बुवाबाजी २ : पत्रकार हेमंत जोशी
पुण्यात डेक्कन परिसरात फिरत असतांना एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावर लावलेल्या पाटीने माझे लक्ष वेधून घेतले, येथे वि. द. घाटे राहात होते, अशी ती पाटी होती, बघून छान वाटले. मला वाटते प्रत्येक पुणेकर हे असे काहीतरी वेगळे करून दाखवतो. आता पुढल्या परिच्छेदात मी जे लिहिणार आहे, तुम्हीच मला ते नाव, त्या भामट्या बुवांचे नाव,सांगून मोकळे व्हायचे आहे..
विषय अर्थात बुवाबाजी हाच आहे. याच पुण्यात माझ्या ओळखीच्या एक तरुण महिला उद्योजिका राहतात. स्वतःच्या पायावर त्या उभ्या आहेत. पदरी एक मूल वरून व्यसनी नवरा आणि माहेरची मोठी जबाबदारी तरीही हि उद्योजिका धडपड करून आपल्या व्यवसायात पुढे पुढे जात होती, त्यात तिचा व्यवसाय मंत्रालयाशी संबंधित, काही वर्षांपूर्वी तिला मग कोणीतरी सुचवले, मध्यप्रदेशातल्या त्या बुवांकडे जा, त्यांच्याकडे या राज्यातल्या मंत्र्यांची, अधिकाऱ्यांची, आमदार, खासदारांची, प्रसंगी अगदी थेट राष्ट्रपती किंवा मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची उठबैस आहे. थोडक्यात ज्यांच्यामुळे तुझा व्यवसाय भरभराटीला येतो, त्या सर्वांची उठबैस असते, तुला त्यातून पुढे जाणे शक्य होईल शिवाय, तुझ्यावर असलेली कौटुंबिक जबाबदारी आणि कटकटी, त्यांच्या चरणी लिन हो, आपोआप साऱ्या समस्यांमधून बाहेर येशील, आणि हि त्याचवेळी तिच्या व्यवसायात यशस्वी ठरलेली स्त्री त्या सत्पाळकर बाईंप्रमाणे या स्वयंघोषित राष्ट्र संतांच्या दरबारात दाखल झाली. पुढे या महाराजांनी तिची एकही समस्यां दूर करणे राहिले बाजूला उलट तिला हा बाबा आणखी वेगळ्याआणि विकृत संकटात टाकून मोकळा झाला…
येथे मला आवर्जून एक या राज्यातल्या बड्या मंडळींना सांगावेसे वाटते कि कृपया त्या रामरहिम बाबांप्रमाणे तुम्ही अशा कोणत्याही वादग्रस्त बुवा बाबा मंडळींसंगे आपले फोटो काढू देऊ नयेत, ते अय अशा काढलेल्या फोटोंचा हमखास दरदिवशी गैरवापर करतात, आम्ही प्रभावी कसे, आम्ही परमेश्वराचे अवतार कसे याचे त्यांना त्यानंतर मार्केटिंग करणे अतिशय सोपे जाते…जे तिच्या बाबतीत घडले तेच या मध्य प्रदेशात नावाला ठाण मांडून बसलेल्या स्टईलमपात बुवाच्या नादी लागलेल्या, संपर्कात आलेल्यांचे थोड्याफार फरकाने प्रत्येकाचे होते, प्रत्येकाच्या बाबतीत घडते, पण उगाच या प्रभावी आणि काहीशा गुंड प्रवृत्तीच्या बाबाशी, बुवाशी, पंगा घेणे नको, म्हणून माणसे आधी भोगतात मग बाजूला होतात आणि झाकलीमूठ सव्वा लाखाची, पद्धतीने गप्प बसतात. हा बाबा तिकडे मध्यप्रदेशात आणि इकडे पुण्यात राहणाऱ्या या महिला उद्योजिकेला उठसुठ कामे सांगून आर्थिक लुटून मोकळा व्हायला लागला. ती सांगते, या पुरुष असलेल्या बाबाचे मेकअप साहित्य माझ्यावर विकत घेऊन पाठविण्याची जबाबदारी होती, ते एवढे महाग असायचे कि बिलाची रक्कम अदा करतांना मला घाम फुटत असे, शिवाय बाकीच्या आर्थिक जबाबदाऱ्या पेलता पेलता माझ्याकडले कोटी दोन कोटी रुपये केव्हा कसे आणि कुठे निघून गेले मला माझेच ध्यानात आले नाही, पण तरीही मी मान खाली घालून हे सारे यासाठी सहन करीत होते कि ह्यो बाबा शासन दरबारी सांगून मला एखादी मोठी ऑर्डर मिळवून देईल पण असे एकदाही अजिबात घडले नाही, मी मात्र साक्षात परमेश्वर समजून त्याच्या पायाशी लिन झाले होते, त्याला देव मनात होते, आपला देव आपल्याला कधीही फसविणार नाही, असे मला वाटत होते, मी डोळे झाकून त्याच्या नावाचा जप करीत होते….
आता खरी गम्मत पुढे आहे, या बुवांनी त्यांची मुंबईतल्या एका अतिशय प्रभावी भाजपा भाजपा महिला नेत्याशी तिची ओळख करून दिली, ह्या तुझे काम नक्की करून देतील, सांगितले, थोडक्यात त्यांनी या उद्योजिकेचे एकही काम करून दिले नाही, वरून त्या स्वतःला युवा समजणार्या बुवाने आपली जबाबदारी आधी त्यांना आर्थिकदृष्ट्या लुबाडून या अमराठी महिला नेत्याच्या खांद्यावर टाकली. या जहाँबाज बाईंनी तिला मलबारहिलवर त्यांच्या भव्य बंगल्यात बोलाविले, पुढे कळले त्यांची ती पद्धत आहे म्हणजे आधी आपल्या बंगल्यावर बोलवायचे, मग त्यांच्या रिकामचोट नवऱ्याने त्यांचा बंगला, महागड्या गाड्या दाखवायच्या, थोडक्यात आधी आम्ही खूप श्रीमंत कसे दाखवायचे आणि नंतर पद्धतशीर लुटून मोकळे व्हायचे, काम होत नाही आणि आगाऊ दिलेली मोठी रक्कम लोकांना परतही मिळत नाही. नेमके तेच घडले, येथेही या महिला नेत्याने आमच्या या महिला उद्योजक भगिनींकडून लाखो रुपये आगाऊ घेतले, आज ये उद्या ये परवा नक्की होईल पद्धतीने तिला पुणे ते मुंबई प्रवास करून करून दमविले, काम तर अजिबात झाले नाही आणि जे इतरांच्या बाबतीत घडते तेच मध्य प्रदेशातल्या बुवाच्या नादी लागून उध्वस्त झालेल्या या महिला उद्योजकाचे आगाऊ दिलेले ना पैसे मिळाले ना कुठलेही काम त्या अमराठी भाजपा महिला नेत्याने या मराठी उद्योजक महिलेचे केले…
येथेही तिचे दुर्दैव संपलेले नव्हते. ना बुवांनी काम केले, ना त्या मलबार हिलवर राहणाऱ्या भाजपाच्या त्या महिला नेत्याने. मित्रांनो, या दोघांचीही नावे तुमच्या लक्षात आलेली आहेतच, कृपया तुम्ही या अशा मंडळींच्या नादी लागू नका, अन्यथा समस्यां राहिली दूर, वरून आणखी डोकेदुखी, असे तुमच्याही बाबतीत घडेल. फक्त ५ ऑकटोबर पर्यंत थांबा, वाट पहा, मला एका शुभ कार्यातून बाहेर पडू द्या, अशी आणखी पन्नास गंभीर प्रकरणे या बुवाच्या बाबतीत घडलेली, तुमच्यासमोर मांडली नाहीत आणि तीही नावानिशी तर मला हेमंत जोशी म्हणू नका, वाटल्यास नालायक म्हणा, हरामखोर म्हणा, रामरहीम म्हणा, नरेंद्र म्हणा, भय्यू महाराज म्हणा, वाट्टेल ते म्हणून मोकळे व्हा..
पुण्यातल्या त्या महिला उद्योजकाच्या बाबतीत या विकृत बुवाकडून आणखी एक घडलेला किस्सा तर अतिशय गंभीर आणि अंगावर काटा आणणारा आहे. पुढे थोड्याच दिवसात या तरुण सुस्वरूप श्रीमंत उद्योजिकेचे पती मरण पावले, पुढल्या केवळ पंधरा दिवसात मग या बाबांनी तिला मध्यप्रदेशातल्या आपल्या आश्रमात बोलावून घेतले. म्हणाले, जे घडले ते आता विसरून जा आणि माझ्या आश्रमातल्या या तरुणाशी तू लग्न कर, तुझे भले होईल.आग्रह धरून धरून सांगितले. विशेष म्हणजे त्या तरुणाने आधी त्याच आश्रमात येणाऱ्या एका भोळ्या देखण्या तरुणीशी लग्न केले आणि नंतर तिला सोडून दिले, घटस्फोट घेऊन त्या तरुणीचे आयुष्य उध्वस्त करून या बुवांचा हा नातेवाईक मोकळा झाला होता. हे असे बुवांनी सांगितल्यानंतर, हि नुकतीच विधवा झालेली तरुणी म्हणाली, अहो, माझे पती जाऊन केवळ पंधरा दिवस झाले आहेत, हे असे लगेचच करणे शक्य नाही, मला वेळ द्या, जरी आश्रमात मी येत असल्याने त्याच्याशी ओळख असली तरी मला नेमके समजावून घेतले पाहिजे, ज्याच्या सोबत मला माझ्या अपत्याला आयुष्य काढायचे आहे, नेमके हे महाशय योग्य आहेत का, पुढे तेच घडले, केवळ आश्रमात राहून टाइम पास करणाऱ्या या तरुणानेही तिला पुढल्या वर्षभरात आर्थिक लूट लूट लुटले, एक दिवस तिने याघडलेल्या आणि घडणार्या गंभीर बाबींवर बिचार केला, तो बुवा आणि त्याचा हा असा लफंगा लुच्चा परिवार, साऱ्यांपासून ती दूर झाली, आणि माझ्याकडे आली, हि सत्य कहाणी येथेच संपत नाही, पुढे काय घडले, थोड्याच दिवसात…
बुवाबाजी क्रमश: