महत्वाकांक्षी महाजन २ : पत्रकार हेमंत जोशी
किस्सा फार पूर्वीचा आहे, घडलेला सत्य किस्सा आहे, गावाचे नाव येथे सांगत नाही, मित्रांच्या ते लक्षात येईल म्हणून. आमच्या एका मित्राला आम्ही अनेकदा सांगितले होते कि तू तुझ्या जन्मापासून बऱ्यापैकी मंद बुद्धी असलेल्या मुलाचे लग्न करवून देऊ नको. तो जमीनदार होता, श्रीमंत होता, त्याला वारसदार हवा असल्याने त्याने त्या मुलाचे लग्न केले आणि नको तो घोर लावून घेतला. गरिबा घरची मुलगी सून करून आणली पण मुलास त्यातले काही कळतच नव्हते तो कोणत्याही अवयवाला काहीही म्हणायचा, आपल्या आईला सांगायचा, बघ माझ्या बायकोला केवढे मोठे फोड आले आहेत, बायकोने एक दिवस त्याची पप्पी घेतली, त्यावर तो म्हणाला, आता एक पप्पी दामूला दे, म्हणजे आई वडील घरी नसतांना त्याची सेवा करणाऱ्या तारण्या दामू गड्याला नको त्या ठिकाणी मदतीला घ्यायचा. हा किस्सा कृपया तुम्हाला हसविण्यासाठी नाही, माझ्या डोळ्यात पाणी आणणारा आहे. लग्न लावून दिल्यानंतर त्या मुलाच्या आई वडिलांची म्हणजे माझ्या मित्राच्या आणि त्याच्या बायकोची केविलवाणी अवस्था बघवत नसे. जे माहित नाही, जे जमणार नाही ते लादले कि हे असे होते. हा किस्सा मला येथे नेमका का आठवला हे तुम्हाला पुढे वाचता वाचता नक्की लक्षात येईल…
अलिकडल्या पन्नास वर्षातले मराठ्यांचे नेते कायम विशिष्ट घराण्यातूनच पुढे आले, येत आहेत, येत होते, त्याला बऱ्यापैकी छेद सर्वात आधी शिवसेनेने दिला नंतर भाजपाने देखील, पण सेना भाजपा ची हि चाल चतुर घराणे शाहीतल्या नेत्यांनी वेळीच ओळखली मग त्यांनी आपल्याच खानदानातले काही, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस ऐवजी शिवसेना आणि भाजपाकडे वळविले, त्यातून अनेक गमती जमती घडतात, घडल्या म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातली भाजपा गेली सात दशके प्रसंगी अर्धपोटी राहून संघ आणि जनसंघातल्या मूळ स्वयंसेवकांनी, कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, अनेकांनी आधी उभी केली मग वाढवली पण वाढलेल्या भाजपाचे जिल्हाध्यक्ष कोण तर ज्या नेत्याने संघाचे आणि भाजपाचे कधी तोंड देखील बघितलेले नाही, नव्हते किंवा संघ संस्कार आणि विचार किंवा भाजपाची कार्यपद्धती यावर ज्याचा शून्य टक्के अभ्यास आहे त्या काँग्रेसच्या माजी आमदाराला, अख्खी राजकीय हयात काँग्रेस मध्ये घालविलेल्या धृपत सावळे यांना जिल्हाध्यक्ष करण्यात आले आहे, गावातल्या सावकारासंगे नवरा सोडून सुहागरात साजरी करण्याची दुर्दैवी नौबत आलेल्या तरुणीसारखे बुलढाणा जिल्ह्यातल्या भाजपा नेत्यांचे, कार्यकर्त्याचे, संघ स्वयंसेवकांचे झाले आहे, म्हणजे बावळट रावसाहेब दानवे यांनी करून ठेवले आहे, कारण काय तर धृपत सावळे दानवेंच्या घरातले आहेत, मग मागेपुढे न बघता अविचारी मनाने दानवे यांनी धृपत सावळे यांना काँग्रेस मधून उचलून विनाकारण भाजपा मध्ये आधी आणले नंतर लगेच थेट भाजपचे जिल्हाध्यक्ष केले. थोडक्यात ज्याला सायकल चालविता येत नाही त्याच्या हाती बुलेट देऊन पाठीमागच्या सीटवर जणू एक बाई देखील बसवून ठेवली, साऱ्यांचेच त्यातून वाटोळे, भविष्य सांगणाऱ्यांची गरजच नाही…
विश्वासाने मी म्हणेन सेना भाजपाने या राज्यातल्या नेत्यांच्या घराणेशाहीला १९९५ नंतर बऱ्यापैकी छेद दिला तरीही या राज्यातले बहुसंख्य मराठे अस्वस्थ यासाठी होते किंवा त्यांना दिसत आले आहे, दिसत होते ते असे कि महाराष्ट्रात म्हणजे या राज्यातले असे कितीतरी मराठा तरुण आहेत कि जे अगदी सहजा सहजी शरद पवार, हर्षवर्धन पाटील, विखे पाटील, मोहिते पाटील इत्यादी घराणेशाही राबवणाऱ्यांच्या सहज पुढे जाऊन नवं नेते तडफदार नेतृत्व म्हणून नावारूपास येऊ शकतात, आणि ते घडून येते आहे, घडून आले आहे, मराठा आरक्षण मोर्च्यानिमित्ते या राज्यातले, कानाकोपऱ्यातले विविध तरुण, असंख्य तरुण नवं नेते म्हणून पुढे आलेले आहेत विशेष म्हणजे ज्या प्रस्थापित मराठा नेत्यांनी आरक्षण मोर्च्यात लुडबुड करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या बखोटीला धरून नवख्या नव्या नेत्यांतर्फे त्यांना बाहेर काढण्यात आले त्यामागे प्रमुख कारण हेच होते कि तुमच्याशिवायही मराठ्यांचे सक्षम नेतृत्व करण्याची फार मोठी कुवत अनेक मराठा तरुणांमध्ये आहे आणि यशस्वी मराठा आंदोलन त्या नवनेतृत्वाच्या कल्पकतेचे ज्वलंत उदाहरण ठरले, मला विश्वास आहे यापुढे मराठ्यांची नेहमीची, तीच ती नेत्यांमधली घराणेशाही नक्की कमी झालेली असेल, अनेक नवे नेते तेथे पुढे आलेले दिसतील, पुरुषोत्तम खेडेकरांसारखे असे काही मराठ्यांमधले समाज सुधारक, कि ज्यांचे हे नेमके स्वप्न होते की त्यांच्यातले, मराठ्यांमधले नवे नेते पुढे यावेत, सुरुवात छान झालेली आहे. या राज्यातले मराठ्यांमधले त्या अनिल गावंडे यांच्यासारखे अनेक तरुण माझे चांगले मित्र आहेत जे या मराठा आरक्षण मोर्चाचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नेतृत्व करीत होते त्यामुळे सत्य हेच आहे कि उद्याचे नेते यांच्यातलेच अनेक असणार आहेत,मराठ्यांमधले नवं नेतृत्व जबरदस्तीने पुढे आले आहे, प्रस्थापितांना मागे सारून, बाजूला ढकलून.
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी