अनेकदा असे होते कि अमुक एखाद्या नेत्यांविषयी काय लिहावे कळत
नाही कारण त्याच्या नावावर फारशा सार्वजनिक कामांची यादीच नसते
आणि काही नेत्यांविषयी नेमके काय काय लिहावे आणि कित्ती कित्ती
लिहावे असे गोंधळी मन आपोआप तयार होते एवढा तो नेता झपाटलेला
असतो त्यातून सार्वजनिक कार्यात तो डोंगर उभे करतो. जसे काही शासकीय
अधिकारी पैशांना एवढे हपापलेले असतात कि त्यांना शिक्षा म्हणून अगदी
अडगळीच्या जागी टाकले तरी ते तेथेही पैसे खाण्याचे मार्ग निर्माण करतात.
तसे काही मंत्री किंवा नेते जेथे जातील तेथे त्यांच्या कामाचा ठसा निर्माण
करून सोडतात. नामदार आहेत आणि विनोद तावडे दमदारही आहेत ते या
महाराज्याचे महाराष्ट्राचे शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, अल्पसंख्यांक
विकास व औकाफ, क्रीडा आणि युवक कल्याण, सांस्कृतिक कार्य आणि
मराठी भाषा या खात्यांचे पूर्णवेळ मंत्री आहेत. हा अंक इतरांनी वाचायला
अजिबात हरकत नाही पण बोरिवलीच्या मतदारांना सतत सहकार्य करणारे
विनोद तावडे नेमके कसे, त्यांना व्यापक ठाऊक नसावे म्हणून तावडे नेमके हुबेहूब
जसेच्या तसे त्यांच्यासमोर मला आणायचे आहेत, उभे करायचे आहेत….
मित्रहो, तावडे सार्वजनिक सामाजिक राजकीय स्तरावर झपाटलेले व्यक्तिमत्व आहे,
हे तुम्हाला या राज्याला किंवा त्यांच्या मतदारांनाही सांगणे म्हणजे मोटारगाडीला
चार चाके असतात किंवा सुनील तटकरे हे रोह्याचे आहेत हे त्यांच्या मतदारांना
सांगण्यासारखे. समजा रोहा विधानसभा परिक्षेत्रातल्या मतदारांना जाऊन सांगितले
कि तुमचे आमदार सुनील तटकरे हे मुंबईचे नाहीत, रोह्याचे आहेत तर मतदार
म्हणतील ते तर आम्हालाही माहित आहे पण ते येथे कधीतरी आणि मुंबईत ठाण
मांडून बसलेले असतात म्हणून आम्ही आता ज्याला त्याला सांगत सुटलोय, तिकडे
मुंबईत तटकरे दिसले रे दिसले कि कृपया त्यांना येथे आणून सोडा, अर्थात रोहेकर
आता वृत्तपत्रातून आव्हानही करणार आहेत कि, श्री सुनिलजी तुम्ही जेथे आणि जसे
असाल तेथून इकडे रोह्याला ताबडतोब निघून या, आम्ही सारे चिंतेत आहोत…
बोरिवलीतील पूर्व आणि पश्चिम भाग, तिकडे कांदिवली पूर्वेकडील काही भाग,
अगदी पार गोराई, मनोरी, चारकोप म्हणजे पार समुद्रापर्यंत विनोद तावडे यांचा हा
अतिविस्तीर्ण असा विधानसभा मतदारसंघ. या मतदार संघात राहणारा त्यांचा
कार्यकर्ता मग तो बंगल्यातील किंवा अति महागड्या सदनिकेतला धनाढ्य असो,
मध्यमवर्गीय असो कि चाळीतला प्रसंगी झोपडीत राहणारा कार्यकर्ता असो, त्या त्या
भागात तावडे पायपीट करीत निघालेत कि ते या प्रत्येकाच्या घरी मुद्दाम भेट देतात,
त्यांच्या कुटुंबासमवेत बसून त्यांच्या नेमक्या समस्या जाणून घेतात आणि कुटुंबाची
ओळख करून घेतात त्यामुळे तावडे असे एकमेव नेते असावेत ज्यांना त्यांच्या प्रत्येक
कार्यकर्त्याची इत्यंभूत माहिती आणि ओळख असते शिवाय आपला आमदार आपला
नामदार आपल्या घरी येतो त्यातून जे अविस्मरणीय अनुभव तो कायम लक्षात ठेवतो,
त्याला त्याच्या कुटुंबाला विनोद तावडे नजरेसमोरून घालवणे अजिबात शक्य नसते.
प्रत्येकाच्या हृदयात आपोआप तावडे आडनावे हे नेतृत्व कायम स्वरूपी कोरलेले असते.
अहो, तावडे हे केवळ अमुक एखाद्या क्षुल्लक खात्याचे मंत्री नाहीत कि ज्यांना
फारसे काम नसल्याने ते त्या शिवराज पाटलांसारखे चार वेळा कपडे बदलवून लोकांसमोर
टापटीप पेश होण्यात आपला वेळ घालवतात. एकाचवेळी ते या राज्याच्या विविध खात्यांचे
मंत्री आहेत, भाजपचे जरी वयाने वाटत नसले तरी ज्येष्ठ बुजुर्ग श्रेष्ठ अनुभवी संघटनकुशल
नेते आहेत आणि त्याचवेळी अवाढव्य बोरिवली मतदारसंघाचे आमदार, लोकप्रतिनिधी देखील
आहेत. दिवसाचे 24 तास कमी पाडावेत एवढी मोठी जबाबदारी त्यांच्यावर पण तावडे चिडलेले
आहेत अस्वस्थ आहेत थकलेले दमलेले आहेत, दरदिवशी भेटणाऱ्या हजारो मंडळींना ते
टाळताहेत, त्रासिक रंगीत कपाळावर आठ्या पडून नाईलाजाने लोकांना भेटताहेत, रागवताहेत
असे कधीही होत नाहीत, तावडे सत्तेत असोत अथवा विरोधात, गर्दी त्यांच्या कायम पाचवीला
पुजलेली मात्र शेवटच्या माणसाचे समाधान होईपर्यंत मंत्री विनोदजी तावडे मधूनच एखाद्या
जादूगारासारखे गायब झालेत आणि भेटणारे न भेटता आल्याने त्यांना शिव्याशाप देऊन
दातओठ खात निघून गेलेत असे ना कधी झाले ना कधी होते….
अत्यंत महत्वाचा मुद्दा या अंकनिमित्ते मला तुमच्यासमोर आणायचा आहे, मांडायचा आहे.
सांस्कृतिक चळवळ म्हणजे मध्य मुंबई किंवा पुणे किंवा बोटावर मोजण्याएवढ्या भागांची
या राज्यातली मक्तेदारी असे जे चित्र आपल्यासमोर उभे होते, तावडे आणि त्यांच्या टीमने
आता ते खोडून काढले आहे. आता मी नामदार झालो आहे, भेटायचे असेल तर या दूरवर
मंत्रालयात असे तावडेंचे अजिबात सांगणे नसते उलट तू एवढ्या दूर का आलास तेथेच आपण
भेटलो तेव्हा काम का सांगितले नाहीस तावडे दूर आलेल्या कार्यकर्त्याला असे प्रेमाने दमात
घेतात आणि त्याने आणलेले काम तेथल्या तेथे निर्णय घेऊन करवून देतात, काम झाले
किंवा नाही त्यावर ते पाठपुरावा करून संबंधित स्टाफला हमखास विचारतात. महत्वाचे
म्हणजे बोरिवली कांदिवली क्षेत्र यापुढे या राज्याची सांस्कृतिक चळवळ म्हणून तुमच्यासमोर
पाय पसरतोय हे नेमके लक्षात घ्या. तुम्हा आम्हाला वाटते, बोरिवली कांदिवली फक्त गुजराथी
लोकांची, असे अजिबात नाही, मराठी मतदार देखील येथे तोडीस तोड थोडक्यात फार मोठ्या
प्रमाणावर तेथे मराठीची संख्या आहे, गुजराथी आणि मराठी दोन्ही समाज सांस्कृतिक चळवळीत
आवडीने, हिरिरीने भाग घेणारा, नेमके हे लक्षात घेऊन विविध भव्य स्पर्धांच्या माध्यमातून तावडे या
चळवळीला व्यापक स्वरूप आणि भव्य आकार देताहेत….
सत्ता हाती आल्यानंतर केवळ स्वतःच्या कुटुंबाचा विचार डोक्यात ठेवून जर आमदार किंवा नामदार
आपल्याच विश्वात रमणे पसंत करणार असतील तर हे असे मोजणे डोक्यात हवा जाणे थोडक्यात
सत्तेची मस्ती मस्तकात जाणे केव्हाही त्या त्या नेत्याला अत्यंत धोक्याचे. तावडे राजकारणातले प्रदीर्घ
अनुभवी असे नेतृत्व त्यातून त्यांना आलेली प्रगल्भता, त्यांना भेटलेकी ते जाणवते, माणूस त्यांच्याशी
बोलतांना किंवा त्याच्याबरोबर चालतांना आपोआप तावडेमय होतो. मुख्य म्हणजे त्यांचे या
राज्यातल्या विविध नेत्यांशीही संबंध अत्यंत जवळचे पण जेव्हा म्हणून त्यांना आपल्या पक्षाची बाजू
घायची असते तेथे त्यांनी जपलेली मैत्री बाजूला पडून सर्वांना दिसते त्यांच्यातली आक्रमकता आणि
धडाकेबाज चोख उत्तर देण्याची पद्धत, थोडक्यात, नेमके नेतृत्व म्हणजे विनोद तावडे….