कोण कसे : पत्रकार हेमंत जोशी
अविवाहित मुलीची मासिक पाळी टळली नाही, वेळेवर आली कि मुलीच्या आईला जो आनंद होतो किंवा नेहमीप्रमाणे
बायकोची पाळी टळली कि एखादा मुसलमान जसा घरभर बागडायला लागतो किंवा पाइल्सच्या पेशंटला न कुंथता, वेदनाविरहित सकाळी सकाळी सौचाला साफ झाली कि तो जसा अत्यानंदाच्या भरात देवापुढे साखर ठेवतो, हागवणीने त्रस्त व्यक्तीला सार्वजनिक शौचालय रिकामे दिसले कि त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर फुटणारे हसू हास्य, हा असा आनंद अलीकडे प्रत्येक पुणेकरांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतोय निमित्त काय तर एक जुलै पासून चितळे दुपारीही सुरु झाले आहे. विशेष म्हणजे दुपारी एकच्या ठोक्याला कितीही गर्दी असली, तरी बंद होणारे चितळे बंधू मिठाईवाले यांचे दुकान १ जुलैला दुपारी बंद झाले कि नाही याची खातरजमा करण्यासाठी त्यादिवशी पुण्यात धो धो पाऊस असूनही पुणेकरांनी अगदी ठरवुन आणि पावसाची तमा न बाळगता चितळ्यांकडे जाऊन खरेदी केली, खरंय ते, पुणेकर पटकन स्वतःवरही विश्वास ठेवत नाहीत, म्हणून पुण्यातले वयस्क न चुकता बायकोला सांगतात, समजा मी अचानक गचकलोच तर माझ्यासाठी लावलेला भात मोलकरणीला नको हो द्यायला, तोच माझ्या पिंडाला वापरशील, असे हे पुणेकर, नशीब ते पसंत केलेल्या जावयाचा लग्नानंतर अतिआवश्यक तो अवयव जशी सायकल मध्ये हवा आहे किंवा नाही आपण सायकलचे टायर हाताने दाबून चेक करतो, ती पद्धत येथेही वापरत नाहीत…
पुणेकर नेमके कसे हा जसा कायम भेडसावणारा प्रश्न आपल्या सर्वांना पडलेला असतो तो तसाच प्रश्न दिवसभरातून किमान दहा तरी भेटणारे मला विचारतात कि फडणवीस आणि त्यांचे मंत्री, राज्यमंत्री कोण कसे आहेत ते सांगा म्हणजे आम्हाला काम कसे करवून घ्यायचे ते सोपे जाईल. आपण सुरुवात अर्थात माननीय मुख्यमंत्र्यांपासून करूया, नो डाऊट, अजूनही आपले मुख्यमंत्री शाळेतल्या, वर्गातल्या सात्विक थाळीसारखे कायम चेहऱ्यावर भाव आणून वावरतात, नाही का, म्हणजे त्यांना जवळून बघणार्याला तर नक्की असे वाटत असेल कि आजही त्यांना प्रणयाचे धडे दिल्याशिवाय बेडरूम मध्ये पाठवल्या जात नसावे, एवढे इनोसंट एक्स्प्रेशन्स सदानकदा त्यांच्या चेहऱ्यावर असतात पण नेमके असे नाही, अलीकडे मला त्यांच्यात प्रत्यक्ष शरद पवार दिसले. झाले असे धारावी परिसरात हर्षला मोरे महापालिकेत निवडून आल्या आहेत, त्यांना, त्यांच्या नवऱ्याला म्हणजे आशिष मोरे यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कायम धारावी पुनर्वसनाची चिंता सतावत असते, आशिष आणि त्यांचे सहकारी जन्मापासून तेथच वाढलेले त्यामुळे त्यांना या परिसराची तंतोतंत माहिती आणि अभ्यासही, अलीकडे या सामाजिक प्रश्नावर मी त्यांना मुद्दाम मुख्यमंत्र्यांची भेट घालवूनदिली, त्या सर्वांना वाटले, आपण विरोधातले, म्हणजे मनसेचे, मुख्यमंत्री फारतर दोन पाच मिनिटे आपल्याशी बोलतील,निवेदन स्वीकारून, वाटेला लावतील पण तसे अजिबात घडले नाही, तब्बल २० मिनिटे या राज्याचा मुख्यमंत्री रात्री उशिरा प्रचंड थकलेला असूनही, त्यांचे त्याने आधी ऐकून घेतले, नंतर देवेंद्र धारावी पुनर्वसन विषयावर ज्या पोटतिडकीने अभ्यासपूर्ण त्यांच्याशी बोलले, ते त्यानंतर मला म्हणाले, क्षणभर आम्हाला वाटले कि आम्ही नाही जणू मुख्यमंत्रीच त्यांच्या जन्मा पासून धारावीत राहायला होते, नेमके शरद पवारांचे हे असेच आहे, विषय मग तो कसाही आणि कोणताही असो, त्या त्या विषयातले तद्न्य देखील तोंडात बोटं घालतात, जेव्हा शरद पवार त्या त्या तज्ज्ञांशी बोलायला सुरुवात करतात, समोरच्याची अक्षरशा बोलती बंद करतात, आणि हे असे फडणवीसांचेही पवारांच्या पावलावर पाऊल, अर्थात हे असे ज्ञान कुठेही विकत मिळत नसते किंवा पदरी अति हुशार माणसे ठेवूनही ज्ञात होत नसते, त्यामागे असतो प्रचंड अभ्यास आणि साधना, अगदी हिमालयात जाऊन ध्यान धारणा करणाऱ्या साधू संतांसारखी, शरद पवार किंवा देवेंद्र फडणवीस होणे तेवढे सोपे नाही, त्यासाठी दिवंगत डॉ श्रीकांत जिचकारांसारखे सतत शिकत राहावे लागते मग ते सहज शक्य होते. इतर मंत्र्यांविषयी पुढल्या भागात….