अत्यंत महत्वाचे सांगतो, कुठल्याही क्षेत्रातली माणसे आभाळाला टेकल्यानंतर म्हणजे अशी माणसे जेव्हा व्यवसायात, अभिनयात, राजकरणात अन्य कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग शिखर, कळस गाठतात, मिळालेल्या अमाप यशानंतर जर अशी माणसे हाताखाली, सभोवताली उर्मट, करप्ट, भानगडबाज, अर्धवट विचारांचे सवंगडी मित्र पिए कार्यालयीन स्टाफ, नातेवाईक जमा,गोळा करीत असतील तर उत्तुंग शिखर गाठलेल्या महापुरुषाचा ह्रास व्हायला, त्याची संपत्ती नाश पावण्यास, बदनामी होण्यास, कुटुंब कलहाची सुरुवात होण्यास वेळ लागत नाही, मूर्ख माणसे आपल्या दरबारात पाळली कि आयुष्यात उत्तुंग शिखर गाठलेल्या महा पुरुषास खाली खेचण्यासाठी कोणत्याही शत्रूची किंवा विरोधकांची आवश्यकता उरत नाही, जवळ जमलेले हुजरे आपले काम फत्ते करतात….
आम्हा पत्रकारांना या राज्यातल्या अमुक एखाद्या महापुरुषाच्या शेजारी जागा मिळविणे अजिबात कठीण नसते, आणि असे शेजारचे स्थान मिळविण्यासाठी आमच्यातल्या बहुतेकांची केविलवाणी, लाजिरवाणी, स्वाभिमान सोडून लाचारी पत्करायला लावणारी धडपड सतत सुरु असते. अमुक एखाद्या पत्रकाराला वर्ष बंगल्यावर चहा पोहे मिळाले कि तो ते गावभर सांगून पैसे मिळवून देणारी कामे भराभर त्या भरवशावर करवून घेतो पण बदनाम होतो त्या त्या वेळी गादीवर बसलेला मुख्यमंत्री. एक विशिष्ट अंतर राखून जे निधडे पत्रकार आहेत त्यांनी आपली पत्रकारिता करायला हवी. निखिल वागले किंवा मी हेमंत जोशी अमुक एखाद्याला चिटकून बसलोय, कधी बघितलेत का, मी विदर्भातला आहे म्हणून मी फडणवीसांना चिपकून बसलो तरच त्यांच्या जवळचा, असा गांडू हलकट विचार माझ्या मनात आजतागायत कुठल्याही सत्ताधीशांच्या बाबतीत आला नाही. च्यायला, एक असा पत्रकार मी बघत आलोय, बसता उठता ज्याला त्याला एकेरी नावाने आवाज देऊन, उल्लेख करून दादागिरीने खाजगी मलिद्याची कामे करवून घेतो, येऊ द्या ती वेळ, त्याची शंभर लफडी तुम्हाला सांगून मोकळा होईन, हलकट कुठले, कवडीची अक्कल नसतांना पत्रकारिता रंडीछाप पद्धतीने करून मोकळे होतात….
वाचकहो, आमच्या या मंत्रालयात असा पत्रकार मी बघितला आहे कि फक्त आणि फक्त पैसे मिळविण्याच्या हव्यासापोटी हा बिलंदर पत्रकार ज्यांच्याकडे सत्ता त्यातल्या पॉवरफुल नेत्याशी जवळीक करतो, अशा मोठ्या व्यक्तीला तो फास टाकून पूर्णतः जाळ्यात अडकवतो, एकदा असा बडा मासा जाळ्यात अडकला कि याचे काम फत्ते, हा पत्रकार पैसे मिळवून देणारी कामे अशा बड्या माशाकडून करवून करवून घेतो आणि बडा मासा मात्र याच्या नदी लागून नजीकच्या काही वर्षानंतर देशोधडीला लागतो. एक अत्यंत महत्वाचे तेवढे लक्षात ठेवा, करिअरला वाहून घेतलेल्या जातीं देसाई, भाऊ तोरसेकर सारख्या ऋषितुल्य पत्रकारांना वाचकायचे असते, मंत्रालयात असोत कि अन्य कुठेही जे तुम्हाला ब्लॅकमेल करून आपले खिसे गरम करण्या तुमच्याकडे येतील, अशी नावे माझ्याकडे द्या, बघा पुढल्या काही दिवसात ते कसे सरळ वागतील तुमच्याशी. तर या पत्रकाराने आणि त्याच्या पत्रकारितेतल्याच एका साथीदाराने दिवंगत आर आर पाटलांना व्यवस्थित आधी जाळ्यात ओढले, तदनंतर त्याने आर आर आबा यांच्यासभोवताली आपल्या माणसांचे एक कडबोळे निर्माण केले आणि आबांच्या नावाने कधी बदल्यांमध्ये तर कधी विविध फाईल्स क्लिअर करून तर कधी ब्लॅक मेलिंग करून त्याने आणि त्याच्या कंपूने करोडो रुपयांची माया जमा केली, विद्देशेष म्हणजे या गॅंग मधला एक अतिशय भामटा, बेरकी, करप्ट पत्रकार सध्या थेट माननीय मुख्यमंत्र्यांच्या सभोवताली जागा बळकावून बसला आहे….
आर आर आबा पाटलांना या जगातून थेट स्वर्गात सोडून आल्यानंतर आता करायचे काय,हा प्रश्न या उध्दट, वात्रट, ब्लॅकमेलर पत्रकाराला फार काळ पडला नाही, त्यानंतर युतीची सत्ता आली आणि आर आर आबा जसे आघाडीच्या काळात पॉवरफुल मंत्री होते किंबहुना आबा यांच्यापेक्षा राज्यात, मंत्रिमंडळात कितीतरी पट अधिक दरारा, सत्ता, महत्वाची खाती असलेल्या मंत्र्याकडे म्हणजे एकनाथ खडसे यांच्याकडे मग या भामट्या लबाड, हलकट पत्रकाराने आपला मोर्चा वळविला आणि खडसे तसेच त्यांच्या डोकेदुखी ठरलेल्या अतीभ्रष्ट स्टाफला या वाह्यात, संधीसाधू पत्रकाराने आपला मोर्चा वळविला, आधी जाळ्यात ओढले नंतर पॉवरफुल एकनाथ खडसे यांना वापरून दोन्ही हातात मावणार नाही एवढे प्रचंड, अतिप्रचंड त्याने खडसे यांना घालवेपर्यंत दरदिवशी थोडक्यात दोन्ही करांनी मिळविले. ह्या बेरकी पत्रकाराच्या आहारी जो जातो तो पुढल्या काही महिन्यात फारतर चार दोन वर्षात आयुष्यातून उठला म्हणून समजा. युतीच्या मंडळींना, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हणजे हे असे केवळ स्वतःसाठी ‘ अतुलनीय ‘ काम करणाऱ्या या महाबिलंदर पत्रकाराचा आता बसता उठता मुक्काम असतो तो विधान परिषद विरोधी पक्ष नेत्यांकडे म्हणजे सत्ताधाऱ्यांना पुरून उडणाऱ्या एकमेव जबरदस्त युवा नेत्याकडे, त्या धनंजय मुंडे यांच्याकडे….
विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे हेही खडसे किंवा आर आर आबा या दोघांप्रमाणे लोकप्रियतेच्या रांगेत जाऊन बसलेले, पंकजा मुंडे
असोत कि युतीचे नेते, त्यापुढे जाऊन हे म्हणता येईल कि मुंडे यांना जे मोठे यश अल्पावधीत मिळालेले आहे, ते बघून मुंडे यांना काँग्रेस मध्ये आणि
त्यांच्या राष्ट्रवादी पक्षातही असंख्य विरोधक निर्माण झालेले आहेत, त्या सर्वांसाठी आनंदाची बातमी हि कि हे महाशय यादिवसात बसता उठता मुंडे यांच्याकडे मुक्काम ठोकून असल्याने नजीकच्या काळात मिळविलेली प्रचंड लोकप्रियता धनंजय मुंडे अधोगतीला लागल्यास मला आश्चर्य वाटणार नाही आणि धनंजय विरोधकांची हि अतिशय आनंदाची बातमी आहे, पंकजा यांनी तर ह्यो पत्रकार यादिवसात धनंजय यांच्याकडे जाऊन बसत असल्याने सकाळी उठल्यानंतर स्वभोताली न चुकता आनंदाने गिरक्या घ्याव्यात, खासदार भगिनीसंगे झिम्मा फुगडी खेळावी, कारण लवकरच जर हे पत्रकार महाशय धनंजय यांच्या संगतीला आणि पंक्तीला असेच नियमित नेहमीप्रमाणे उठबैस करू लागले तर तो काळ मुंडे भगिनींसाठी दूर नाही, ज्या दिवशी त्या हत्तीवरून साखर वाटून मोकळ्या होतील….
या पत्रकाराला वाटल्यास हिंदी सिनेमातली ‘ रेखा ‘ म्हणा, तिच्या जो प्रेमात पडला तो आयुष्यातून उठला, अमिताभ तेवढा त्या खडसेंसारखा वाचला पण तिकडे खडसे आणि इकडे अमिताभ दरदिवशी खिसे भरभरून औषधी गोळ्या खाऊन खाऊन कसेबसे जगतात, आर आर आबा अनपेक्षित वर गेले, ज्यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडत होती त्या खडसे यांच्याशी आजचे मुख्यमंत्री भर मंचकावर देखील बोलण्याचे टाळतात एवढे खडसे राजकारणातून बाजूला झाले, धनंजयभाऊ तुम्ही तेवढे सावधान…..!!
एक युक्ती हा लेख संपवितांना सांगतो म्हणजे माझ्या ज्या मित्रांना निद्रानाश जडला आहे त्यांची मी नेहमी एखाद्या नवकवीशी ओळख करून देतो, मग हा नवकवी बसता उठता निद्रानाश जाडलेल्याला केलेल्या कविता ऐकवतो. या माझ्या नॅचरोपॅथीचा असर लगेच दिसतो, निद्रानाश दूर होऊन माणूस चक्कघोरायला लागतो. तुमच्यातल्या ज्याला कोणाला सत्तेत बसलेल्या, असलेल्या नेत्याबद्दल राग, असूया, जेलसी असेल, तुम्ही एकच करायचे आहे, वर उल्लेख केलेल्या या बिलंदर पत्रकाराची तुमच्या विरोधकांशी ओळख करून द्यायचा अवकाश, बघा त्याचा पुढल्या काही महिन्यात आर आर आबा किंवा एकनाथ खडसे कसा होतो ते…