दोन प्रकारच्या काचा असतात, पारदर्शी दिसणाऱ्या पण नसणाऱ्या आणि खरोखरी पारदर्शी असणाऱ्या. फडणवीस यांच्याकडून आता आम्हाला पारदर्शी असणाऱ्या काचेसारखे राज्य हवे आहे केवळ पारदर्शी दिसणे किंवा पारदर्शी आहोत हे ठासून सांगणे महत्वाचे नाही त्यासाठी हि युती टिकली तर नजीकच्या काळात फडणवीस यांना मोठ्या प्रमाणावर मंत्रिमंडळात फेरबदल करणे आवश्यक ठरणार आहे, फडणवीस किंवा मुनगंटीवार, रावते, बावनकुळे इत्यादी मोजून चार दोन मंत्री सोडले तर प्रशासनावर वचक असलेले मंत्री या युती सरकारात अजिबात नाहीत, आहेत ते सारे चंद्रकांत पाटील, म्हणजे मोस्ट फेल्युअर मंत्री किंवा मोस्ट खादाड मंत्री म्हणजे वेश्या पोटच्या मुलीस कशी सांगू शकेल कि धंदा घेऊ नको, एकालाच पकडून लग्न करून मोकळी हो, हे असे अनेक मंत्र्यांचे थोडक्यात स्वतः धंदा घेणारे किंवा मंत्रिपद म्हणजे कमाईचे साधन म्हणून बघणारे कसे प्रश्नावर पकड ठेवू शकतील, एकदा का शासनात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, कंत्राटदारांना, दलालांना, मंत्री स्टाफला किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळले कि मंत्री खाणारा आहे, एकदम चिप आहे कि खेळ खल्लास होतो, फडणवीस मंत्री मंडळात असे अनेकांचे आहे, खात्यावर त्या चंद्रकांत पाटलांसारखी कमांड नाही त्यामुळे फेरबदल अत्यावश्यक आहे. मी हवेत बार सोडणार पत्रकार नाही जेव्हा येथे म्हणालोय, चंद्रकांत मंत्री म्हणून एकदम बोगस आणि फेल्युअर, ते नक्कीच नजीकच्या काळात सिद्ध करून सोडेन अगदी पुराव्यांसहित, ह्या माणसाने त्याच्याकडे असलेल्या खात्याची वाट लावलेली आहे म्हणून पोटतिडकीने येथे सांगत सुटलोय, लवकरच सिद्ध करेन. विशेष म्हणजे अमित शाह यांच्या या लाडकोबाचे जेव्हा अधून मधून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाव पुढे येते, जे नेते चंद्रकांत पाटलांचे नाव पुढे करतात त्यांना शंभर माराव्या आणि एक मोजावी हे राजकीय अभ्यासकांना हमखास वाटते….
काही मित्र चालू आणि चतुर असतात, ते स्वतःची बायको पद्धतशीर सांभाळतात, घरात झाकून ठेवतात, तिच्या चेहऱ्यावर कायम बुरखा पांघरून तिला पडद्याआड ठेवतात आणि मित्रांच्या बायकांना पटवून मोकळे होतात, आपली घरातल्या आतल्या खोलीत झाकून ठेवायची, बाहेर मजा मारायची, अशा या चालू मित्रांना दुसऱ्याची देखणी प्रेयसी, बायको नेमकी कशी पटवायची माहित असते, वास्तविक हि अशा चालू मित्रांची मानसिक विकृती पण असे विकृत दुर्दैवाने आपल्याकडे पावला पावलावर आहेत, अशा या चालू मित्रांची मी येथे या राज्याच्या जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांच्याशी तुलना करणार आहेत, दुसऱ्याची बायको, प्रेयसी किंवा मैत्रीण पटवून महाजन मोकळे होतात किंवा नाही मला अलीकडे त्यांच्याबाबतीत फारसे ठाऊक नाही पण येथे महाजन यांना दुसऱ्याची बायको किंवा प्रेयसी पटवणाऱ्या चालू मित्राची यासाठी उपमा देणार आहे कि त्यांनी मंत्री म्हणून जे केले ते याच पद्धतीने केले म्हणजे चांगले काम केले पण जे काम आरोग्य मंत्री म्हणून डॉ. दीपक सावंत यांनी करायला हवे होते ते काम गिरीश महाजन करून मोकळे झाले. आरोग्य खात्याची यंत्रणा नियोजनबद्ध राबवून डॉ. तात्याराव लहाने यांच्यासारख्या समाजसेवेची आवड असणाऱ्या डॉक्टरांना हाताशी धरून गिरीश महाजन यांनी विशेषतः त्यांच्या विधानसभा मतदार संघात, जळगाव जिल्ह्यात किंवा विविध ठिकाणी जे महाकाय आणि अत्यंत यशस्वी असे आरोग्य शिबिरे घेऊन ज्यापद्धतीने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले, राजकारणांसारख्या गलिच्छ आणि पापी क्षेत्रात राहूनही हे जे अतिशय सेवाभावी कार्य शिबिराचा मोफत आनंद देणारे काम त्यांच्या हातून घडले, जा गिरीशभाऊ, तुम्हाला आमच्याकडून सारी लफडी माफ….
आता तुमच्या लक्षात आले असेल कि मी दीपक सावंत यांना आपली सुरेख मैत्रीण गिरीश महाजन यांच्या आपणहून गळ्यात बांधून देणारा मंत्री म्हणून का चिडविले आहे. गिरीश महाजन महाकाय अवाढव्य आरोग्य शिबिरे जळगावात घेत असतील तर मी अशी शिबिरे राज्याच्या कानाकोपऱ्यात घेऊन शिवसेना घरोघरी राहणाऱ्या हृदयात पोहचवून मोकळा होईल हे दीपक सावंत यांनी एखाद्या हिरो सारखी शपथ घेऊन करून दाखवायला हवे होते, अजूनही वेळ गेलेली नाही, हि युती नजीकच्या भविष्यात टिकली तर दिपकजी कामाला लागा आणि आपल्या खात्याचा सकारात्मक उपयोग करवून घ्या, शिवसेनेचे राज्यातले लोकांच्या हृदयातून मनातून ढासळेलेले स्थान पुन्हा मिळविण्यात तुम्ही आणि तुमचे खाते मोलाची कामगिरीतुन पार पाडू शकते. खाते तुमचे पण मोठ्या युक्तीने खुबीने राबविले त्या गिरीश महाजन यांनी, निदान यापुढे तरी असे घडता काम नये, आता तरी कामाला लागा, एक समाजसेवी आणि लोकांच्या गळ्यातला ताईत असलेला मंत्री म्हणून त्या दिवाकर रावते यांच्यापुढे जाऊन दाखवा, सेनेत असूनही ‘ कदम कदम ‘ पर पैशांसाठी वखवख करणारे, केवळ त्यासाठी मंत्रिपद हा विचार डोक्यात ठेवून वागणारे तुम्ही फार खादाड मंत्री आहेत, अशी नावे ठेवण्याच्या नालायकीचे तुम्ही नाहीत असे अद्याप माझे मत आहे, सध्या तुम्हाला मागच्या दाराने विधानभवनात यावे लागते, उद्या हे कार्य यशस्वी करून दाखविलेत तर या राज्यातल्या कुठल्याही मतदारसंघातून तुम्ही थेट लोकांचे आमदार म्हणून निवडून याल म्हणून उठा आणि युती टिकली तर कामाला लागा….