अशोक वानखेडे, अनिल थत्ते, आणि निखिल वागळे : पत्रकार हेमंत जोशी
आडनाव सांगण्याची गरज नाही, उनका नामही काफी है..दिल्लीतले पत्रकार अशोकजींच्या घराला एकदम झक्कास बाल्कनी आहे, शेजारच्या गुप्ता वहिनींच्या घरातलेही म्हणे बाल्कनीतून सारे दिसते…साहजिकच आहे, ती अशोकजींची आवडती जागा आहे, घरातली बाल्कनी…परवा ते बाल्कनीत उभे राहून मोठ्यांदा म्हणायला लागले…आज कल जमी पर नही रुकते कदम मेरे…साऱ्यांच्या बायका सारख्याच. वहिनी लगेच आतून खेकसल्या,ती सटवी अजून माहेरून परतलेली नाही. आणि हो, आत या, जमिनीवर पाय न ठेवता, आताच मी झाडू पोछा केलाय…अलीकडे अशोकजींच्या शर्टावर वहिनींना ‘ एकही बाल ‘ सापडत नसल्याने त्यांना उगाचच वाटत राहते, अशोकजी यावेळी एखाद्या टकलीच्या प्रेमात पडलेले दिसतात…येथे सहजच गम्मत केली आहे, जे सर्वांची खेचतात त्या अशोकजींची मी उगाचच खेचली आहे. एक मात्र नक्की मूळ विदर्भातले पण गेल्या कित्येक वर्षांपासून दिल्ली गाजवून मोकळे झालेल्या पत्रकार अशोक वानखेडे यांचे धोबीघाट हे न्यूज पोर्टल नक्की पाहण्यासारखे ऐकण्यासारखे असते, आहे. त्यांचे बोलणे केवळ आक्रमक नसते ते पुराव्यांवर आणि नेमक्या संदर्भांवर
कायम आधारलेले असल्याने धोबीघाट दर्शकांच्या पसंतीला उतरलेले आहे…
सवंग लोकप्रियता मिळविण्याच्या नादात अलीकडे काहीसे बाजूला पडलेल्या निखिल वागळेंनी सावरकरांवरील वाद मुद्दाम ओढवून घेतलेला आहे. जसे घरातल्या लहान मुलाकडे आपण दुर्लक्ष केले कि तो कसा लघवीची जागा आपल्याच हाताने ओढून ओढून रडायला लागतो ते तसे निखिल वागळेंनी केले आहे, उगाचच त्यांच्याकडे सर्वांचे पुन्हा लक्ष जावे म्हणून. अशावेळी वास्तविक सर्वांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असते तर अधिक बरे झाले असते पण तुमचाही बाळासाहेब ठाकरे झाला म्हणजे त्यावेळी छटाकभर महानगर वर बाळासाहेबांनी आदेश दिल्याने शिवसैनिकांनी हल्ला केला आणि निखिल वागळे विनाकारण मोठे झाले, प्रसिद्धीच्या झोतात आले. चावायला धावणाऱ्या कुत्रीचे जसे चुंबन घ्यायचे नसते ते तसेच वागळेंच्या बाबतीत वागायचे असते, वागळे चतुर आहेत, त्यांनी एक वाक्य फेकले आणि फुकटात स्वतःची मोठी प्रसिद्धी करवून घेतली..
पत्रकार लेखक संपादक प्रकाशक अनिल थत्ते माझे मित्र आहेत, या दोघांच्याही बाबतीत नेमके तेच घडले, घडते. वागळे व थत्ते सवंग लोकप्रियतेच्या मागे लागले, तेवढ्यापुरते नक्की मोठे झाले पण त्याच वेगाने ते वाचकांच्या मनातून उतरले.
अनिल थत्ते बिग बॉस मध्ये गेले आणि त्यांचे सोज्वळ स्वरूप अनेक वर्षांनी बघायला मिळाले नव्हे उषा नाडकर्णी सारख्या खमक्या मंडळींनी त्यांना तसे मूळ स्वरूपात राहण्यास भाग पडले, साधा व्हाइट शर्ट आणि ब्लु जीन्स, अनिल किती सोज्वळ दिसत होते, त्यांनी ते तसेच राहावे, असे वाटले होते पण बाहेर पडल्यानंतर त्यांनी पुन्हा तो तसाच पोशाख घालणे आणि चेहरा रंगविणे सुरु केले आहे. त्यांनी असे पुन्हा वागणे राहणे सुरु केले, अनेक वर्षांनी लोकांच्या मनात मिळविलेले स्थान अनिल पुन्हा घालवून बसतील असे दिसते, त्यांना विनंती निदान त्यांच्या घरच्यांना त्यांच्या संगे उजळ माथ्याने फिरण्यासाठी आणि जोकर म्हणून नव्हे तर लिखाणातून त्यांनी लोकप्रिय होण्यासाठी पुन्हा पूर्वीसारखेच रस्त्यावर उतरावे, केवळ लिखाणातून त्यांनी लोकांना आकर्षित करावे, वेडेवाकडे वागून दिसून नव्हे…
शेवटी एकच सांगतो, मी तेवढा चांगला, स्वतःला समजणारे निखिल वागळे, त्यांचे हे असे एककल्ली म्हणजे व्हिमजिकल वागणे, जवळपास साऱ्याच वाहिन्यांनी आता त्यांना न घेण्याचे ठरविलेले आहे आणि माझ्या माहितीनुसार त्यांनी प्रयत्न केले, आपले स्वतःचे चॅनेल सुरु करण्यासाठी, पण त्यांना आर्थिक सहकार्य करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही, कोणालाहि आपल्या हाताने एड्स लावून घ्यायचा नसतो, वागळे नेमके कसे, आमच्या क्षेत्रात ते साऱ्यांना उमजलेले असल्याने यापुढे त्यांना
सहकार्य मिळेल, शंभर टक्के अशक्य आहे आणि खिशातून पैसे घालून वाहिनी सुरु करणे, एवढे ठार वेडे वागळे नक्कीच नाहीत, म्हणून तुम्हाला विनंती, संपलेल्यावागळेंना दुर्लक्षित करा, त्यांच्याकडे किंवा त्यांच्या विनाकारण वादग्रस्त बोलण्याकडे
लक्ष न देणे केव्हाही चांगले…
तूर्त एवढेच.
पत्रकार हेमंत जोशी