सामंत दणाणून सोडा आसमंत : पत्रकार हेमंत जोशी
जे अति होते त्यामागे लागायचे असे आमचे पत्रकारितेतील सूत्र आहे, अनेकांची अनेक गुपिते अगदी पुराव्यांसहित आमच्याकडे असतात, सारेच पुरावे उघड करावीत असे नसते अन्यथा कोणी मित्रच आम्हाला उरणार नाहीत जसे बिहारचे पोलीस मुंबईत आल्यानंतर रिया चक्रवर्ती अर्पिता खान कडे लपून बसलेली होती त्यामुळे अर्णब गोस्वामी जेव्हा उघड सलमान खानचे नाव घेतोय म्हटल्यावर मनास बरे वाटले, ज्या कुटुंबाचा ड्रग्स वर्तुळाशी अगदी जवळचा संबन्ध आहे त्याचे नाव अर्णब उघड करतोय म्हटल्यावर मनस्वी आनंद तो होणारच. पण त्याच सलमान खान याच्या गेली काही दिवस दोन वेगवेगळ्या महागड्या जाहिराती अर्णब च्या वाहिनीवर बघून नाही म्हणायला पोटात कसेतरी नक्की होते आहे, बघूया, अर्णब थांबतो कि सलमान विरुद्धची लढाई पुढे सुरु ठेवतो. अर्नब गोस्वामीचा नालायक नीच राजदीप सरदेसाई होऊ नये हे मात्र मनापासून प्रत्येक भारतीयांना वाटते आहे. तर मी तुम्हाला वर सांगत होतो कि कळलेली सारी गुपिते फोडायची नसतात अन्यथा मग कोणीही तुम्हाला जवळ उभे करीत नाही. याठिकाणी मला राज्याचे शिक्षण मंत्री रत्नागिरीचे अफाट लोकप्रिय आमदार शिवसेना पक्षाची विशेषतः अख्ख्या कोकणातली मोठी ताकद सळसळता उत्साह बोलक्या स्वभावाचे हसतमुख चेहऱ्याचे कायम लोकांमध्ये मिसळणारे आणि रमणारे उद्योगपती बुद्धिमान राजकारणी श्रीमान उदय सामंत यांची आठवण का झाली ते सांगतो…
सात आठ वर्षांपूर्वीचा हा प्रसंग. त्यावेळी उदय सामंत राष्ट्रवादीचे रत्नागिरीतलेच आमदार होते विशेषतः उदय यांचे त्यांच्या कुटुंबाचे नाट्यवेड त्यावेळी अध्यक्ष अभिनेते मोहन जोशी यांनी नाट्य परिषदेचे संमेलन रत्नागिरीला घ्यायचे असे ठरविले. मला निर्मात्या अभिनेत्री माझी जवळची सखी कांचन अधिकारी यांचा फोन आला, हेमंत आपण एकत्र गप्पा मारत रत्नागिरीला जाऊ या का, मी हो म्हणालो आणि माझ्या कार ने आम्ही तिघे म्हणजे मी, कांचन आणि माझे सार्वजनिक बांधकाम खात्यातले अभियंता जवळचे मित्र मिलिंद बच्चेवार तिघेही मनमोकळ्या धम्माल गप्पा मारत मारत रत्नागिरीला पोहोचलो. कांचन अधिकारी आणि मिलिंद बच्चेवार दोघेही तसे बोलण्यात अघळ पघळ त्यामुळे आमचा तो प्रवास अविस्मरणीय ठरला अनेक गुपिते मला या अशा गप्पांमधून कायम कळत आलेली आहेत. रत्नागिरीचा राजा म्हणजे उदय सामंत रत्नागिरीचा सर्वाधिक लाडका आणि आवडता नेता म्हणजे उदय सामंत त्यामुळे अख्खे रत्नागिरी शहर जणू आलेल्या प्रत्यकाचे कित्येकांचे घरी आलेल्या पाहुण्यांसारखे स्वागत करतांना मला दिसत होता. तेथली भोजन व्यवस्था राहण्याची सोय सारे काही पंचतारांकित त्यामुळे आलेली सारी मराठी चित्रपटसृष्टी, जमलेली मान्यवर मंडळी अगदी मनापासून सुखावली होती आनंदली होती, एखादा नेता सतत तेही आमदारकीला उगाच का निवडुन येतो, त्याचे काम कार्य प्रगती सारे काही स्थानिक मतदार उघड्या डोळ्यांनी बघत असतात म्हणून गेली दिड दोन दशके उदय सामंत रत्नागिरी जिल्ह्याचे यशस्वी नेतृत्व करतो आहे, पक्ष कोणता हे त्याच्यासाठी गौण आहे कारण मतदार त्याच्या कामगिरीवर फिदा आहेत, असतात…
येथे मी उदय सामंत यांचा एकेरी उल्लेख केला आहे आणि राज्याचे सध्याचे राजकारण एकेरी उल्लेखावर गाजते आहे गांजते आहे त्यावर मला येथे काहीतरी सांगायचे आहे. वाचकहो, या राज्याचे असे कितीततरी मान्यवर नेते होते किंवा आजही आहेत कि ज्यांच्यापैकी अनेकांचा त्यांच्या नावामुळे आणि वागण्या बोलण्यामुळे काहींचा एकेरी तर काहींचा थेट त्यांच्या करिअरच्या सुरुवातीपासून आदरयुक्त शब्दांनी उल्लेख होतो किंवा तसे त्यांचे नाव घेतल्या जाते म्हणजे जेव्हा अजित पवार यांना राजकारणात ओ का ठो कळत नव्हते तेव्हापासुन त्यांना अजितदादा म्हटल्या जाते किंवा विलास देशमुख यांना विलासराव म्हटल्या जायचे पण काही नेते असे असतात कि जे त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकाला आपल्या घरातले एक सदस्य वाटतात, कुटुंब सदस्य असे ज्या नेत्यांनी घराघरात स्वतःचे नाते निर्माण केलेले असते, त्यांच्यापैकी बहुतेकांना एकेरी नावाने ओळखल्या किंवा हाक मारल्या जाते विशेष म्हणजे अशा नेत्यांना आपला एकेरी उल्लेख होतो याचे वाईट वाटत नाही तर कौतूक असते आणि त्यावर उदय सामंत उद्धव ठाकरे सुनील तटकरे देवेंद्र फडणवीस अशी बहुसंख्य उदाहरणे आहेत. देवेंद्र तर या राज्याचे मुख्यमंत्री होते पण जो तो त्यांना देवेंद्र या एकेरी नावाने अगदी तोंडावर किंवा त्यांच्या पाठी उल्लेख करून मोकळा होई उलट कोणी देवेंद्र यांना फडणवीस साहेब म्हटले तर ते त्यांना स्वतःला देखील अवघडल्यासारखे होते किंवा होत असे तेच उदय सामंत यांचे, आजपर्यंत उदय तीन वेळा आमदार झाले तीन वेळा राज्यमंत्री मंत्री झाले अनेक महत्वाची मोठी पदे त्यांनी उपभोगली पण जे जे या राज्यातले किंवा त्यांच्या मतदारसंघातले त्यांना ओळखतात ते सारे उदय असे एकेरी नावानेच त्यांचा उल्लेख करतात त्यातून उदय हे प्रत्येकाच्या घरातले जणू एक सदस्य असाच त्यातून अर्थ निघतो आणि हेच मला नेमके उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत येथे सांगायचे आहे ते उद्या देशाचे पंतप्रधान जरी झालेत तरी जो तो मराठी माणूस त्यांचा एकेरीच उल्लेख करणार आहे कारण उद्धव हे प्रत्येकाला आपल्यातलेच एक वाटतात. तयामुळे अर्णब गोस्वामी किंवा कंगना राणावत इत्यादींना देखील उद्धव हे त्यांच्या घरातले एक सदस्य वाटत असावेत अशी स्वतःची समजूत करवून घेऊन आपण तूर्त या विषयाकडे दुर्लक्ष करूया आणि कोरोना महामारी कशी संपेल ते बघूया कि….
उदय सामंत यांचे मोठे सिक्रेट मी फोडणार पण पुढल्या भागात, तूर्त एवढेच : हेमंत जोशी