पार्थ अजित पवार : पत्रकार हेमंत जोशी
आधी थोडीशी चकल्लस, मस्ती नंतर नेमक्या विषयाला सुरुवात. पाळी चुकली म्हणून बापट त्यांच्या सारखी पुढे पुढे करणाऱ्या सेक्रेटरीला डॉक्टरकडे घेऊन गेले, तसे काही नाही, डोळे मिचकावत डॉक्टर म्हणाले, बापटांनी मग समाधानाचा सुस्कारा सोडला..पण कमरेला एक इंजेक्शन टोचावे लागेल, दगदगीने पाळी चुकली, डॉक्टर म्हणाले. नंतर काही केल्या पेटीकोटचा नाडा सुटेना, ते बघून बापट पुढे आले,मग हात बसलेल्या बापटांनी स्वतःच नाडा सोडायला घेतला वरून रागाने म्हणतातही कसे, हिचे हे नेहमीचेच, घरी आणि आता येथेही…
नागपूर अधिवेशन संपले म्हणून विमानाने परतलो, नागपूरच्या विमानतळावर अजितदादांच्या मोठ्या चिरंजीवांची म्हणजे पार्थ यांच्याशी भेट झाली. एवढ्या मोठ्या घराण्यातला हा ताकदवान बापाचा मुलगा, पण विमानात बसण्यासाठी थेट रांगेत उभा होता, अगदी शांततेत, आजूबाजूच्या नेत्यांना देखील माहित नव्हते कि हे पार्थ अजित पवार आहेत म्हणून..मानसशास्त्र असे सांगते कि मुले मोठी झाली कि त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात मनसोक्त उडू द्या, माझी माहिती अशी कि दादा त्यांच्या घरी या बाबतीत काहीसे मागे आहेत, त्यांनी म्हणे मुलांवर, अमुक करू नका, तमुक करू नका, अशी बंधने लादलेली आहेत आणि हे खरे असेल तर ते नक्की चुकीचे आहे, पार्थ असो कि त्याचा धाकटा भाऊ, दादांनी त्यांना त्यांच्या मनाने करू द्यावे, जगू द्यावे, बघा पार्थ एक दिवस बापापेक्षा किंवा आत्येपेक्षा, कदाचित काकेआजोबा शरद पवार यांच्या देखील पुढे निघून जाईल. अजून
आम्हीच यौवनात आहोत असे सांगलीच्या जयंत पाटलांनी किंवा बारामतीच्या अजित पवारांनी स्वतःचा गैरसमज करवून न घेता, पोटच्या प्रगल्भ वयातल्या मुलांना देखील संधी द्यावी. आता तर पुढल्या काही दिवसात जयंत पाटलांना सून देखील येणार आहे..जयंत पाटील किंवा अजित पवार हि सहजच उदाहरणे दिलीत पण अनेक बड्या घराण्यातून हे घडतांना दिसते म्हणजे बापाला विनाकारण वाटत असते कि आपणच तेवढे प्रगल्भ, हुशार आणि अनुभवी, मुले म्हणजे बेअक्कल त्यामुळे हमखास असे घडते कि अगदी सहज पैसे हाती पडत असल्याने आणि बाप कोणतीही जबाबदारी टाकत नसल्याने रिकामटेकडी श्रीमंत नेत्यांच्या घरातली तरुण मुले त्यातून व्यसनाधीन झालेली आढळतात, वाममार्गाला देखील लागतात, दारू ढोसतात किंवा ड्रग्स देखील घेतात..
ज्या मुलांच्या रक्तात पराक्रमी बापाचे गुण आहेत अशी तरुण पिढी सुरुवातीला कदाचित काही चुका करेल पण एक दिवस ते नक्की खूप खूप पुढे निघून जातात म्हणजे अकोल्याच्या माजी आमदार विठ्ठल पाटलांपेक्षा त्यांचा मुलगा राज्यमंत्री रणजित पाटील राजकारणात कितीतरी पुढे निघून गेलेला आहे, जे बापाला जमले नाही ते रणजित पाटलांनी राजकारणात शिरताच करून दाखविले. ते थेट राज्यमंत्री झाले..एक मात्र नक्की ज्या चुका वडिलांनी केल्या त्याच जर मुलांच्या हातूनही घडत असतील तर मात्र यश मिळणे नक्की अवघड ठरते,म्हणजे उद्या मेहेकर जिल्हा बुलढाण्याचे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी केवळ हेकट आणि उर्मट स्वभावातून सत्तेबाहेर फेकले गेलेले असतील पुढे त्यांच्या मुलाने राजकारणात प्रवेश केल्या नंतर असेच बापासारखे वागायचे ठरविले तर अशांची धडपड देखील नक्की अवघड ठरते. अर्थात येथे सुबोध सावजी हे अगदी गमतीने उदाहरण दिले. असे काही असेलच असे नाही…
मुलांनी देखील बापाच्या व्यवसायात किंवा क्षेत्रात उतरल्यानंतर बापालाच अडगळीत टाकून मोकळे होऊ नये अश्लील भाषेत
सांगायचे झाल्यास बापाला सेक्स करायला शिकवू नये म्हणजे उद्या नाशिकच्या दैनिक गावकरीतली किंवा अकोल्यातल्या दैनिक देशोन्नती मधली पुढली पिढी बापाला अक्कल शिकवायला लागली किंवा त्यांना फार्म हाऊस वर सोडून यायला लागली तर अशा घरातले, घराण्यातले वर्तमानपत्र दर्डा परिवाराच्या पुढे जाणे अशक्य वाटते कारण विजय किंवा राजेंद्र यांनी जवाहरलाल दर्डा यांना कधीही असे म्हटले नाही कि तुम्ही बाजूला व्हा, तुम्हाला अक्कल नाही. अर्थात देशोन्नती किंवा गावकरी हि देखील अगदी सहजच उदाहरणे दिलीत, आजही हि वर्तमानपत्रे नाही म्हणायला टिकून आहेत. मुले दीड शहाणी निघालीत कि असे बहुतेक घडू शकते, अनेकदा मला देखील हा अनुभव येतो पण मी बंड करून उठेल, असे मुलांना सांगितले कि ते गप बसतात प्रसंगी मग ते माझ्यामुळे नुकसान देखील सहन करतात. घरोघरी मातीच्या चुली…
तूर्त एवढेच:
पत्रकार हेमंत जोशी