पोहणे म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणे : पत्रकार हेमंत जोशी
अलीकडे मी आणि माझा मित्र नेहमीप्रमाणे जुहू चौपाटीच्या त्या हॉटेलात पोहत होतो. पुढले लिहावे किंवा नाही, थोडा विचार करतोय, कारण लिहिले तर बायकोचे नेहमीप्रमाणे बोलणे खावे लागणार आहेत, पण तरीही हिम्मत करतोच. तुम्ही हेच बघायला जाता का, तुमची नजरच चांगली नाही, समोरचे चाचा बघा कशी बायकांसमोर खालची मान वर करीत नाहीत ( चाचा म्हणजे वय वर्षे ८०, डोळ्याच्या खाचा झालेला आणि नाजूक अवयवाचा खिमा झालेला माणूस ) वगैरे वगैरे नेहमीप्रमाणे ऐकून घ्यावे लागणार आहे. फार कमी पुरुष असे असतात नाही का कि जे भाग्यवान असतात कारण त्यांच्या बायका संशयी नसतात. विशेष म्हणजे अशा संशय न घेणाऱ्या बायकांना नवऱ्याविषयी उगाचच वाटत असते कि माझा नवरा कुठल्याही तरुण स्त्रीकडे बहिणीसारखे बघतो, हो, बघतो पण मामे बहीण असल्यासारखे. अगदी सनी लिओनीकडेही…
तर मी व मित्र पोहत असतांना साधारणतः वय वर्षे १६ च्या आसपास, दोन खूप श्रीमंत घरातल्या अतिशय देखण्या मुली त्यापैकी एकीचे पिताश्री देशातले नामांकित फॅशन डिझाइनर, काठावरच सर्वांसमक्ष कपडे बदलवून पाण्यात उतरल्या. त्यातली एक बॉय कट केलेली होती, मी त्यांना बघताच मित्राला म्हणालो, या लेस्बियन आहेत, तो म्हणाला, काहीही….पण काही क्षणात माझे बोलणे खरे ठरले, त्या पाण्यात उतरल्यानंतर पोहत कमी होत्या, त्यांचा परिणय, प्रणय मात्र बिनधास्त सुरु होता, पोहणारे आणि काठावरचे सारेच भारतीय, अधाशासारखे म्हणजे डोळ्यांचे काचेच्या गोट्या करून म्हणजे पापणीही हलू न देता त्यांच्याकडे बघत होते, त्या दोघींचे मात्र इतरांकडे लक्षही नव्हते, त्या दोघींचे चाळे नक्कीच नवपरिणीत जोडप्यालाही लाजवणारे होते, लेस्बियन सेक्स कसा करीत असावेत याचे जणू प्रात्यक्षिक सुरु होते. तसेही लेस्बियन्स माझ्या क्षणार्धात लक्षात येतात, त्यांच्यातल्या एका स्त्रीचा पेहराव आणि हेअर स्टाईल नेहमी पुरुषांसारखी असते. स्वातंत्र्य म्हणजे स्वइराचार नव्हे.वास्तविक सर्वांसमक्ष, सर्वांदेखत आपण कसे ओंगळ देहदर्शन आणि प्रदर्शन करतो याचे भान साऱ्यांनी ठेवायलाच हवे, मनुष्य प्राणी हा कुत्रा मांजर नव्हेत कि कसेही आणि कुठेही काहीही केले तरी चालते…
सभोवताली त्यांना बघणारे तोंडात पाणी आणून बघत होते, माझ्या मात्र डोळ्यात पाणी आले, मनात आले, एवढ्या अप्रतिम देखण्या मुली, काय वाटत असेल त्यांच्या आई वडिलांना, कल्पनाही करवत नव्हती. दुर्दैव त्या दोघींच्याही कुटुंबाचे, हे सारे त्यांना उघड्या डोळ्यांनी सहन करावे लागते. म्हणून नेहमी सांगतो, पाप पुण्याचा सतत विचार करून लोकांनी पैसे घरी आणावेत, नाही पचत असे पैसे, हे असे तुमच्या आमच्या घराचे लवकरच वाटोळे होते. होणारे वाटोळे पैसे खाणारे लपवून ठेवतात, पण देवाची न वाजणारी काठी दरदिवशी अंगावर वळ काढीत असते, खोलीभर पैसे डॉक्टरांना मोजण्याची ताकद असतानाही राज्य विकून श्रीमंत झालेले गढीवरले देशमुख वर्षभर आपला मृत्यू प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी बघत होते, पैसे खाणारे तुम्ही आम्ही सारेच गढीवरले देशमुख, पाप करणारे ‘ विलासी ‘ आयुष्य दरदिवशी जगण्यासाठी….
पंचतारांकित हॉटेलातले स्विमिंग पूल म्हणजे एक भन्नाट अनुभव असतो, मागेही एकदा मी तुम्हाला सांगितले होते कि माझ्यासारखे असे फारच थोडे, जवळपास नसतातच कि जे पोहता पोहता मुतण्यासाठीं पुलाबाहेर येतात, बुडबुडे दिसलेत कि समजावे पोहणाऱ्यांनी कार्यभाग उरकला आहे. नेमक्या एक मारवाडी भाभी माझ्या वेळेत पोहायला येतात, आधी भरपूर पाणी पिऊन पाण्यात उतरतात नंतर लागोपाठ दोन तीन वेळा त्यांच्या भोवताली मोठमोठाले बुडबुडे बाहेर पडतात, लहान मुले साबणाच्या पाण्याचे तोंडात प्लास्टिक पाईप घेऊन जे बुडबुडे हवेत सोडतात ना, ते या बुडबुड्यांसमोर एकदमच पिटुकले वाटतात…
तसेही मग तो पुरुष असो कि स्त्री, अगदी बोटावर मोजण्याइतके पोहताना किंवा अंघोळ करतांना बाजूला होऊन मुतणे पसंत करतात, बहुतेकांचे कुक्कुल्या बाळा सारखे असते म्हणजे चड्डीतल्या चड्डीत… आता समजले का तुम्हाला स्वीमींग पूल मधले पाणी हे समुद्राच्या पाण्याखालोखाल खारट का असते ते. आणि हो, भारतातील कोणत्याही पंचतारांकित हॉटेलात किंवा कुठल्याही तलावात पोहायला उतरणार्या आपल्या भारतीय तरुणी, स्त्रिया पूर्वीच्या काळी पुस्तकातला किंवा सिनेमातला काळा पहाड कसा काळा गॉगल लावून आणि संपूर्ण अंग कपड्यांनी झाकून रस्त्यावर उतरायचा ते तसे आपल्या भारतीय तरुणींचे असते, शोधूनही त्यांचे शरीर समोरच्यांना दिसत नाही. पंचतारांकित हॉटेल मध्ये जाऊन सुद्धा अशी सभयता केवळ भारतीय स्त्रीच सांभाळू शकते.परदेशातल्या तरुणींचे मात्र हे असे प्रेतासारखे शरीर झाकून ठेवलेले नसते, त्यांच्या कमरेच्या वर आणि कमरेच्या खाली त्यांनी जणू चार चिंध्या रस्त्यावर गोळा करून तेथे चिटकवल्या आहेत, एवढे तोकडे त्यांचे स्विमिंग कॉस्च्युम असते, जे त्यांच्यातले सौंदर्य संपविते आणि बघणाऱ्या सुसंस्कृत भारतीयांना ते हिडीस आणि ओंगळ वाटते…
तूर्त एवढेच….
पत्रकार हेमंत जोशी