१. धडाडीच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी हाती घेतलेल्या कामांवर मंत्री खडसेंनी स्थगिती आणल्याबद्दल शिवशंकर भोई अजिबात जवाबदार नाहीत, असे गृहीत जरी धरल तरी कसे चालेल? सरकारच्या वादग्रस्त भूखंडावर बांधण्यात आलेल्या बेलापूरच्या “फोरेस्त हिल” सोसायटीतील सारी घरे सील करण्याची कारवाई जोशी यांनी हाती घेतली होती. यावर खडसे यांनी स्टे आणाला. एका दैनिकातील वृत्तानुसार त्या सोसायटीत भोई यांचा अलिशान सदनिका आहे. खडसे यांच्या पासून भोई , शिवाजी मोघेपासून प्रशांत अल्ल्याडवार ,अजित पवारांपासून सुरेश जाधव , तटकरे पासून महेश कुलकर्णी, पंकजा मुन्डेपासून सतीश मुंडे विभक्त का होऊ शकत नाही हे मला अध्याप समजलेले नाही.
२. प्रत्येकाला बांद्रा ( पूर्व ) येथील ” एफडीए ” इमारत नक्कीच माहित असणार. आता बरोब्बर त्याचासमोर ज्या ठिकाणी भलीमोठी इमारत उभी आहे, त्याचा ही भूखंड अन्न व औषधे विभागाचाच होता .. पण वरिष्ठ आय.ए.एस आणि आय.पी.एस अधिकाऱ्यांची घरे बांधण्याचे ठरले. त्या भूखंडावर “जास्मिन कोऑपरेटीव हाऊसिंग सोसायटी ” बांधण्यात आली. आय. पी. एस एसपीएस यादव या सोसायटीचे मुख्य प्रमोटर आहेत. त्या सोसायटीच्या फ्ल्याटधारकांची यादी जेव्हा बघितली तेव्हा मला धक्काच बसला. माजी उपनगर जिल्हाधिकारी चिमणराव संगीतराव आणि डॉ संजय चहांदे यांनी त्यांच्या कार्यकाळात (जिल्हाधिकारी असताना) एक एक सदनिका आपापल्या नावावर करून घेतली. असे किती तरी सनदी अधिकारी आहेत ज्यांच्या कडे असे सरकारी सदनिका आहेत, पण वास्तविक ते त्या फ़्लतमध्ये न राहता जवळच्या कोर्र्टर मध्ये राहणे पसंद करतात . हे चुकीचे नाही का ? असो. एक निरीक्षण… पाटलीपुत्र, वसुंधरा , जस्मिन या सर्व सोसायटीच्या आवारात जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला हमखास एखादी बँक तरी दिसेल किंवा एखादे शोप्पिंग सेंटर तर निश्चितच असेल. आपल्याला देखबाल दुरुस्ती खर्च सुद्धा येऊ नाही, म्हणून अधिकारी आधीच या धंद्यावाल्यांशी सेटिंग करतात… तिसरे निरीक्षण– या अधिकाऱ्यांची घरे रिकामे न ठेवता त्याला भाड्यावर दिले जाते. बाजारभावापेक्षा कितीतरी कमी दराने आपले फ़्लट कॉर्पोरेट अधिकार्यां कडून चेकने येणारी रक्कम असते… उरलेली रक्कम नकद स्वीकारली जात असते.
३. सनदी अधिकारी सतीश गवई यांची बदली झाल्यामुळे मंत्री प्रकाश मेहता भलतेच आंनदी आहेत . आता ते आपल्या सर्व मीटिंग मरीन ड्राईव येथील इंटर्कॉन्तिनेन्ताल हॉटेलमध्ये घेतात. पूर्वीच्या सरकारमध्ये डीलिंग एज्णट आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या मिटिंग या हॉटेलमध्ये व्हायच्या. सम्राट ,स्टेटस .ओबेरोय, ट्रायदेण्ट हि हॉटेल्स लोकांच्या नजरेत असल्यामुळे इंटर्कॉन्तिन्टेल हॉटेल पसंद केल जायचं. प्रकाराभाईनी हे बदनाम हॉटेल का निवडल हो?
४. आगमी काही महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हटवून त्यांच्या जागी भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरी यांची वर्णी मुख्यमंत्री पदावर लावली जाणार आहे, अशी मंत्रालयात जोरदार अफवा कोणीतरी पसरवत आहे. कोणत्या बेस वर हि अफवा उडवली जात आहे, आणि या बातमी मागे सुत्रधार कोण आहे, याचा शोध घेतला पाहिजे.
५. जनतेसमोर येण्यापूर्वी मग ती साधी पत्रकार परिषद का असेना आपला मेकेअप करण्यासठी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी ” कदाचित ” एका व्यक्तीची नेमणूक केली आहे. मी खडसे यांना इतके गोरे, केस व्यवस्थित सेट केलेले आणि भुवया काळे असलेले कधीच पहिले नाही.
६. मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे हे भर उन्हाळ्यात/ पावसाळ्यात कोट का घालून फिरतात हे मला कोणी सांगेल का?
७. पृथ्वीराज चव्हाण तसे भयंकर खुन्नस ठेवणारा व्यक्ती. शंकर भिसे नामक अधिकार्याची हि कहाणी. गेली ८ वर्ष भिसेना एकही पद देण्यात आले नव्हते. कारण सांगू? शंकर भिसे हे दिवंगत विलासराव देशमुख यांच्या गोटातील माणूस. ते मुख्यमंत्री असताना त्यांचे भिसे स्वीय सहायक होते. नंतरच्या काळात विलासराव पदावरून हटले, अशोक चव्हाण आले. ते हटले, आणि अर्थातच भिसे यांना सुद्धा आपले पद सोडावे लागले. स्वतः विलासराव एकदा अशोक चव्हाण मुख्यमंत्री असतना भिसेला पोस्टिंग द्या म्हणून भेटले होते. अशोक रावांनी काहीही केले नाही. नंतर आलेल्या बाबांनी कसेबसे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्तपद दिले, पण निवडणूक आयोगाच्या चुकीच्या धोरणाने परत भिसेना एका दिवसात घरी पाठवण्यात आले. जे काम त्यांनी केलीत, जे नियमबाह्य होती, तरी या पृथ्वी बाबाने आपल्याच अधिकार्याची साथ नाही दिली. मग कसेबसे करून पुन्ह भिसे यांनी मात्र सगळी यंत्रणा कामला लावून जुन्या ओळखी काढून पृथ्वी बाबाला दिल्लीहून “मेसेज” दिला… आता भिसे एस. आर. ए मध्ये कार्यरत आहेत. सांगण्याचा उद्देश असा, कि आपलयाला वाटत असते, कि अधिकारी, पुढारी हे सगळ्या एक पठडीचे! पण असे नसते!! जो दिखता है, वैसा होता नही !!