अयोध्या : माधव भांडारी
तुमच्या माझ्या सभोवताली अशा काही तरुणी असतात कि ज्या देखण्या असतात चिकण्या असतात उफाड्या असतात रूपवान गुणवान धनवान असतात पण काही केल्या त्यांचे लग्न जुळत नाही होत नाही. वय संपते पाळी जाते तरीही त्यांचे काही केल्या जुळत नाही पुढे तर त्या एखाद्या अतृप्त आंत्म्यासारख्या फिरतांना जगतांना हिंडतांना भटकतांना दिसतात कारण त्यांचे स्वप्न अधुरे राहते मन देखील इकडे तिकडे भटकत राहते अशावेळी घरातल्यांना त्यांची सतत काळजी लागून राहते आणि त्या स्वतः देखील काळजीने काळवंडून कोमेजून जातात. भाजपाचे जिगरबाज धडाकेबाज नेते आणि उत्तम प्रवक्ते श्रीमान माधव भांडारी यांचे देखील असेच वय निघून गेलेल्या उफाड्या निधड्या तरुणीसारखे झाले आहे म्हणजे तरुणीची बाई झाली किंवा तिच्या वयाच्या मुली आजी झाल्या तरी तिला मधुचंद्र कशाशी खातात जसे ठाऊक नसते तसे माधवराव भंडारी यांचे त्यांच्या वरिष्ठांनी करून ठेवले आहे, ज्या वयात आधी आमदार व्हावे नंतर लगेच नामदार व्हावे असे ज्या भांडारी यांना किंवा त्यांच्या चाहत्यांना राहून राहून वाटत होते त्यांच्यावर अन्याय केल्या गेला असे आमच्यासारख्या त्यांच्या अनेक हितचिंतकांना नक्की वाटते पण लग्न राहून गेले पद्धतीची त्यांची भलेही त्यांच्या श्रेष्ठींकडे तक्रार असेल पण लॉयल भांडारी यांनी स्वतःचा एकनाथ खडसे करून घेतला नाही याउलट आजही काहीसे अतृप्त भांडारी पूर्वीच्याच उत्साहात भाजपने टाकलेल्या जबाबदाऱ्या निभावण्या उभा महाराष्ट्र पालथा घालतात आणि अत्यंत अभ्यासपूर्ण किंवा कल्पकतेने भाजपाची कायम कधी प्रवक्ते म्हणून तर कधी विटाळ निघून गेलेल्या पोक्त बाईसारखे अत्यंत अभ्यासू भाजपा नेते म्हणून विविध वाहिन्यांवर प्रभावीपणे बाजू मांडतात कोणतेही कार्य तडीस नेतात…
राज्यात विविध पक्षाचे नेते विविध मागण्यांसाठी कायम मोर्चे काढतात, मोर्चांना गर्दी असते पण गर्दीतल्या लोकांना मोर्चा नेमका कशासाठी कोणत्या कारणांसाठी कुठल्या मागण्यांसाठी माहित नसते कारण बहुतेक मोर्चेकरी भाडोत्री असतात. थोडक्यात हनिमून शब्द देखिल पाठ नसलेल्याने थेट पलंगावर उडी घेतल्यासारखे ते असते. अलिकडल्या भाजपा विरोधी शेतकाऱ्यांच्या मोर्चात तर ज्यांना शेती किंवा खेती हा शब्द देखील धड उच्चारता येत नाही त्या भेंडी बाजारातल्या बहुसंख्य मुस्लिम महिला त्या मोर्चात अशा काही सामील झाल्या होत्या जणू त्यातल्या प्रत्येकीकडे किमान २५ एकर तरी शेती असावी त्यामुळे जेव्हा त्यांना मीडियाने हा मोर्चा कशासाठी जेव्हा विचारले तेव्हा त्यांची तेथून पळता भूइ थोडी झाली. तेच रामजन्म भूमी अयोध्या राम मंदिर या विषयांचे, अनेक हिंदूंना बहुसंख्य भाजपा कार्यकार्त्यांना देखील अयोध्या नेमके काय प्रकरण आहे, आजही ठाऊक नाही केवळ कार्यकर्ते म्हणून हि मंडळी नेत्यांच्या आंदोलनाची केवळ री ओढतांना मी तुम्ही आम्ही सारे बघतो आहे, नेमके हेच अभ्यासू बुद्धिमान लेखक आणि भाजपा नेते माधव भांडारी यांच्या ते लक्षात आले असावे, किमान हिंदूंना किंवा मराठी माणसाला तरी राममंदिर व अयोध्या हा विषय तंतोतंत माहित ज्ञात असावा त्यांना तसे नक्की वाटले असावे म्हणून ज्यांनी अयोध्या वादात सुरुवातीपासून प्रत्यक्ष भाग घेतला त्या विषयाचा सखोल अभ्यास केला त्या भांडारी यांनी अलीकडे “अयोध्या” या मथळ्याखाली सखोल अभ्यासपूर्ण व्यापक भारावून टाकणारे माहितीपूर्ण संग्राह्य असे कादंबरी वजा भव्य पुस्तकच लिहून काढले जे प्रत्येक मराठी माणसाने अवश्य वाचावे व संग्रही ठेवावे, थोडक्यात इतरांनाही वाचायला द्यावे….
वाचकमित्रहो, तुम्हाला माहित आहे का कि रामजन्मभूमी वाद गेली चाळीस वर्षे गाजतो आहे, आणि या चाळीस वर्षाच्या आंदोलनाचे एक हिस्सा आहेत माधव भांडारी , त्यांनी पायाला भिंगरी लागल्यागत या विषयावर खेडोपाडी जाऊन प्रत्यक्ष सभा घेतल्या, जनजागृती केली अर्थात असे बहुसंख्य अत्यंत ताकदीचे माधव भांडारी यांच्यासारखे प्रचंड ताकदीचे जिद्दीचे कार्यकर्ते भाजपा, रा. स्व. संघ किंवा त्यांच्या विश्व हिंदू परिषदेसारख्या परखड हिंदू संघटनांकडे होते म्हणून आज हे कार्य तडीस जात आहे. १९८४ ते आजतागायत सतत माधवराव या रामजन्मभूमी लढ्यात सक्रिय होते सक्रिय आहेत म्हणून त्यांना अयोध्या हा विषय मुखोदगत आहे थोडक्यात भांडारी हे अयोध्या विषयाचे जीते जागते भांडार आहे, असल्याने त्यांचे अयोध्या हे ग्रंथमय पुस्तक अत्यंत वाचनीय ठरले आहे म्हणजे ज्यांना अयोध्या रामजन्मभूमी राममंदिर विषय नेमके जाणून घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी तर हे पुस्तक साक्षात खजिना आहे. असे विषय तर पक्षभेद बाजूला ठेवून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात उपलब्ध करून द्यावेत. प्रत्यक्ष अनुभवातून व आंदोलनातून हा विषय भंडारी यांनी हाताळला असल्याने माणूस अयोध्या वाचतांना भान विसरतो अगदी तहान भूक देखील विसरतो. अयोध्या प्रकरणी बारीक सारीक माहिती आपल्या ओघवत्या शैलीतून माधवरावांनी अत्यंत प्रभावी व व्यापक मांडलेली आहे त्यावर त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी ठरावे. माधव भांडारी यांच्या अयोध्या या ग्रंथसदृश पुस्तकावर एखादा सिनेमा देखील निघावा…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी