महादेव जाधव, नावात काय आहे: भाग १
अलिकडल्या ८-१० वर्षात मी फारशी ड्रायविंग करीत नाही, ड्रायविंग ड्राइवरच्या भरवशावर…वयाच्या २१ व्य वर्षांपासून ड्रायविंग करतो, पहिली कार वयाच्या २१ व्य वर्षीच घेतली…कामाचा शीण आणि ताण असतो म्हणणं ड्रायविंग करणे टाळतो पण पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर त्यातल्या त्यात फारशी गर्दी नसेल तर ड्रायव्हिंग करायला मजा येते, पुण्यातल्या व्यवसायानिमीत्ते ८-१५ दिवसांतून हमखास तेथे जावे लागते.जाणे होते. मग एक आयडिया करतो, जेथे एक्सप्रेस वे सुरु होतो आणि संपतो, तेथे जातांना आणि येतांना माझ्या ड्राइवरला सोबत घेतो नंतर त्याला सोडून केवळ एक्सप्रेस वे वर सेल्फ ड्रायव्हिंग चा आनंद घेतो..हे सारे येथे यासाठी सांगितले कि आपल्या कडे विशेषतः कोणत्याही महामार्गावर ड्रायव्हिंग करणारे बहुसंख्य अर्ध्या हळकुंडात पिवळे असतात, का कोण जाणे त्यांना कार मध्ये बसलेल्या इतरांवर फुक्काचे इम्प्रेशन मारण्याची भारी हौस असते, मग ते राज्यातल्या, देशातल्या महामार्गावर अतिशय वेगाने कार चालवितात, स्वतः तर जीवानिशी जातातच पण इतरांना देखील घेऊन जातात. वास्तविक माझ्या ताफ्यात काही महागड्या कार्स आहेत ज्या मी देखील वेगाने चालवू शकतो पण तरुणाईला कदाचित हे माहित नसेल तर सांगतो कि तुमच्या कार मध्ये बसलेल्यांना वेगाने नव्हे सेफ ड्रायव्हिंग करणारे अधिक भावतात, मनातून आवडतात. अतिशय तकलादू कार्स जेव्हा हि मंडळी वेगाने हाकतात, मनस्वी संताप येतो. इतरांना मरतांना बघतात तरी स्वतः तेच करतात अर्थात घरोघरी मातीच्या चुली. अत्यंत महत्वाचे म्हणजे आपल्याकडे ज्या कार्सची किंमत १५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कार्स विशेषतः महामार्गावर फारशा सेफ नसतात, आणि नेमके सारे सेफ नसलेल्या कार्स अतिशय वेगाने चालवितांना दिसतात…
अनेकदा आपण काही गैरसमज विनाकारण करवून घेतो. अलीकडे इथोपिया मध्ये एका चाळिशीतल्या बाईशी ओळख झाली, सोबत तिची दोन मुले होती, मी तिला विचारले, तुम्ही सांगताय कि तुमचा नवरा जाऊन १५ वर्षे उलटलीत मग हि दोन दोन लहान मुले कशी झालीत त्यावर ती म्हणाली, ओ..यू इंडियन्स,माझा नवरा मेलाय..मी नाही..
जेव्हा माझी पहिल्यांदा महादेव जाधवशी फोनवरून ओळख झाली म्हणजे अगदी पहिल्यांदा जेव्हा महादेवशी बोलणं झाले आणि प्रत्यक्ष भेटायचे ठरले, तेव्हा कुठल्यातरी गावंढळ व्यक्तीसंगे वेळ घालावा लागेल हेच वाटले आणि आलिया भोगासी..पद्धतीने भेटून बोलायचे ठरले पण भेटल्यानंतर भेटण्याआधी केलेला अंदाज चुकला. हे अर्थात असे एकदा तरी आयुष्यात आपल्या सर्वांच्या बाबतीत हमखास घडलेले असते, विशेषतः फेसबुकच्या जमान्यात तर असे अनेकांचे अनेकदा घडते. समोरच्या व्यक्तीचा डीपीवर ठेवला फोटो आपण बघून त्याला किंवा तिला भेटायला जातो आणि आपलाच ‘ माकड ‘ होतो…
तरीही मी चावट मित्रांना नेहमी सांगतो, पॅडिंगचा आणि मेकअप चा जमाना आहे, बघितल्याशिवाय, खात्री पटल्याशिवाय, मैं तेरे प्यार में पागल…म्हणू नका मग त्यांना सध्या ठाण्यात सरकारी कार्यालयात उच्च पदावर काम करणाऱ्या मित्राचा प्रत्यक्षात घडलेला किस्सा हमखास सांगतो. हा अधिकारीही चावट आहेच म्हणजे आपल्या कार्यालयात तो आजही दुपारी तीन चार वाजता येतो कारण रात्रभर इकडे तिकडे तोंड मारीत फिरत असतो, एकदा तो बँकॉकला नेहमीप्रमाणे फिरायला गेला असतांना त्याने लेडीज बार मधून एका देखण्या मुलीला उचलून नेले हॉटेलात जेव्हा तिला पलंगावर उघडले, तो चक्क पुरुष निघाला, याने फक्त आरडाओरड केली, त्या पुरुषाने मात्र याच्याकडून तब्बल २० हजार रुपये वसूल केले. तसेही जगात जेथे जेथे चिनी तोंडाची माणसे आहेत म्हणजे थेट नेपाळ पासून तर जपानपर्यंत, त्यांच्यातले नेमके स्त्री आणि पुरुष ओळखण्यासाठी नजर अतिशय ‘ तेज ‘ असावी लागते…
मुंबईतल्या अतुल्या ग्रुपचे सर्वेसर्वा, उद्योगपती महादेव जाधव, केवळ त्यांच्या नाव आणि आडनावावर जाऊ नका, केवळ नाव अभय आहे पण आमचा देशपांडे आडनाव असलेला पत्रकार मित्र बायकोलाही खूप घाबरून असतो आणि पुण्यातला पवार आडनावाचा कुल्फी विकणारा, शरद कुल्फीवाला म्हणून ओळखल्या जातो म्हणजे उद्या मी नाव आणि आडनाव बदलवून ‘ आसाराम बापू ‘ ठेवले म्हणजे एका झटक्यात परमेश्वर मला ठिकठिकाणी आश्रम बांधून देईल असे होत नसते. अमुक एखादया
व्यवसायात पडल्यानंतर विशेषतः भावुक मराठी माणसाने जर सावध राहून विचार करून जर प्रत्येक पाऊल टाकले तर त्याला पुढे जाणे फारसे कठीण नसते, महादेव जाधव यांचे ते तसेच आहेत, ते मेहनती आहेत, सावध आहेत, प्रसंगी श्रुड आहेत, म्हणाल तर योग्य वेळी योग्य ठिकाणी बोलके आहेत आणि हवे त्या ठिकाणी तोंडावर बोट ठेवून गप बसून ऐकणारे आहेत, त्यांना जगाचा अभ्यास आहे कारण त्यांचे व्यवसायानिमीत्ते सतत जगभर फिरणे सुरु असते, त्यांना नेमकी माणसे ओळखता येतात कारण आलेल्या बऱ्या वाईट अनुभवातून ते माणसे ओळखायला शिकले आहेत, त्यांची नाळ तशी ग्रामीण भागाशी आणि शेतकऱ्यांशी जुळलेली आहे कारण आज जरी ते मुंबईत असले तरी ग्रामीण भागात राहून त्यांनी गरिबीतले चटके सोसल्याने त्यांना आयुष्यात ग्रामीण भागातल्या मंडळींसाठीच अधिक काही तरी चांगले करायचे आहे. विशेष म्हणजे ते तरुण असल्याने पुढे आणखी आणखी खूप काही चांगले करण्यासाठी त्यांना संधी आहे, त्यांचे असे नाही कि एखाद्याने वयाची साठी उलटल्यावर उफाड्या तरुणीशी लग्न करून शेजारच्या तरुणांची सोया करून ठेवावी, योग्य वयात योग्य पाऊल उचलणारे हे महादेव जाधव, आज तरी त्यांच्याकडे बघून हेच वाटते, एक दिवस ते एकाचवेळी प्रसिद्ध उद्योजक आणि सुप्रसिद्ध समाजसेवक म्हणून अधीक नावारूपाला येतील…
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी