्रकार अनिल थत्ते त्यांची पत्रकारिता बंद पडल्यानंतर ते नेमके काय करीत होते म्हणजे त्यांनी अनेकांना उभे केले कि जीवनातून उठवले त्यावर देखील काही किस्से मी लिहिण्याच्या ओघात तुम्हाला सांगणार आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे त्यांचे तद्दन थापाडे या दिवसातले व्हिडीओज, त्यातली माहिती नेमकी कशी खोटी तेही मला पुरावे सादर करून तुम्हाला नक्की सांगायचे आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी