समस्त गुजराथ्यांना आवाहन : पत्रकार हेमंत जोशी
३१ डिसेंबर च्या दरम्यान मला जो अपेक्षित होता तो मेसेज फिरतांना नेमका कुठे दिसला नाही म्हणजे….थर्टी फर्स्ट साजरी न करता, थर्टी फर्स्ट वर खर्च होणारा पैसा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्या म्हणून…गणेशोत्सव आणि दिवाळीच्या वेळी असे मश्रुम सारखे उगवणारे समाजसुधारक थर्टी फर्स्ट च्या आधीच टल्ली झाले असावेत..कमला मिल्सच्या पबमध्ये, हुक्का पार्लरमध्ये घडलेले जळीत कांड, जे मी बघितले ते तुम्हीही बघितलेले आहे पण मला वाटते एकतर तुम्ही ते लक्षात आलेले असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले असावे कींवा कशालाउगाच वाईटपणा घ्यायचा म्हणून त्यावर चर्चा करणेही टाळले असावे. पण पुढे मी जे सांगणार आहे त्याचा न घाबरता प्रचार आणि प्रसार तुम्हालाही करायचा आहे कारण गुजराथीही हिंदू आहेत, कडवे हिंदू आहेत आणि हिंदुस्थानचा अमेरिका करायचा नसेल तर त्यांना मी जे पुढे सांगणार आहे ते तुम्ही पटवून देणे आवश्यक आहे…
मी अनेकदा परदेशात जातो, परदेशातले नेमके गुजराथीत माझे कौटुंबिक मित्र आहे त्यामुळे बहुतेकवेळा मी त्यांच्या घरीच राहणे, उतरणे पसंत करतो. मला जे त्यांच्यात जे दिसले ते असे, बहुतेक गुजराथ्यांनी तेथे स्थायिक झाल्यानंतर युरोप अमेरिकेतला चंगळवाद फार मोठ्या प्रमाणावर स्वीकारला त्यामुळे कदाचित इतर भारतीयांच्या तुलनेत त्या त्या देशातल्या स्थानिकांनी केवळ गुजराथ्यांना जवळ घेतले, त्यांना आपलेसे करून घेतले. गुजराथ्यांकडे मग ते भारतातले असोत कि परदेशातले आणि मुंबईतलेही या सर्वांनी व्यापारातून प्रसंगी वाट्टेल ते करून बक्कळ, खोऱ्याने पैसे मिळविलेत पण त्यांनी चंगळवादाला देखील मोठ्या प्रमाणावर स्वीकारले, दारू, पब, पार्ट्या, डिस्को, पुरुषांनी घुटके खाणे, लेडीज बार मध्ये जाऊन पैसे उधळणे, उठसुठ जगभर किंवा जमेल तेथे जमेल जसे ग्रुप करून सहली काढणे, थोडक्यात अगदी लहानांपासून तर थोरांपर्यंत त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर चंगळवादाला स्वीकारलेले आहे विशेष म्हणजे त्यांच्या चंगळवादात जे सामील होतात त्यांची अशा मंडळींशी लगेचच मैत्री होते, माझ्या घरातले काही सदस्य नेमके या अशा गुजराथ्यांची मोठी संख्या असलेल्या शाळा महाविद्यालयातून शिकलेले असल्याने मला हे असे चंगळवादातून घडणारे नेमके प्रकार तंतोतंत ठाऊक आहेत, विशेषतः मराठी कुटुंबांनी मुस्लिम आणि गुजराथी कुटुंबांशी मैत्री करतांना आपले परंपरागत संस्कार पुसले जाणार नाहीत तेथेच मैत्री करून मोकळे व्हावे थोडक्यात खानदानी कुटुंबातच आपले संबंध वाढवावेत. मी हे असे लिहिले आहे कारण अलीकडे कमला मिल्स मधल्या पब मध्ये लागलेल्या आगीत जे मृत्युमुखी पडलेत किंवा त्या ठिकाणी जे जमलेले होते त्यापैकी ९५ टक्के हे गुजराथी होते, मृत्युमुखी पडलेलेलही जवळपास सारेच गुजराथी होते अत्यंत महत्वाचे म्हणजे जे मृत्युमुखी पडलेत मोठ्या संख्यने केवळ गुजराथी तरुणी होत्या, माझे हे लिहिणे कदाचित गुजराथी समाजाला रुचणार नाही पण राहवले नाही म्हणून लिहिले. मला वाटते आता हीच ती वेळ, समस्त गुजराथी बांधवांनी लहानांपासून तर थोरांपर्यंत अनेकदा एकत्रित हे जे अतिशय मोठ्या प्रमाणावर चंगळवादाचे जीवन जगणे स्वीकारलेले आहे, पैसे आहेत म्हणून वाट्टेल तसे वागणे सुरु ठेवले आहे त्यावर आधी सांघिक विचार मंथन करावे नंतर समुपदेशनाच्या माध्यमातून हे असले पाश्चिमात्य प्रकार कसे घराबाहेर काढता येतील त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे, जगातल्या कोणत्याही मौजमजेच्या ठिकाणी गुजराथी दिसले नाहीत असे कधी झाले आहे का, नाय नो नेव्हर, थोडक्यात सुटी पडली कि थेट चंगळवादाकडे पळायचे, हे असे त्यांनी वागणे सोडून द्यायला हवे, व्यसनी समाज नव्हे तर व्यापारी समाज, हे असेच त्यांच्याविषयी प्रत्येकाने म्हणायला हवे त्यासाठी त्यांनी बदलायला हवे, सततच्या चंगळवादापासून तातडीने दूर होणे समस्त गुजराथी बांधवांनी अत्यंत गरजेचे आहे असे येथे पोटतिडकीने सांगावेसे वाटते. सारेच गुजराथी चंगळवादी, माझा तो दावा नाही पण प्रमाण अतिशय मोठे आहे, गुजराथी चंगळवादातून उगाचच स्वतःचे आयुष्य बरबाद करून घेताहेत…
पत्रकार हेमंत जोशी