पवारांची बांग : पत्रकार हेमंत जोशी
इस्लाम खतरेमें है, अशी एकदा का बांग दिली कि जे धर्मांध, पाकधार्जिणे, वंदे मातरम न म्हणणारे, देशद्रोही, देश विघातक कारवायात सहभागी होणारे, दंगा फसाद करणारे मुसलमान आहेत ते एकत्र येतात आणि देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण करतात. जे मुस्लिम स्वतःला भारतीय समजतात, येथल्या मुख्य प्रवाहात समरसून गेलेले आहेत, पाकधार्जिणे किंवा देशद्रोही नाहीत, सुविचारी आहेत ते मात्र अशा बांगेला ओ देत नाहीत, रिस्पॉन्स करत नाहीत, अशा बांगेपासून चार हात स्वतःला दूर ठेवतात. जे या देशातल्या धर्मांध मुसलमानांचे तेच या राज्यातल्या संधीसाधू मराठा पुढाऱ्यांचे, ते राजकीय संकटात सापडले कि समाजाला बांग देतातआणि राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करतात, त्यांच्या या बांगेला जे ओ देणारे असतात ते या समाजातले लुटारू पुढारी, भ्रष्ट अधिकारी आणि राज्याला लुटणारे कंत्राटदार किंवा दलाल असतात.
जो शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात असतो, जो दारिद्र्याने पछाडलेला आहे असा कोणताही सामान्य माणूस त्यांच्या या बांगेला अजिबात रिस्पॉन्स करीत नाही. शिवसेना आणि भाजपा मराठ्यांची नाही हे सांगत सुटणारे तद्दन अतीभ्रष्ट नेते सत्तेपासून दूर आहेत म्हणून अस्वस्थ आहेत. हिंदी सिनेमातले पंचतारांकित हिरो जसे सिनेमाचा शॉट देण्यापुरते उन्हातान्हात उभे राहून तेवढ्यापुरता अभिनय करतात, ते तसेच या काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधल्या नेत्यांचे वागणे आणि त्यांची दैनंदिनी, अंगावर दोन दोन लाखांचे ड्रेस घालून आणि हातावर दहा दहा लाख रुपयांचे घड्याळे एरवी बांधून शान मारीत फिरणारे अनिल देशमुखांसारखे मंत्री असतांना हे राज्य लुटून खाणारे नेते जेव्हा सिनेमातल्या शॉट सारखे तेवढ्यापुरती पदयात्रा काढून पुन्हा एकदा सत्तेत काही जमते का, यासाठी केविलवाणा प्रयत्न करतात तेव्हा या राज्यातल्या होरपळलेल्या मराठ्यांनी, शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी या अशा बिलंदर पुढाऱ्यांना कम दलालांना भर चौकात त्यांना उभे करून आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या सांगावे. हे जे काय त्या अशोक चव्हाणांसारखे राज्य बुडवे नेते जेव्हा पदयात्रेचे ढोंग करतात तेव्हा शरद पवारांना हेच सांगावेसे वाटते कि निदान आयुष्याच्या संध्याकाळी तरी अजित पवार यांच्यासारख्या पंचतारांकित राज्यबुडव्या नेत्यांना घरी पाठवा किंवा वठणीवर आणा. हे असले राज्यद्रोही नेते निदान मराठ्यांचे जरी झाले असते तरी आम्ही त्यांच्या डोक्यावरून आरत्या ओवळल्या असत्या पण हिम्मत असेल तर फार माझ्यासंगे विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेतातून फिरायला चला. माझी शेती खामगाव नजीकच्या शिवारात आहे, अधून मधून तेथे जाणे होते, माझ्या शेतीला लागून बहुतेक मराठा समाजाच्या शेतकऱ्यांनीच शेती आहे, त्यांच्या आर्थिक व्यथा ऐकून अंगाची आग होते आणि ही अशी मग लेखणीतून उतरते. या राज्यातला ९९ टक्के फक्त मराठा शेतकरी का आत्महत्या करून मोकळा होतो, तुमच्या ते लक्षात येईल.सतत १५ वर्षे या राज्याचे बांधकाम खाते, जलसंधारण खाते, वीज खाते, महसूल खाते आघाडीच्या काळातल्या मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी जर आपापली घरे भरण्यासाठी रांडेसारखे वापरले नसते तर हे महाराष्ट्र राज्य अमेरिकेच्या पुढे निघून गेले असते…
कधी कधी मला खरोखरी अतिशय आदरणीय असलेल्या शरद पवार यांच्याविषयी आश्चर्य वाटते. अलीकडे कुठल्याशा भाषणातून पवारसाहेब म्हणाले कि दुष्काळाची दाहकता पाहून मला रात्रभर झोप आली नाही आणि त्याचदरम्यान कानावर बातमी आली आणि फोटोही बघण्यात आला, कि पवारसाहेब बारामतीच्या हिरव्यागार क्रिकेट मैदानावर उभे आहेत आणि हे मैदान केवळ आठ दिवसात हिरवेगार करण्यासाठी म्हणे स्वित्झर्लंडवरून तब्बल दोन कोटी रुपयांचे गावात आणून त्या मैदानावर अंथरण्यात आले आहे कारण काय तर न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे जेथे पाणी तेथेच अमाप समाप कमाई करून देणारे आयपीलचे सामने भरविण्यात यावेत. एकाचवेळी या अशा दुहेरी भूमिका, म्हणून या राज्यातल्या तुमच्या हक्काच्या मतदारांनीही तुम्हाला दूर केले आहे….
अपूर्ण :