अशोक शंकरराव चव्हाण : अंतिम भाग : पत्रकार हेमंत जोशी
डॉ. भागवत कऱ्हाड म्हणाल तर मराठवाड्यातील भाजपाची वैचारिक ऍडजेस्टमेंट आहे आणि वंजारी समाजाला नेमक्या दिशेने पाऊल टाकण्यास मार्गदर्शन करणारे ते एक त्यांच्यातले बुजुर्ग आजोबा वयस्क वैचारिक नेते आणि आता केंद्रीय मंत्री आहेत पण केवळ भागवत कऱ्हाड भाजपाकडे असल्याने मराठवाड्यतील किंवा राज्यातील एकगठ्ठा वंजारी मते नक्की भाजपाला मिळणार नाहीत त्यासाठी मुंडे कुटुंबातल्या प्रभावी नेत्याची नक्की गरज असते आणि यापुढे तर मुंडे परिवातल्या पंकजा व प्रीतम या दोघींनाही नेमके किंवा विशेष स्थान द्यायचे नाही अशा थेट नरेंद्र मोदी यांच्या सूचना असल्याने या दोघींची जागा नेमकी कोणाला हा प्रश्न तुम्हाला येथे नक्की पडला आहे आणि त्याचे उत्तर आहे, गेल्या दहा वर्षात ज्यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी घट्ट मैत्री आहे त्या धनंजय मुंडे यांच्याकडे पुढल्या काही महिन्यात भाजपा मराठवाड्याच्या आणि वंजारी समाजाच्या नेतृत्वाची मोठी जबाबदारी टाकून शंभर टक्के मोकळे होणार आहे, तसेही शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीनंतर राष्ट्रवादीला फारसे भविष्य व भवितव्य उरणार नसल्याचे धनंजय मुंडे यांच्या ते केव्हाच लक्षात आले आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे बारा वाजल्यानंतर इकडे तिकडे पक्ष हुडकत बसायचे चतुर धनंजय मुंडे यांना ते जमणारे नाही याउलट खूप आधीपासूनच जर भाजपात प्रवेश केला तर नेता म्हणून तेथे आपल्याला लवकरात लवकर एसट्याब्लिश होता येईल हे त्यांच्या लक्षात आणून देण्यात आले आहे शिवाय धनंजय यांची पवारांनी राजकीय अवस्था असून अडचण नसून खोळंबा पद्धतीची केव्हाच करून टाकलेली आहे, जेव्हा धनंजय यांनी शरद पवारांना बाजूला सारून अजितदादा यांच्या गालाचा नेता म्हणून प्रदीर्घ मुका घेतला होता त्यानंतर नेमके तेच घडले म्हणजे शरद पवार त्यांच्या स्वभावाला जागले म्हणजे त्यांनी धनंजय यांना सिंहाची भूमिका दिली खरी पण या सिंहाची आयाळ त्यांनी स्वतः भादरून ठेवली वरून त्याची नखे देखील कापून ठेवली त्यामुळे धनंजय मुंडे यांचे बिना महत्वाच्या खात्याचे मंत्रिपद म्हणजे आयाळ व नखे नसलेला सिंह. धनंजय मुंडे यांना शिवसेनेत जायचे नाही कारण शिवसेनेत त्यांच्या फडणवीस यांच्याप्रमाणे खूप जवळचे असे कोणी नाही महत्वाचे म्हणजे जरी आज नक्की ठरलेले नसले तरी आज ना उद्या भाजपामध्ये अजिबात स्थान न उरलेल्या स्थान नसलेल्या मुंडे भगिनी शिवसेनेत जातील जे अगदी उघड बोलले जाते त्यामुळे धनंजय यांचा शिवसेनेत प्रवेश करण्याचा दूर दूर पर्यंत प्रश्नच उरत नाही, राष्ट्रवादी आणि ते एकमेकांना कंटाळले आहेत या दोघांची अवस्था घटस्फोट घेण्यापूर्वीच्या जोडप्यासारखी स्वतः शरद पवारांनी केव्हाच करून ठेवलेली आहे म्हणजे राहायला एकाच घरात पण झोपायला वेगवेगळ्या पलंगावर किंवा हि शेजारच्या गण्याचा मुका घेते तर तो शेवंताबाईला घट्ट पकडून आहे पद्धतीची धनंजय यांची राष्ट्र्वादीतली आजची अवस्था आहे कारण शरद पवार यांच्या ते केव्हाच लक्षात आलेले आहे कि धनंजय हे माझेही नाहीत आणि आता तर अजितदादांच्या पण गटातले नाहीत त्यामुळे धनंजय यांचे ते नक्की ठरले असल्यानेच फडणवीस यांनी मुंडे भगिनीशी थेट पंगा घेऊन त्यांना भाजपातून नोव्हेअर केलेले आहे आणि धनंजय यांना केव्हाच खूप खूप जवळ घेऊन त्यांचे पटापट मुके घेणे सुरु केले आहे…
तुम्हाला म्हणून सांगतो माझा स्वभाव विचित्र आहे म्हणजे हातचे सोडून मी कायम पळत्याच्या मागे लागतो म्हणजे कारमध्ये शेजारी बसलेल्या मैत्रिणीचा मुका घ्यायचे सोडून शेजारच्या कारमध्ये डोकावून बघतो, कार मध्ये बसलेल्या बाईला विचित्र पद्धतीने डोळा मारतो, स्वतःच्या मैत्रिणीला घातलेला हाताचा विळखा झटकून पत्रकार विवेक भावसार च्या मैत्रिणीशी त्याचे लक्ष नाही बघून अघळ पघळ गप्पा मारायला सुरुवात करतो. आता येथेही नेमके तेच केले म्हणजे लिहायचे होते सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असलेल्या अशोक चव्हाण यांच्यावर आणि तुम्हाला गोष्ट सांगितली धनंजय मुंडे यांच्या भाजपा प्रवेशाची आणि मुंडे भगिनींच्या शिवसेना प्रवेशाची. निशिकांत देशपांडे याआधी गिरीश महाजन यांचे खाजगी सचिव होते आणि त्यांनी महाजन यांच्या नावाला व खात्याला नेमके चांगले वळण लावून दिले त्यातून गिरीश महाजन हे मंत्री म्हणून आधी गाजले नंतर नावाजले आणि मस्त भरमसाठ पैसेही कमावून मोकळे झाले, हेच धोरण निशिकांत देशपांडे यांनी अशोक चव्हाण यांच्याकडे का अद्याप राबविलेले नाही हे मला न उलगडलेले कोडे आहे म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याचा ज्या चांगल्या पद्धतीने नितीन गडकरी यांनी १९९५ ते २००० दरम्यान फायदा करवून घेऊन याच खात्याच्या भरवशावर आजतागायत स्वतःला उत्तम मंत्री म्हणून एस्टॅब्लिश केले, मला वाटते त्याचपद्धतीने अशोक चव्हाण यांनी देखील हे काहीसे लुटल्या लुबाडल्या गेलेले बदनाम खाते आधी रुळावर आणून त्यानंतर स्वतःला राज्याचे उत्तम व यशस्वी मंत्री म्हणून प्रोड्युस करणे गरजेचं आहे गरजेचं होते कदाचित अजूनही वेळ गेलेली नाही, अनुभवी उच्चशिक्षित अशोक चव्हाण यांनी केवळ आणि केवळ गडकरी पद्धतीने हे खाते अगदी उद्यापासून चालवावयास घ्यावे ज्यातून त्यांचे नाव होईल उत्तम कमाई होईल आणि गडकरी यांच्यानंतर पुन्हा एकदा राज्याच्या या अत्यंत महत्वाच्या खात्याला उर्जितावस्था प्राप्त होईल. मी येथे एकट्या अशोक चव्हाण यांना दोष देत नाही पण संपूर्ण राज्यात बांधकाम खात्याची अवस्था म्हणजे दिवसभरात अनेक येतात आणि चढून जातात पद्धतीच्या खंगलेल्या वेश्येसारखी करून ठेवलेली आहे आणि हि अवस्था अतुल चव्हाण यांच्यासारख्या जवळपास साऱ्याच अभियंत्यांनी करून ठेवलेली आहे. एकतर अर्थ खाते या खात्याला पुरेसे फंड्स देत नाही आणि जे फंड्स येतात ते अतुल चव्हाण यांच्यासारखे बदमाश अभियंते लुटून लुबाडून मोकळे होतात वरून हे असे नालायक अभियंते वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी एकाच शहरात ठाण मांडून बसलेले असतात. निशिकांत किंवा अशोकराव किंवा मनोज सौनिक यांच्यासारख्या अत्यंत तल्लख मंडळींनी बांधकाम खाते आधी पटकन झटक्यात रुळावर आणावे आणि पैसे नक्की साऱ्यांनी खावे पण नितीन गडकरी पद्धतीने म्हणजे पैसेही मिळतात आणि खात्याची देखील मोठी भरभराट होते. गडकरी यांची खाते चालविण्याची आणींपैसे मिळविण्याची पद्धत मला तोंडपाठ आहे मी चव्हाण यांना फुकाचा सल्ला द्यायला केव्हाही मोकळा आहे तयार आहे, पण हि सारी किमया गडकरी यांच्या हाताखाली काम केलेल्या आणि त्यांच्या अत्यंत आवडत्या सचिवांना म्हणजे श्रीमान देबडवार यांना तंतोतंत साधलेली आहे, खात्याची भरभराट नेमकी वेगाने व चांगली कशी करावी देबडवार यांना तोंडपाठ आहे त्यांनी त्यांच्या गावच्या अशोक चव्हाण यांना नेमके महत्व समजावून सांगावे आणि पटकन कामाला लागावे अन्यथा पुढल्या दोन तीन वर्षात राज्यातल्या बांधकाम खात्याची अवस्था एड्स झालेल्या रांडेसारखी शंभर टक्के होणार आहे हे माझे वाक्य आज येथे लिहून ठेवा. अशोकराव पुन्हा एकवार खूप मोठे होण्याची तुम्हाला चालून आलेली हि नामी संधी आहे, दवडू नका…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी