भाग २ : बापरे ! जे घडले तुमच्यासाठी जसेच्या तसे : पत्रकार हेमंत जोशी
उत्तम विचारांच्या सुंदर आचरणाच्या स्त्रियांना बिघडवण्यापेक्षा पैसे फेकायचे मजा मारायची आणि जणू काही बाहेर घडलेच नाही घडत नाही अशा चेहऱ्याने बायकोसमोर हजर राहणाऱ्या पुरुषांची मोठी संख्या आहे त्यामुळे वेश्यांचे अड्डे लेडीज बार कॉलगर्ल्स इत्यादी धंदे जगभर जागोजाग जोरात सुरु असतात हे मी तुम्हाला सांगणे म्हणजे तुला मोठ्यांदा हसायचे असेल तर अजित दादांचा फोटो आधार कार्डवर बघ हे पार्थला सांगण्यासारखे पण आता या धंद्यातही आधी फसवणूक त्यानंतर त्यातून लुबाडणूक असे सर्हास प्रकार टिंडर सारख्या त्या विविध अश्लील अँप्समुळे घडायला लागले आहेत आणि याच प्रकाराला माझा श्रीमंत उद्योगपती ७२ वर्षीय सुभाष नावाचा मित्र बळी पडला आहे नको ते कोर्ट आणि पोलिसांचे झेंगट त्याने आपल्या मागे लावून घेतले आहे पण माणूस हिम्मतवाला आहे तो देखील पोलिसांच्या आणि त्या फसवणाऱ्या बाईच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे कारण त्याचे तब्बल साडे दहा लाख रुपये किमतीचे घड्याळ तर तिने काढून घेतलेच आहे वरून ती त्याला आणखी पैसे मागते आहे. एक निर्णय मात्र सुभाषने अत्यंत चांगला घेतला त्याने पत्नी स्नुषा मुलगा आणि इतर कुटुंब सदस्यांना आधी विश्वासात घेतले नंतर ती बाई आणि त्याच्यात त्या टिंडर अँपमुळे नेमके काय व कसे घडत गेले विशेषतः या प्रकरणी ओशिवरा पोलिसांची भूमिका कशी संशयास्पद होती हे सविस्तर घरी सांगितले अर्थात त्याच्या कुटुंब सदस्यांना त्याचा हा शौकीन स्वभाव नेमका माहित असल्याने त्यांना सुभाषचे हे प्रकरण अजिबात शॉकिंग नव्हते त्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला, तुम्ही रस्त्यावर उतरून लढायला हवे कुटुंबाने त्याला हिम्मत दिली आणि या वयातही निधड्या सुभाष झालेल्या फसवणुकीतून न्याय मिळविण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे. पोलीस आणि असे बदमाश स्त्री व पुरुष संगनमताने श्रीमंत माणसांना विविध सोशल माध्यमातून गाठून लुटणे लुबाडणे विशेषतः या महामारीत मोठ्या प्रमाणावर घडते आहे त्यात जो फसला आहे फसविल्या गेला आहे त्याची बाजू व्यवस्थित ऐकून घेऊन त्याला किंवा तिला न्याय मिळवून देण्यापेक्षा उलट ज्यांच्यावर अन्याय झाला आहे ज्यांची फसवणूक झाली आहे अशानाच आणखी लुटत राहणे योग्य नाही, अशी मोठ्या प्रमाणावर असलेली प्रकरणे तोडपाण्यासाठी केवळ पोलिसांपर्यंत येऊन थांबतात आणि संपतात चुकून जर एखादा सुभाष सारखा खमक्या निघाला तर प्रकरण न्यायालयात जाते जेथे न्यायाधीशांच्या नेमके बदमाश कोण नक्की पक्षात येते…
आपल्याकडे बाई प्रकरणात अडकला कि आधीच कुटुंबाच्या किंवा कुटुंबातल्या बदनामीच्या भीतीने अर्धमेला होतो नेमके हेच यात फसविणाऱ्यांना फावते आणि ते अशा फसल्या गेलेल्या मंडळींना पुढे कित्येक वर्षे लुटून लुबाडून मोकळे होतात. हल्ली हल्ली आपण थोडे सावध झालेलो आहोत पण आपल्या घरातल्या तरण्या स्त्रियांना विविध आमिषे दाखवून त्यांना मोठ्या खुबीने कॉल गर्ल व्यवसायात ओढले जाते. आपली मुलगी आपल्या घरातली तरणी स्त्री कुठे जाते काय करते कोणाशी बोलते त्याकडे विशेषतः या महामारीत अधिक लक्ष घालणे अत्यंत आवश्यक आहे कारण बहुतेक कुटुंबे आर्थिक डबघाईला आलेली असल्याने ज्याला त्याला पैसे हवे आहेत नेमके हेच हेरून तुमच्या आमच्या घरातल्या तरण्या बायकांना बिघडवणारी विशिष्ट धर्मातल्या आक्रमक टोळ्या मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. सुभाषची टिंडर अँपच्या माध्यमातून ओशिवरा मधल्या कार्तिकी नावाच्या तरुण स्त्रीशी ओळख काय होते आणि सुभाष पुढल्या केवळ एक दोन दिवसात तिच्या घरी जातो जेथे त्याला दारुमधून गुंगीचे औषध देऊन नागडे फोटो एकत्र काढले जातात त्याच्या खिशातले असते नसते ते सारे काढून घेतल्या जाते जेव्हा सुभाष शुद्धीवर येतो आपले घड्याळ जेव्हा कार्तिकीला मागतो ती आरडा ओरड करते सुभाष घरी निघून येतो त्यानंतर ओशिवरा पोलीस स्टेशन मध्ये दोघेही एकमेकांविरुद्ध लेखी तक्रार करतात ज्यात मॅनेज पोलीस त्या बदमाश बाईची बाजू घेऊन सुभाषला अधिक अडचणीत आणून वरून त्यालाच पोलीसी खाक्या दाखवण्यास सुरुवात करतात, विशेषतः विविध वाहिन्यांनी हे प्रकरण नेमके मुद्दाम उचलून धरावे त्यावर घडलेला प्रकार सुभाष जसाच्या तसा न लाजता न घाबरता सांगायला तयार आहेत कारण सुभाष स्वतः एकेकाळी या राज्यातले नामवंत मीडियामन असल्याने त्यांना मीडियाची नेमकी ताकद ठाऊक आहे. एकमेकांना आधी प्रेमाच्या नंतर लुटीच्या जाळ्यात ओढणारे सारेच स्त्रिया आणि पुरुष पुरावे जमा करण्यात अतिशय वाकबगार असतात ते तुमचे नागडे किंवा सेक्स करतानाचे फोटो आधुनिक तंत्राच्या साहाय्याने तुमच्या कळत नकळत काढून तुम्हाला फक्त आणि फक्त स्त्रिया असाल तर शारीरिक आणि पुरुष असाल तर आर्थिक लुबाडून फसवून मोकळे होतात, खूप सावध राहा आणि असे प्रसंग तुमच्यावर ओढवल्यास आधी घरातल्यांना विश्वासात घ्या त्यानंतर आलेल्या संकटाला अजिबात न घाबरता सामोरे जा यश नक्की तुमचे असते…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी