संजय बेताल बोलले : पत्रकार हेमंत जोशी
अशी म्हण आहे कि ज्या गाढवाचा कामाग्नी पेटलेला आहे असे गाढव कधीही अंगावर घेऊ नये. अमुक एका बिळात विंचू आहे इंगळी आहे किंवा साप आहे माहित असतांना त्या बिळात एखाद्याने कधीही डोकावून बघू नये ज्या ठिकाणी थेट ड्रग पार्टी सुरु आहे तेथे शहाण्याने कधीही जाऊ नये, मला हे सारे संजय राऊत यांच्यामुळे आठवले. त्यांना माहित आहे हे दिवस शिवसेनेसाठी विशेषतः थेट ठाकरे परिवारासाठी अत्यंत कठीण आहेत आणि हे ठाऊक असतानाही संजय राऊत काहीही तेही थेट वाहिनीवर मुलाखत देत असतांना बोलून मोकळे होतात. ज्या सीबीआय ला या दिवसात महाआघाडी सरकारने टरकून ठाकरे यांनी दबकून व राऊत यांनी घाबरून राहायला हवे त्या सीबीआयला काय समजते हे विधान जेव्हा एबीपी माझा वाहिनीवर करून मोकळे होतात ते ऐकल्यानंतर संजय राऊत यांनी थेट नागिणीच्या ओठांचे चुंबन घेतले असे वाटायला लागलेले आहे. संजय राऊत यांच्या, सीबीआयला काय समजते या विधानावर उद्या सीबीआयला संजय राऊत आणि परिवार, ठाकरे परिवार यांचे काय काय समजले आणि त्यातून राऊत ठाकरे व त्यांच्या सभोवतालीचे कसे अडचणीत संकटात सापडले हे दृश्य भविष्यात बघायला मिळाले तर फारसे आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. हि वेळ कोणती आणि आपण काय कशी मुलाखत देतो आहे याचे निदान भान यादिवसात राऊत यांनी ठेवण्याचे आवश्यक असतांना आणि सभोवताली राऊत यांचा तिरस्कारच अधिक करणारे असतांना राऊत यांनी आपला सुखाचा जीव दुख्खात टाकणे तितकेसे मनाला पटलेले नाही…
संजय राऊत आदल्या दिवशी एबीपी माझा वाहिनीवर मुलाखत देऊन मोकळे झाले खरे पण १५ ऑगस्ट पासून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मागे नवीन काम तेही या करोना महामारीत लावून ठेवले. राऊत यांनी उद्धव यांना निष्णात कंपाउंडर ठरविल्याने आणि डॉक्टर पेक्षा कंपाउंडर कसा महत्वाचा असतो हुशार असतो तद्न्य असतो हे राज्याच्या या जबाबदार नेत्याने पत्रकाराने संपादकाने शिवसेना खासदाराने सांगितल्याने उद्धव ठाकरे यांना १५ ऑगस्ट पासून रोग्यांना तपासून औषधे सांगण्याचे नवीन काम संजय यांनी लावून त्यांना इच्छा नसतांना विनाकारण व्यस्त करून सोडले आहे. हू या जागतिक आरोग्य संघटनेपेक्षा आमचे उद्धव कंपाउंडर हुशार अशी जाहिरात संजय यांनी केल्यावर मला गर्दीच्या ठिकाणी मटक्याचे दुकान लावून आपलीच चार माणसे खेळतांना जिंकल्याचे दाखवून तेथून येणाऱ्या जाणाऱ्या सामान्य माणसांना लुटणाऱ्या त्या वाईट लोकांची येथे आठवण झाली. हू या जागतिक आरोग्य संघटनेला आरोग्यातले काहीही समजत नाही तर उद्धव हेच खरे निष्णात कंपाउंडर असे थेट वेडे विधान करून या कठीण दिवसात राऊत यांनी नवा उपद्व्याप करून ठेवला आहे. ज्या दिवसात डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून अक्कलहुशारीने महासंकटातून अलगद बाहेर पडायचे अशावेळी मुलाखत घेण्यासाठीचे जमलेले खांडेकर यांच्यासहित सारेच्या सारे प्रतिनिधी तुम्ही एक मूर्ख असा तुमच्याकडे हावभाव करून फिदीफिदी हसतात, कसा व किती हास्यास्पद असा हा मेसेज तुम्ही शिवसैनिकांना देऊन एकप्रकारे साऱ्या शिवसेनेचा जाहीर अपमान घडवून आणला आहे, अशाने कोणीही राऊत यांना सिरियसली न घेता राजकारणात नवा जोकर जन्माला आला पद्धतीने बघून मोकळे होतील जे थेट सेनेला परवडणारे नाही…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी