चंद्रशेखर बावनकुळे हे तेली समाजाचे, हा समाज त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने बघतोय, हा समाज जळगाव-अमळनेर विधानसभा मतदार
संघाचे आमदार शिरीष चौधरी यांनी देखील समाज बांधवांसाठी वेगळे काहीतरी करून काहीशा दुर्लक्षित असलेल्या या समाजाचे भले करावे, त्यांना वाटते. या तेली समाजाला जयदत्त क्षीरसागर बीडच्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याकडून, या माजी मंत्र्यांकडून देखील मोठ्या अपेक्षा होत्या पण सत्तेत असतांना क्षीरसागर घराणे म्हणजे खासदार आमदार नामदार असतांना समाजापेक्षा, तेली ज्ञातीला प्रगतिकी ओर नेण्यापेक्षा उलटपक्षी आपण स्वतः अधिकाधिक कसे श्रीमंतीकडे झुकू त्यांचा म्हणे कटाक्ष असतो, त्यामुळे खूप मोठ्या अपेक्षेने क्षीरसागर घराण्याकडे पूर्वी अपेक्षा ठेवून असणारे अनेक तेली बांधव अलीकडे क्षीरसागर आमच्या समाजाचे नेते, सांगायला देखील टाळतात. नेत्यांचे आपल्या समाजावर ऋण असावे जसे बाबासाहेबांचे दलितांवर,दिवंगत मधुकरराव उर्फ बाळासाहेब चौधरी यांचे लेवा पाटेदार समाजावर, पुसदच्या नाईक घराण्याचे बंजारा आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे वंजारी समाजावर किंवा छगन भुजबळ यांचे माळ्यांवर ऋण आहे, ज्ञाती क्रांती आणण्यात अशा या विविध नेत्यांचा मोठा सहभाग राहिलेला आहे. आता उत्पादन शुल्क आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बघूया त्यांच्या ज्ञातीसाठी काय करतात ते….
राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केवळ राज्यातल्या पोलिसांनी जे सतत दुर्लक्ष करून या खात्याच्या भरवशावर काळे पैसे मिळविण्याचे साधन म्हणून बघितल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पर्यायाने राज्याचे, जनतेचे मोठ्या प्रमाणावर शारीरिक आणि आर्थिक नुकसान झालेले आहे. पोलिसी खाक्या या विभागाकडे नसल्याने दंड, चोऱ्या, काळा बाजार रोखण्यासाठी, या राज्यात सतत होणारी दारूची चोरटी आयात रोखण्यासाठी या खात्याला सतत अतिशय शिस्तप्रिय पोलीस अधिकाऱ्यांची, नियत चांगली ठेवणाऱ्या पोलिसांची खूप खूप पदोपदी गरज असते विशेषतः परराज्याला जोडणाऱ्या ज्या सीमा आहेत त्याठिकाणी धडाकेबाज
व भ्रष्ट नसलेल्या पोलिसांची अतिशय आवश्यकता असते पण कधीही असे घडत नाही त्यामुळे जनता आणि शासन मोठ्या प्रमाणावर उत्पादन शुल्क विभागाच्या सुस्त आणि भ्रष्ट कारभारामुळे भरडल्या जाते आहे, या खात्याच्या भरवशावर अनिल देशमुखांसारखे मंत्री किंवा बोटावर मोजण्याएवढे अधिकारी कर्मचारी श्रीमंत होतात, पद्धतशीर बेवकूफ बनविणारा हा उत्पादन शुल्क विभाग कसा डांब्रट, सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे. दारू पिणाऱ्या बहुतेक स्त्रिया सुगंधित व्होडका पिणे नेहमी प्राधान्याने प्रेफर करतात, अशा बेवड्या बायकांना माहिती म्हणून सांगतो, या राज्यात ज्या स्त्रिया व्होडका म्हणून जे मद्य पोटात रिचवतात, फार कमी वेळा ते मद्य व्होडका असते, वास्तवात देशी दारूमध्ये सुगंधित स्वाद मिसळून अक्षरश: देशी दारूला महागड्या व्होडकाच्या भावात या राज्यात खूप मोठ्या प्रमाणावर विकल्या जाते, मस्त किक लागते,म्हणून स्त्री पुरुषांचा विशेषतः या राज्यातल्या बेवड्या बायकांचा आवडता मद्य प्रकार ठरला आहे सुगंधित म्हणजे फ्लेवर्ड व्होडका, पण शालीन मुलगी म्हणून एखाद्या तरुणीशी एखाद्याने लग्न करावे आणि तिला एड्स झालेला असावा तसे व्होडका या मद्याचे, शरीराला कमी प्रमाणावर घटक म्हणून व्होडकाला ग्राहकांची पसंती वास्तवात मात्र या राज्यात मोठ्या
प्रमाणावर देशी दारू सुंगंधीत व्होडका सांगून मोठ्या प्रमाणावर विकल्या जाते….
या खात्यातले गैरप्रकार आणि या राज्य उत्पादन विभागातले तहान मांडून बसलेले भावसार इंदिसे यांच्यासारखे गब्बर नवश्रीमंत अधिकारी, सारे पुरावे श्रीमान बावनकुळे मी तुम्हाला सादर करतो, तुम्ही कारवाई करा आणि या खात्यात नवक्रांती आणण्याचे पुण्य काम करून मोकळे व्हा…..क्रमश: