वागले कि दुनिया २ : पत्रकार हेमंत जोशी
पूर्वीच्या आया आपल्या मुलांना श्रावण बाळ
म्हणायच्या, हल्लीच्या, ‘ श्रावण पाळ ‘ म्हणतात.
अलीकडे म्हणे भय्यू महाराजांच्या भक्तांनी ठरवलंय,
महाराजांचे प्रवचन आटोपले रे आटोपले कि लगेच
तीन तोफांची सलामी द्यायची…
…..
….
विशेष काही नाही,
श्रोते जागे व्हावेत म्हणून…!!
परवा म्हणे मोहिंदर अमरनाथ ची बायको टीव्ही
बघता बघता बेशुद्ध पडली, डॉक्टर देखील
अचंबित झाले, असे एकाकी का घडले असावे
म्हणून…
नंतर लक्षात आले, टीव्ही वर दाखवत होते,
अमरनाथ का लिंग पिघल रहा है…
चला, चक्कलस पुरे झाली, पत्रकार निखिल वागळे यांच्याकडे वळूया. येथे आता फार काही वागळे यांच्यावर लिहावे असे वाटत नाही कारण श्री उन्मेष गुजराथी, श्री विनोद कापरी शिवाय काही महिन्यांपूर्वी मी जे लिहून ठेवले आहे, ते संदर्भ घेऊन मी पुढल्या ऑफ द रेकॉर्ड च्या अंकात
निखिल वागले नेमके कसे, हे संदर्भ घेऊन तुम्हाला सांगणार आहे…फक्त राग याचा कि निखिल यांना तंतोतंत माहित असतांना म्हणजे महेश मोतेवार हे कसे विकृत आणि चीटर आहेत, तरीही वागळेंनी महेश मोतेवार यांच्या महाराष्ट्र वन या वाहिनीमध्ये चाकरी केली आणि मोतेवारांना मोठे करून त्यांना एकप्रकारे जणू गुन्हे करण्याला प्राधान्य दिले. अलीकडे मला पुण्यातली एक तरुणी भेटली, आता ती विवाहित आहे, एकेकाळी ती मोतेवार यांची स्वागतिका कम पीए होती, तिने जे सांगितले ते भयभीत करणारे आहे, मोतेवारला केवळ दोन बायका नव्हत्या, कितीतरी होत्या, कितीतरी आहेत, त्यांना मोतेवारची आर्थिक विशिष्ट ऑफर असायची, त्यात त्या अडकायच्या आणि मोतेवारमय होऊन जायच्या, सुदैवाने हि अडकली नाही, ऑफर तिलाही होती. अर्थात अशा कितीतरी विकृत धक्कादायक भानगडी मोतेवारांनी करून ठेवल्या आहेत, विशेष म्हणजे मराठवाड्यातल्या एक जातीयवादी नेत्याने तुला मी वाचवतो, सांगून बदमाश मोतेवार यास ज्या पद्धतीने लुबाडले किंवा या अशा पद्धतीने सामान्य लोकांकडून पैसे गोळा करणाऱ्या वर्ष सत्पाळकर किंवा महेश मोतेवारांना नेहमी प्रमाणे उल्लू बनविणार्या ज्या स्वयंघोषित हिंदी राज्यातल्या मराठी गुरूने विविध प्रकारे लुटले लुबाडले आहे, ते पुरावे वाचून हेच मनात आले, सत्पाळकर बाई किंवा महेश मोतेवारांचेही बाप शोधावेत असे हे स्वयंघोषित युवा बाबा निघाले.जाऊद्या, वर्षा सत्पाळकरांची बाबांकडून प्रचंड आर्थिक आणि मानसिक लूट व फसवणूक, त्यावर मी आत्ता येथे लिहिणे टाळतो कारण आजचा विषय निखिल वागळे हा आहे, त्या बाबांवर नक्कीच पुढे कधीतरी…
निखिल वागळे यांच्याबाबतीत अगदी जीव तोडून पत्रकार भाऊ तोरसेकर हेच सांगत आले आहेत कि निखिल तू तोंडात विष्ठा असतांना श्रीखंड चघळतोय, सांगू नकोस, लोकांच्या ते जेव्हा लक्षात येईल, जेव्हा तुझे ढोंग उघडे पडेल, तुझे चाहते त्यानंतर औषधाला देखील उरणार नाहीत आणि आता हेच झाले आहे, ज्या महेश मोतेवारांनी किंवा तत्सम नेत्यांनी, व्यापाऱ्यांनी या देशाला, या राज्याला, राज्यातल्या सामान्य मराठी माणसांना लुटले लुबाडले फसविले, वागळे नेमके या अशा फसव्या लोकांच्या वाहिन्यांवरून लोकांना उपदेशाचे डोस पाजत होते, हरकत नाही फक्त माणसाने त्या भूमिकेत जगू नये म्हणजे वरून सांगायचे मी साध्वी आहे, संत आहे आणि रात्रीच्या काळोखात विविध पुरुषांशी शय्यासोबत करून मोकळे व्हायचे. वाचकांनो, हल्ली हे असेच ज्याचे त्याचे वागणे आहे, नेत्यांनी, पत्रकारांनी,समाजसेवकांनी, विविध मान्यवरांनी त्या सिनेमा क्षेत्रातील लोकांसारखी भूमिका घेऊन जगायला हवे, त्यांचीही लोकप्रियतातसूभर देखील कमी होणार नाही म्हणजे सिनेमावाले जशी आपली कोणतीही लफडी, प्रेमप्रकरणे, विविध भानगडी लपवून न ठेवता बिनधास्त उघड करतात, त्यातून त्यांची वाढते ती लोकप्रियता, आम्ही मंडळींनी देखील हे असेच वागावे, मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली, पद्धतीने वागले कि अडचण होते मिस्टर वागळे…
अर्थात येथे मी वागळे कसे वाईट हे सांगण्यासाठी लिहीत बसलेलो नाही, फक्त नेमके तेच सांगितले कि उत्तुंग ठरलेले वागळे का कुठे व कसे चुकले, ज्यातून त्यांनी आपले मोठे नुकसान करून घेतले, पत्रकार म्हणून वागळे नक्कीच मोठे आहेत आणि ते मोठे आहेत म्हणूनच अलीकडे ते चर्चेचा विषय ठरले आहेत, पत्रकारांमधल्या बेडकांवर लिहिल्या जात नाही, पत्रकारिता टायगर छाप महत्वाची ठरते. वागळे नेमके कसे हे आणखी विस्तृत माझ्या पुढल्या पाक्षिकात वाचायला विसरू नका…
तूर्त एवढेच.