फाल्तुक फंडे भगिनी मुंडे : पत्रकार हेमंत जोशी
अनेक स्त्रिया किंवा पुरुष सोशल मीडियावर स्वतःचे वेगवेगळ्या अँगल्स मधून विविध पेहराव करून आणि स्त्रिया मुली तरुणी अगदी वेळात वेळ काढून नटून नटून आपले वेगवेगळे फोटो नित्यनियमाने टाकतात, मला जे दिसले, मी अनेकांशी बोलून जे निष्कर्ष काढले त्यावरून माझ्या असे लक्षात येते कि ज्यांचे वैवाहिक आयुष्य विस्कळीत असते किंवा उध्वस्त झालेले असते किंवा ज्या विशेषतः स्त्रिया नवऱ्यापासून दुख्खी किंवा दूर असतात अशांना हे असे रोजच्या रोज आपले फोटोज अपलोड करतांना विशेष समाधान मिळते, फोटो टाकणाऱ्या स्त्रियांच्या आणि पुरुषांचाही मनात हेच असते कि तू छान दिसते दिसतो असे म्हणणारा नवरा किंवा बायको नाही निदान बाहेरच्यांना तरी आपल्याला छान म्हणावे सुंदर म्हणावे हे एवढेच त्यांच्या मनात असते, अर्थात फिती टाकणाऱ्या बहुतेक पुरुषांचा कल मात्र विकृतीकडे असतो, घरच्या बाईला फसवून बाहेरच्या बायका कशा गटवल्या जातील हेच त्यांच्या मनात असते त्यातून आम्ही पुरुष तद्दन खोटी माहिती आणि ट्रीक फोटोज अपलोड करून इतर बायकांना जाळ्यात ओढण्याचा सतत प्रयत्न करीत असतो, माझ्या ओळखीच्या एका अगदीच जेमतेम उत्पन्न असलेल्या पुरुषाला त्यात यश आले देखील म्हणजे पहिली बायको गेल्यानंतर या दोन तीन मुलांच्या अगदीच क्षुल्लक आर्थिक स्रोत असलेल्या पुरुषाने सोशल मीडियाच्या माध्यमातून गावात बसून मुंबईतली देखणी व श्रीमंत महिला गटवली पटवली आणि तिच्याशी लग्न करून आता हा तिच्या पैशांवर आणि शरीरावर तुटून पडतो आहे, त्या महिलेला मात्र हात चोळत बसण्यापलीकडे हाती काहीही उरलेले नाही त्यातून तिला नैराश्य आलेले आहे. म्हणून मी माझ्या वीस लाखाहून अधिक असलेल्या वाचकांना सोशल मीडियावर कायम सावध असावे राहावे असे आव्हान करीत असतो. जेवढे फोटो मध्ये नियमित स्वतःला मिरवून आणणारे स्त्रिया किंवा पुरुष देखणे किंवा श्रीमंत वाटतात प्रत्यक्षात ते तसे अजिबात नसतात केवळ अपवादात्मक तसे असू शकते एवढेच. सोशल मीडियावरून श्रीमंत पुरुषांना आधी आकर्षित करून नंतर त्यांना आर्थिक प्रचंड लुटणाऱ्या बदमाश बायकांविषयी अगदी अलीकडे मी माझ्या सुभाष नावाच्या व्यापारी मित्राचा सत्य किस्सा लिहून ते सिद्ध देखील केले आहे. विशेषतः कोरोना महामारीतून निर्माण झालेली प्रचंड आर्थिक अडचण त्यातून हे असे फसविणे सर्हास सुरु झालेले आहे म्हणून स्त्रिया आणि चावट पुरुषांनी सोशल मीडियावर अत्यंत सावध असणे राहणे जरुरी आहे. मला वाटते हे असले विकृत व रिकामटेकडे धंदे करीत बसण्यापेक्षा सोशल मीडियाचा आपल्या व्यवसायासाठी प्रोफेशन साठी प्रत्येकाने उपयोग करून घ्यावा ते अधिक योग्य ठरेल, जे मी स्वतः केले आणि अनुभवले म्हणजे अलीकडे काही वर्षात केवळ सोशल मीडिया उपलब्ध झाल्याने माझी जगभरतली वाचक संख्या खूप झपाट्याने वाढलेली आहे. इतरांनी देखील तेच करावे…
स्वतःवर स्वतःच्या हाताने ओढवून घेतलेल्या राजकीय अडचणी अशावेळी शांत राहण्याची भूमिका घेणे केव्हाही चांगले ठरू शकत असतांना खासदार प्रीतम आणि माजी आमदार पंकजा या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या दोन्ही मुलींनी अलीकडे काही वर्षात अगदीच उथळ राजकीय भूमिका घेऊन स्वतःचे फार मोठे राजकीय नुकसान करवून घेतलेले आहे असे माझे ठाम मत आहे. दुसरीच्या मिठीत रेड हॅन्ड पकडल्या गेल्यानंतर चतुर लबाड नवरा जसा चिडलेल्या बायकोसमोर काही काळ शांत असतो शांत बसतो हि अशीच भूमिका राजकारणात देखील घ्यायची असते विशेषतः तिकडे नरेंद्र आणि इकडे देवेंद्र यांचे प्रत्येक नेत्यावर अतिशय बारीक नजर व लक्ष असते, देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी यांचे या राज्यातले सर्वाधिक जवळचे आणि असे राखीव खेळाडू आहेत कि जेव्हा मोदी यांना तसे वाटेल तेव्हा हेच फडणवीस देशाच्या सर्वाधिक महत्वाच्या हुद्द्यावर किंवा पदावर असतील. आणखी एक गौप्यस्फोट करतो कि केंद्रात जे सहकार खाते नव्याने अमलात आणल्या गेले आहे ते नेमके कसे असावे त्यावर सर्वाधिक महत्वाची मते देवेंद्र फडणवीस यांचीच नोंदल्या गेलेली आहेत आणि हे सहकार खाते राज्यातल्या सहकार सम्राटांना मोस्ट धोकादायक कसे त्यावर मी नक्की लिहिणार आहे तर कोण कुठे नेमके गंभीर चुका करते आहे मोदी शाह आणि फडणवीस यांच्याकडे अगदी अतिशय बारीकसारीक माहिती असते आणि अशा चुकांचा म्हणजे कधी एखाद्या नेत्याला भ्रष्टाचाराचा तर एखाद्या नेत्याला नशा करण्याचा तर एखाद्या नेत्याला त्याच्या प्रेम प्रकरणांचा जाब विचारल्या जातो तेव्हा उलट उत्तरे या तिघांसमोर देत बसण्यापेक्षा अशा नेत्यांनी शांत बसण्याची जर भूमिका घेतली तर त्याचा एकनाथ खडसे होत नाही त्यांना पुढे आपोआप पुन्हा मोठी संधी दिल्या जाते अशांचा शांत बसण्याने चंद्रशेखर बावनकुळे विनोद तावडे प्रकाश जावडेकर होतो, अशांचे पुन्हा पक्ष मग कोणताही असो राजकीय पुनर्वसन नक्की केल्या जाते. शिवसेनेत जायचे शंभर टक्के ठरले होते पण मिलिंद नार्वेकर यांनी काम बिघडवून ठेवले आणि छगन भुजबळ पुन्हा राष्ट्रवादीतच स्थिरावले पण शांत बसले त्यामुळे तुरुंगात जाऊन देखील शरद पवारांनी त्यांच्या खतरनाक भूमिकेला जागून तुरुंगातल्या या आरोपीला बदनामीची तमा न बाळगता महाआघाडी मध्ये मंत्रिपद देऊन एक वेगळाच आदर्श या राज्याला घालून दिला. थोडक्यात जेव्हा केव्हा आपण विविध भानगडीतुन श्रेष्ठींच्या नजरेत रेडहॅण्ड पकडले जात असतो तेव्हा बंड करण्याच्या भानगडीत पडून स्वतःचे मोठे राजकीय नुकसान करवून घ्यायचे नसते पण हे मुंडे भगिनींच्या लक्षात आले नाही तिकडे हिना गावित बघा कशा गप बसल्या आहेत तशीच भूमिका जर अगदी सुरुवातीपासून मुंडे भगिनींनी विशेषतः मोठ्या पंकजा यांनी घेतली असती तर त्यांचा खोलात जाणारा पाय अधिक खोलात गेला नसता, अलीकडे त्यांनी नरेंद्र मोदी यांना भेटून नेमक्या व्यथा आणि कथा जेव्हा सांगितल्या तेव्हाही मोदी यांनी नेमके तेच सांगितले कि कमी बोला आणि शांत राहा वाट पहा पुन्हा काहीतरी चांगले घडेल, जेव्हा बावनकुळे यांना भाजपाने आमदारकीचे तिकीट नाकारले तेव्हा मी त्यांना नेमके हेच म्हणालो होतो कि शांत राहा आणि जोमाने कामाला लागा, नेमके नंतर तेच घडले, आज अख्या विदर्भात फडणवीस आणि गडकरी यांच्यानंतर सर्वाधिक लोकमान्य लोकप्रिय नेता म्हणून संयमी भूमिका घेणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेच बघितल्या जाते…
क्रमश: हेमंत जोशी