मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचाली :
शाळा महाविद्यालयातील मुलांना एखाद्या बागेत सहलीला नेले
कि नेमके काय घडते, अनुभव नक्कीच तुमच्यादेखील गाठीशी
आहेच. कोणी झाडावर चढते, काही मुले एकमेकांना वाकुल्या
दाखवतात, काही ‘स्तब्ध पुतळा ‘ खेळ खेळतांना एकमेकांना
हसविण्यासाठी माकडाप्रमाणे एकमेकांकडे बघून हातवारे किंवा
हावभाव करतात, काही गाण्याच्या भेंड्या खेळतात, काही मुले
आणि मुली एकमेकांकडे बघून नुसतेच इशारे करतात, जुन्या
चित्रपटातला के एन सिंग नावाचा खलनायक इशारे करायचा
तसे, आम्ही मात्र यातले काहीही करीत नसू, आमची एक
शिक्षिका एकदम टकाटक होती, सहलीला गेलो कि तिच्याभोवती
पिंगा घालणे एवढे एकमेव काम आम्हा काही वात्रट मुलांचे असायचे,
येथे त्या शिक्षिकेचे नाव उघड करणे अवघड आहे, तिची मुलगी माझी
वाचक आहे कि. हे असे शाळा महाविद्यालयातल्या सहलीसारखे नेमके
दृश्य तुम्हाला सद्यस्थित असलेल्या मंत्रीमंडळात हमखास बघायला
मिळते, यापुढेही बघायला मिळेल. जर तातडीने मंत्रिमंडळ बदल आणि
विस्तार केल्या गेला नाही तर या सरकारचे काही खरे नाही. शाळेतल्या
सहलीसारखे चार दोन दिवाकर रावते, रणजीत पाटील, दस्तुरखुद्द
मुख्यमंत्री सोडले तर सहलीला आलेल्या माकडचेष्टा करीत सुटलेल्या
उनाड विद्यार्थ्यांसारखे त्यांचे वागणे सुरु आहे, मुख्यमंत्री त्यांना खाजगीत
झाप झाप झापतात, बाहेर पडले कि त्यांच्या माकडचेष्टा सुरु, त्यामुळे
बदल आणि विस्तार अत्यावश्यक आहे, काहींना घरी पाठवून काही नव्या
जुन्या चेहऱ्यांना संधी देणे अत्यावश्यक आहे. जसे सिगारेट पिल्यानंतर
माणूस हमखास लवकर मारतो, माहित असूनही आपल्यातले अनेक सिगारेट
ओढतात तसे यावेळी जर १९९५ सारखा बेधुंद कारभार केला तर पुन्हा पुढली
अनेक वर्षे सत्तेत येणे नाही हे ठाऊक असूनही अगदी अनुभवी मंत्री, आमदार
पैसे मिळविण्याच्या हव्यासापोटी वाट्टेल तो धुडगूस घालू लागलेले आहेत,
मतदारांची तीक्ष्ण नजर त्यांच्यावर असते आणि विरोधक देखील लेचेपेचे
नाहीत, ते अनुभवी आहेत, शरद पवार आहेत, नारायण राणे आहेत, त्यांना
नेमका गोंधळ कळतो, परिणाम त्यातून नक्कीच वाईट होतील….
काही मुली लग्नाच्या आधी एकदम खाली मान घालून बर्यापैकी संस्कार
जपणाऱ्या असतात, लग्नानंतर एकदम सुटतात, सनी लिओनि होतात. मंत्री
गिरीश महाजन मंत्री नव्हते तोपर्यंत हवेहवेसे वाटायचे, मंत्री झाले आणि एकदम
बदलले. एवढे बदलले कि त्यांचे जिल्ह्यातले राजकीय प्रतिस्पर्धी एकनाथ खडसे
यांना नकोसे वाटू झाले आहेत, पुढली चार दोन वर्षे, गिरीश महाजन यांचा सुरेश
दादा जैन कसा करता येईल त्यावर खडसे यांनी सारी कामे बाजूला ठेवून त्यावर
लक्ष नियंत्रित केल्यास फारसे आश्चर्य वाटून घेऊ नका कारण जळगाव जिल्ह्यात
गिरीश महाजन भाजपा वर्तुळात कमी, सुरेशदादा गटात अधिक रमतांना दिसू
लागले आहेत, त्यांना भाजपा कार्यकर्ता प्रसंगी कमी महत्वाचा वाटतो पण कायम
राज्यसरकारला हाताशी धरून मराठी जनतेला लुटत आलेला पीव्हीसी पाइपवाला
अशोक जैन अधिक महत्वाचा वाटतो, असे अलीकडे त्यांच्याच पक्षातले कार्यकर्ते
म्हणतात. येथे मुंबईत मात्र बहुतेकवेळा भल्या पहाटे बंगल्यावर परतणारे
गिरीश महाजन हा सध्या तसा अभ्यासाचा, त्यांच्या पत्नीला चिंतेचा, काहींना
थट्टेचा आणि त्यांच्या स्टाफमध्ये चर्चेचा विषय आहे. असे वाटले होते महाजन
यांना संधी मिळाली कि ते त्या संधीचे सोने करून मोकळे होतील पण ते
घडतांना अद्याप दिसलेले नाही. जशी जळगाव जिल्ह्यात लोकांमध्ये खडसे
यांची क्रेझ आहे ती तशीच डिमांड नक्कीच महाजन यांना देखील आहे, त्यांनी
काही महिन्यांपूर्वी जे आरोग्य शिबीर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेतले होते,
त्या शिबिराचे यश बघून खडसे यांच्या पायाखालची वाळू सरकली होती, पण
यश पचविता आले पाहिजे अन्यथा माणूस सुरेशदादा जैन होतो. मला आठवते
जळगाव जिल्ह्यात सतत ३० वर्षे सुरेशदादा जैन यांना जी लोकप्रियता लाभली
होती त्या आसपास देखील आजही महाजन अगदी खडसे देखील नाहीत पण
ज्या खडसे यांना सुरेशदादा, कीस झाड कि पत्ती समजले होते, पुढे त्याच
खडसे यांनी सुरेशदादा यांना राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणातून पूर्णत:
नामशेष करून सोडले, उद्या हि वेळ गिरीश महाजन यांच्यावर ओढवू नये कारण
खडसे यांच्यावर राजकीय मात करण्यासाठी महाजन यांनी नेमका दादागट हाताशी
धरून राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे, पण महाजन
यांनी एक ध्यानात घ्यावे, जे गुंड असतात, समाजविघातक असतात, त्यांचा केवळ
रात्रीच्या अंधारात राजकारणात उपयोग करवून घ्यायचा असतो, त्यांना चार चौघात
इज्जत दिली, मांडीवर घेतले कि ते तुमच्या अंगावरच ते हागून ठेवतात, घाण अंगावर
पडलेल्या नेत्यापासून जनता नाकाला पदर लावून कोसो दूर पळते, पुन्हा जवळ न
येण्यासाठी, तुमचा सुरेशदादा करवून घेऊ नका, नेमके आपण कुठे कुठे वावरतो
आणि आपल्या भोवती कोण कोण वावरते त्यावर विरोधकांची, जनतेची, मतदारांची
बारीक नजर असते त्यावर दबक्या आवाजात चर्चा होता होता एक दिवस एकदम
स्फोट होऊन अमुक एखादा आकशाला भिडलेला नेता क्षणार्धात धडकन जमिनीवर
कोसळतो, गांडीवर आपटतो….
खरे खोटे देव जाणे पण माहिती अशी कि एकनाथ खडसे यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठींना
स्पष्ट शब्दात सांगितले आहे, माझ्याकाडली हवी तेवढी खाती काढून घ्या पण गिरीश
महाजन यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करा आणि जे खडसे यांना ओळखतात त्यांना
माहित आहे, खडसे राजकारणातले एकलव्य आहेत, त्यांनी अमुक एखाद्या गोष्टीची
मनाशी खुणगाठ बांधली कि ते हाती घेतलेले मिशन पूर्ण करून सोडतात…..
मित्रहो, जे लोखंड करू शकते प्रसंगी ते काम सोने करू शकत नाही. जे औदार्य
दाखविण्याची हिम्मत आई मध्ये असते ते काम बहिण, पत्नी, मैत्रीण किंवा अन्य
कुठ्लेही नाते असलेली स्त्री करू शकत नाही. कपड्यांना उठावदार दिसण्यासाठी
इस्त्रीच हवी, उशीखाली कपडा रात्रभर घडी करून ठेवला तरी फारसा उपयोग नसतो.
हत्तीणीला गाम्हन ठेवण्यासाठी हत्तीच हवा, माकडाच्या हातून हे काम शक्य नाही,
हत्तीणीच्या पाठीवर त्याने वर झाडावरून कितीही उड्या मारल्या तरी, तद्वत हा समाज
प्रगतीकी ओर न्यायचा असेल तर ध्येय समोर ठेवून वाटचाल करणारा नेता लोकांची
गरज असते, तुम्ही सत्तेचा दूरूउपयोग केवळ ऐय्याशी करण्यासाठी करताय, एकदा
का लोकांच्या ध्यानात आले कि नेतृत्वातले भले भले वृक्ष उन्मळून पडतात, हे कायम
ध्यानात ठेवून नेत्यांनी आपली वाटचाल सुरु ठेवावी…..