काही मंत्र्यांकडे त्यांच्या कार्यालयात काम करणारा अधिकारी आणि कर्मचारी वर्ग हि त्या मंत्र्याची मोठी ताकद असते तर बहुतेक मंत्र्यांकडे, आमदारांकडे काम करणारे कर्मचारी त्या त्या मंत्र्याला, आमदाराला केवळ व्यक्तिगत स्वार्थापोटी किंवा उद्धट,उर्मट वर्तनातून संपवून मोकळे होतात. गणेश नाईक यांच्यासारखा वटवृक्ष मागल्या विधानसभा निवडणुकीत भुईसपाट होण्याचे मुख्य कारण त्यांचा कर्मचारी आणि सभोवताली वेटोळे करून बसलेला अधिकारी वर्ग होता म्हणजे स्थानिक मतदार गणेश नाईक यांना साक्षात परमेश्वर, शंकर, महादेव मानायचे पण या शंकराच्या पिंडीवर वेटोळे करून बसलेले साप बोलायला, वागायला, पैसे खातांना साक्षात
विषारी नाग होते, त्यांचे केवळ फुत्कार देखील नाईक यांच्याकडे काम घेऊन येणार्यांना नागाच्या विषापेक्षा जहाल वाटायचे, भिक नको पण कुत्र आवर, जो तो गणेश नाईक यांना सांगत असे, पण एखाद्या वेश्ये पुढे अमुक एखाद्या नवर्याला पत्नी देखील प्रसंगी नकोशी होते ते तसे गणेश नाईक यांचे झाले होते, त्यांना त्यांचा नालायक कर्मचारी आणि अधिकारी वर्ग स्वर्गाहून सुंदर आणि अप्सरेपेक्षा देखणा वाटायचा, त्यामुळे घडायचे तेच घडले, एका सामान्य कार्यकर्त्या स्त्रीने गणेश नाईक यांच्या सारख्या दानशूर, जागृत, लोकोपयोगी, समाजसेवक, प्रगत, कष्टाळू, कार्णासारख्या मोठ्या मनाच्या, धडाकेबाज, समाजपयोगी नेत्याला त्या विधानसभा निवडणुकीत चारी मुंड्या चित केले, अत्यंत सामान्य नेत्या म्हणून परिचय असलेल्या मंद म्हात्रे यांनी गणेश नाईक यांचा पराभव केला. मंत्र्यांचा कर्मचारी आणि अधिकारी वर्ग बहुतेक वेळा त्या त्या मंत्र्याला बरबाद करतो, त्यावर गणेश नाईक हे उत्तम उदाहरण….
फडणवीस मंत्री मंडळात सतत सहा वेळा विधान सभेवर निवडून येणारे वाडा पालघरचे आदिवासी नेते श्रीमान विष्णू सावरा हे आदिवासी विकास खात्याचे पूर्ण वेळ मंत्री आहेत, त्यांच्या खात्याचे जे राज्यमंत्री आहेत, त्यांच्या कार्यालयातून मला विष्णू सावरा यांच्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गाने जो सावळा गोंधळ ‘ सावला ‘ नावाच्या दलालामार्फत घातलेला आहे त्यावर दिलेले पुरावे बघून, वाचून मी हे ठामपणे सांगू शकतो कि जर हे असे सततचे गैरप्रकार असेच विष्णू सावरा यांच्या कार्यालयात सुरु राहिलेत तर पुढल्या विधान सभा निवडणुकीत सावरा यांचा ‘ गणेश नाईक ‘ व्हायला फारसा वेळ लागणार नाही. सावरा यांनी त्यांच्या खाजगी सचिवाला म्हणजे जालन्यातवादग्रस्त ठरून आता सावरा यांना लुटायला आलेल्या खाजगी सचिवाला म्हणजे त्या कल्याण औताडे यास वेळीच आवर घातली नाही तर गणेश नाईक यांच्या कार्यालयातल्या ‘ परदेशी ‘ याने जणू सावरा यांच्याकडे जणू पुनर्जन्म घेतला असे मतदार म्हणतील आणि सावरा यांची कधीही न झालेली बदनामी यावेळी होऊन त्यांना राजकारणात मोठी किंमत मोजावी लागेल….
अलीकडे मला त्या भाजपा प्रदेश अध्यक्षांचा अगदी मनापासून राग येतो, ज्या नत्याने पक्ष वाढविण्याकडे आणि वाचविण्याकडे सध्या ध्यान देणे आवश्यक असतांना हा रावसाहेब दानवे उठसुठ जिकडे तिकडे नाक खुपसून मी शिफारस केलेला कर्मचारी आणि अधिकारी वर्ग घ्या, मंत्र्यांना, राज्यमंत्र्यांना का हुकुम करीत सुटतो हे न उलगडणारे कोडे आहे, ज्याने राज्य सांभाळायला हवे ते दानवे घाणीत हात घालण्यात स्वत:ला धन्य का समजतात, खरोखरी हे ध्यानात न येणारे आहे, आजपर्यंत मी शिफारस केलेला अमुक कर्मचारी घ्या सांगणारा कोणत्याही पक्षाचा प्रदेशाध्यक्ष माझ्या पाहण्यात नाही, या दान्वेंना काय झाले काळत नाही, त्यामुळे घडते असे कि जे सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी अत्यंत बेरकी, पैसेखाऊ, उद्धट, उर्मट, स्वार्थी, हरामखोर, राज्यद्रोही आहेत ते दानवे यांची
शिफारस आणतात आणि या कल्याण औताडे यांच्याप्रमाणे मंत्री कार्यालयात ठाण मांडून बसतात, दुकान उघडून बसतात…
तुम्हाला आठवत नसेल तर आठवण करून देतो, बांद्रा पूर्वेला शासनाचे एक विश्रामगृह कलानगर शेजारी आहे. छगन भुजबळ यांना त्यांच्या ज्या जवळच्या लोकांनी अडचणीत आणले होते ते के पी पाटील यांच्यासारखे नामचीन अभियंते भुजबळ यांच्या आवडत्या कंत्राटदारांना याच विश्रामगृहात घेऊन बसायचे आणि नको ती कामे करून शासनाचे पैसे प्रत्यक्ष कामे न करता सारे वाटून घ्यायचे,
थोडक्यात या मंडळींनी चक्क बांधकाम खात्याचे कार्यालयच या विश्रामगृहातील एका खोलीमध्ये थाटले होते, पुढे पोलिसांनी या विश्रामगृहातील त्या खोलीवर धाड टाकून अनेक वादग्रस्त कागदपत्रे ताब्यात घेतली होती, पोलिसांनी आता पुन्हा एकदा या विश्रामगृहावर धड टाकावी कारण गेल्या तीन महिन्यांपासून विष्णू सावरा यांच्या खाजगी सचिवांनी म्हणजे कल्याण औताडे यांनी देखील समाज कल्याण खात्याचे मिनी कार्यालय येथेच थाटलेले आहे, जेवढी गर्दी विष्णू सावरा यांना भेटायला नसते त्यापेक्षा अधिक वादग्रस्त माणसे या विश्रामगृहातील औताडे यांच्या त्या वादग्रस्त खोलीत त्यांना भेटायला ताटकळत असतात, सावला किंवा शाह
यांच्यासारखे दलाल भेटणाऱ्या वादग्रस्त अधिकारी आणि कंत्राटदार मंडळींची बडदास्त ठेवतात, मालही तेच जमा करतात…..
या राज्याचे आदिवासी विकास मंत्री श्रीमान विष्णू सावरा आधी उत्तम संघ स्वयंसेवक आहेत, सुसंस्कारित तीन तीन मुलांचे बाप आहेत. त्यांचा मोठा मुलगा हेमंत हा प्रख्यात सर्जन आहे, मुलगी निशा ठाण्यातल्या एका महाविद्यालयात प्राध्यापिका आहे आणि धाकटा संदेश पायलट आहे, सध्या तो विमान चालवत नाही,पण विविध व्यवसायात झेप घेण्या गुंतलेला आहे, तिघेही मुले सरळमार्गी आणि सावरा दाम्पत्यांच्या उत्तम संस्कारातून घडताहेत, घडली आहेत. जेव्हा वाडा जव्हार भागातल्या मुलांना शाळा, शिक्षण कशाशी खातात हे देखील माहित नव्हते तेव्हा त्या भागातून श्रीमान विष्णू सावरा पदवी घेऊन बाहेर पडले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांच्या नजरेत हा सुशिक्षित तरुण पडला आणि त्याला आपल्याकडे खेचण्यात संघ प्रचारक यशस्वी झाले, त्या दरम्यान अनेक हिंदू आदिवासींचे धर्मांतर त्यावेळेच्या ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यांमध्ये सुरु होते, अशावेळी श्रीमान विष्णू सावरा यांनी जीवाची पर्व न करता दिन रात एक करून या भागातील मोठ्या प्रमाणावर त्यावेळी चाललेले धर्मांतर रोखले, मोठे काम एक संघ स्वयंसेवक म्हणून केले, हिंदू धर्मावर उपकार करून ठेवले, आजही आदिवासी विष्णू सावरा यांना देवासारखे पूजतात, दरवेळी आमदार म्हणून निवडून देतात. त्या आदर्श सावरा यांच्याकडे पैसेखाऊ औताडे यांच्यासारखे जर अधिकारी खाजगी सचिव म्हणून कार्यरत असतील तर दिवंगत आर आर पाटील आणि विष्णू सावरा यांच्यात मला कमालीचे साम्य भासेल. त्या आर आर पाटलांना मंत्री म्हणून फारसे पैसे लागायचे नाहीत, त्यांच्या त्या सभ्य आणि सुसंस्कृत स्वभावाचा गैरफायदा मग मोठ्या प्रमाणावर त्यांच्या स्टाफने आणि काही महाबिलंदर पत्रकरांनी घेऊन प्रचंड माया
जमा केली, मोठ्या प्रमाणावर पैसा जमा केला. सावर यांनी स्वत:चा आर आर
आबा करवून घेऊ नये…..क्रमश: