आदरणीय लहाने साहेब,
आपण खरेच खूप मोठे आहात. आपले कार्यही मोठे आहे. अशावेळी आपल्याबद्दल मिळालेल्या माहितीवरुन लिहिताना खूप यातना झाल्या. पण मी ही पत्रकार आहे. माझे बाबा नेहमी सांगतात लिहिताना समोरचा व्यक्ती कोण याचा विचार करू नको. जे सत्य आहे ते मांड. तो विचार केला तर काही प्रश्न उभे राहतात. तेच मांडतोय.
परवा आपल्याविषयी ज्या काही शंका-कुशंका मनात गेले कित्येक वर्ष होत्या, ते मनमोकळे पणे मांडल्या. पुरावे होतेच हाताशी. लिहील नसते तर, अस्वस्थ झालो असतो. भरभरून प्रतिक्रिया आल्या. रात्री २ वाजेपर्यंत लोकांचे फोन येत होते. त्यातले काही पत्रकार सुद्धा होते. सगळ्यांना, ज्यांनी मला माहिती पुरवली, त्यांचे नंबर हवे होते. मी काही तो नंबर दिला नाही. उभ्या महाराष्ट्रात ज्यांना आपण सगळे मानाचा सलाम ठोकतो, चक्क त्यांना माझे तुमच्या विषयावर लिखाण आवडले नाही. एरवी “बर लिहितोस” एवढेच ते सांगतात. ही पावती या सद्गृहस्थाकडून मिळवणे ही फार मोठी गोष्ट. असो. मग सकाळी ६ वाजता त्यांना मी न लिहिलेल्या गोष्टी सांगितल्या. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. मग काल सकाळी तुमचा मेसेज आला. “ज्यांना कोणाला माझ्याबद्दल शंका असतील, त्यांनी माझ्याकडे ” येऊन ” सगळी कागदपत्रे बघावीत” असे तुम्ही लिहिले. मला काही गैरसमज झाल्याचेही तुम्ही आवर्जून मेसेजमध्ये नमूद केले होते . पण साहेब एक सांगू का, मी माझ्या बाबांनी दखवलेल्या मार्गावर चालणारा पत्रकार आहे. मला जर एखादी गोष्ट जर पुराव्यासहीत कोणी दिली,की मग कोणीही असो, मी ते जरूर लिहितो, आणि लिहित राहणार… असो, पुन्हा काही गोष्टी कानावर आणि कागदोपत्री हातात आल्यात… कृपया कळवावे … मुद्दे खाली देत आहे…
१. मंत्रीमोहादय विनोदजी, वेन्टिलेतर प्रकारणात अडकलेले आपले श्रीयुक्त शिंगारे हे वैदकीय शिक्षण खात्याचे संचालक ना? त्यांच्या खाली दोन सह संचालक पदे रिक्त होते. आता माझ्या माहितीनुसार, एका सह संचालकपद तर तुम्ही श्री लहाने याना अतिरिक्त कारभार म्हणून दिले आहे, आणि दुसरे सह संचालक पद नागपूर वरून “बोलवून” घेतलेले श्री वाकोडे यांच्याकडे ना? आता मला कळत नाही कि, या पदासाठी अहो डॉ. लहानेेहून सिनियर असण्याऱ्या श्रीमती डोगावकर, ज्या मिरज मध्ये अप्रतिम काम करत आहेत, त्यांची वर्णी का नाही लावली? पुन्हा श्रीयुक्त डॉ. वाकोडे हे नागपूरच्या शासकीय वैदकीय कॉलेजचे डीन ना? बरे जमते बुवा, ८०० मैल दूर राहून दोन्ही कारभार या वोकोदेंना… परत माहितीनुसार, या पदावर यायला लहाने साहेबांनी घड्याळवाल्या साहेबांचा फोन तर नव्हता करवला ना? मंत्रीमोहदय, जस्ट विचारात आहे, राग मानून घेऊ नका…सह संचालक पद हे फार महत्वाचे आहे. कृपया त्यावर श्रीमती डोगावकर किंवा श्रीमती डावर सारख्या देहभान विसरून काम करणाऱ्यांची वर्णी लावा…महिला आरक्षण विषय आठवतो ना साहेव? विनोद्जी, तुमचे पण काम लई भारी, घेऊन टाका भरारी…
२. २०१४ मध्ये मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया यांनी वैदकीय शिक्षणातील पूर्तता व उणीव भरून काढण्यासाठी राज्यात प्राध्यापक आणि उर्वरित लागणारे स्टाफबद्दल पडताळणी केली होती. जवळपास ५०० एमबीबीएस विद्यार्थी यांच्या शिक्षणाला शह देण्याची शक्यता एमसीएआयने त्याकाळी वर्तविली होती आणि राज्य शासनाला यावर सक्त सुचना बजावल्या होत्या. याच अनुषंगाने एम. पी. एस. सी या सेवेने ३ ते ४ वर्ष पदे भरण्यास टाळाटाळ केली होती. मग तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीतच, एकाच वेळी सर्व पदे भरण्याचे आदेश काढले होते . तशा सुचना वैदकीय शिक्षण विभागालाही देण्यात आल्या. तरी पण ७ ते ८ महिने काहीच कसे झाले नाही हो? मग मागच्या एप्रिल महिन्यात पदे भरण्याचे काम सुरु झाले. या पदे भरण्यात सुद्धा भरपूर घोळ झाल्याचे ऐकले… फिसियोलोजी या विभागाचे प्रमुख म्हणून कोणीतरी सचिन नावाचा डॉक्टर आल्याची खबर आहे. म्हणतात सगळे नियम धाब्यावर बसवून यांची वर्णी लागली आहे… आता या पदासाठी माळी नावाचे गृहस्थ कोर्टात अर्थातच MAT मध्ये गेल्याचे कळत आहे. कोणाचा हात असेल हो यात? सगळे म्हणतात कि सध्या लहाने साहेबांची दोस्ती तत्कालीन वाहतूक आयुक्त आणि सध्याचे एमपीएससीचे सर्वेसर्वा व्ही. एन. मोरेंशी आहे… खरे आहे का हो?
असेच वेळोवेळी जेव्हा काही मुद्दे हातात लागतील तेव्हा विचारण्याची तसदी घेईल… पुन्हा एकदा… तुम्ही खरोखर ग्रेट आहात… महाराष्ट्राची शान आहात, पण काय करू, आमचे कामच आहे “विचारपूस” करणे… तूर्त एवढंच!!
आपला,
विक्रांत जोशी.