संघ आणि भाजपा ६ : पत्रकार हेमंत जोशी
उत्तम हिंदू संस्कार होण्यासाठी केवळ रा. स्व. संघाच्या शाखेतच जायला हवे असे अजिबात नाही, भाजपा सोडून संघ ज्या विविध प्रांतात काम करतो तेथे कुठेही काम करा, आयुष्यातले काही क्षण तेथे नक्की घालवा किंवा तुमच्या मुलांनाही संघ परिवारात, परिघात पाठविल्यास त्यांना नक्की नेमके हिंदुत्व कळेल. होय, मनावर आपोआप उत्तम संस्कार होऊन आपण बाहेर पडतो. १९९५ नंतर मात्र भाजपा हा अटलजी, दिनदयालजींचा राहिलेला नसून जवळपास सारेच भाजपा नेते मुंडे महाजनांची नक्कल करताहेत, त्यामुळे तेथेही अलीकडे चांगले नेते अभावाने बघायला मिळतात, भाजपाचीही काँग्रेस झालेली आहे, देशाचे किंवा राज्याचे नव्हे कुटुंबाचे आधी भले करावे व्हावे असे आता तेथेही ज्याला त्याला वाटते, त्यांच्यातले अनेक ज्ञानाचे डोस मात्र अगदी खिरापती सारखे वाटून मोकळे होतात….
एक उदाहरण देतो, मी सांताक्रूझ पश्चिमेस असलेल्या माझ्या इमारतीतून जेव्हा बाहेर पडतो, स्वामी विवेकानंद रस्त्यावरून माझ्या माहीम पश्चिमेच्या कार्यालयात जातो, आश्चर्य म्हणजे सांताक्रूझ ते माहीम दरम्यान असा एकही स्पॉट नाही जेथे बदाबदा मुस्लिम वावरतांना दिसत नाहीत, याचा सरळ अर्थ असा मुंबईतील हा पश्चिमेला असलेला अत्यंत गजबजलेला महत्वाचा परिसर, या परिसरातील रस्त्यावर हिंदू अभावाने आढळावेत, मोठे दुर्दैव आहे, आणि पूर्वीची म्हण आता बदललेली आहे, अलीकडे, भटाला दिली ओसरी, असे होत नाही तर भटाऐवजी मुस्लिमाला दिली ओसरी, मुस्लिम हातपाय पसरी, हा बदल त्यांनी घडवून आणला आहे, मुंबई शहरातील महत्वाचा परिसर मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणावर व्यापल्याचे चित्र जिकडे तिकडे बघायला मिळते. मुस्लिमांची दादागिरी आणि संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आम्ही हिंदू केवळ मनातल्या मनात फारतर राग व्यक्त करतो, आम्ही हतबल आहोत कारण आम्ही अजिबात संघटित नाही, आमचे नेते आम्हाला संघटित करायला तयार नाहीत कारण त्यांचे मतदान जातीपातीतल्या दुफळीवर अवलंबून असल्याने त्यांना आम्हाला संघटित करण्यात अजिबात रस उरलेला नाही. त्याचवेळी संघटित आणि आक्रमक ठरलेल्या मुस्लिमांचे करावे तेवढे कौतुक कमी, जे आजतरी अल्प असूनही आम्हाला पुरून उरताहेत, त्यांच्या समोर आम्ही हिंदू कमी पडतो, गांडू ठरतो….
आमचा संपूर्ण परिसर मुस्लिम आणि ख्रिश्चनांनी मोठ्या प्रमाणात व्यापलेला, अशावेळी कौतुक करावे तेवढे कमी त्या आशिष शेलार यांचे, जे शेलार या परिसरातून स्वतः आमदारकीला निवडून तर येतातच वरून ते मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पक्षाचे, भाजपाचे नगरसेवक निवडून आणतात आणि खासदारकीच्या निवडणुकीतही शेलार यांच्याकडे बघूनच मतदार मतदान करून मोकळे होतात, भाजपाचा उमेदवार कोण, त्यांना महत्वाचे नसते….अलीकडे मोहन भागवत यांच्या बोलण्याचा, भाषणाचा, वक्तव्याचा विपर्यास केला गेला. हसू तर तेव्हा आले जेव्हा शरद पवारही म्हणाले कि संघ स्वयंसेवकांना सीमेवर हाफ पॅन्ट घालून पाठवावे, पवारांना अलीकडे वयोमानानुसार विसरायला होते वाटते कारण संघाने हाफ पॅन्ट सोडली आहे आणि ते फुल पॅन्ट घालताहेत, हे ऐनवेळी पवारांना आठवले नसावे. थोडक्यात, संघ नेमका कसा अनेकांना माहित नव्हते किंवा नसावे म्हणून मी या अंकात जसे जमले तसे संघावर बरे वाईट लिहून मोकळा झालो आहे….
तूर्त एवढेच.
पत्रकार हेमंत जोशी