भाकरी करपली ३ : पत्रकार हेमंत जोशी
या राज्यात हिंदुत्वाची धग आणि मराठी माणसांचा स्वाभिमान कायम राहावा कायम टिकून राहावा त्यासाठी आम्ही भाऊ तोरसेकरांसारखे काही पत्रकार तोडफोड स्वभावाचे असून देखील शक्यतो काही ठिकाणी म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या तिघा तरुण तडफदार नेत्यांच्या बाबतीत किंवा तत्सम नेत्यांच्या बाबतीत गप बसतो टीका करणे टाळतो, मी तर एकेकाळचा अगदीच जेमतेम शैक्षणिक पात्रता असलेला सामान्य खेडूत, नक्की अतिशय भाग्यवान आहे कारण ज्या भाऊ तोरसेकर यांचे अख्य्या जगात एक कोटी फॉलोअर्स आहेत त्या भाऊ तोरसेकर किंवा तत्सम मंडळींच्या सान्निध्यात माझे आयुष्य चालले आहे, थोर मंडळींना तर सारेच ओळखतात पण हि थोर माणसे जेव्हा मला व्यक्तिगत ओळखतात माझ्याशी संबंध ठेवून असतात, काय वर्णावे असे भाग्य, फार कमी लोकांच्या वाटेला येते…
मनात काही ठेवले नाही, उघड कबुली आज येथे दिलेली आहे कि होय, पृथ्वीराज चव्हाणांसारख्या काही मंडळींच्या चुकांकडे आम्ही अनेकदा कानाडोळा करतो कारण अशा मंडळींच्या दीर्घकाळ नेतृत्वाची राज्याला गरज असते. अनेकदा मनात विचार येतो कि या मंडळींच्या आसपास वावरणारे राजकारणातले जे बहुसंख्य दलालरूपी किंवा नेत्यांच्या रूपात घाऊक व्यापारी वृत्तीची माणसे आहेत ज्यांचे अनेक पुरावे माझ्याकडे असतात अशांची चड्डी सोडून मोकळे व्हावे पण लिहून मोकळे होता येत नाही, या बदमाशांच्या चांगल्या नेत्यांना प्रोटेक्ट करणे आवश्यक असते. जसे दारू पिणे वाईट आहे तरीही सीमेवर काम करणाऱ्या मंडळींना दारू प्या सांगितले जाते आणि वाजवी दरात किंवा फुकटात दारू पाजली जाते कारण तेथल्या अतिशय वाईट हवामानाशी आणि शत्रूंशी दोन हात करतांना अनेकदा काही प्रमाणात जवानांच्या पोटात औषध म्हणून दारू जाणे आवश्यक असते हे असेच आमचे कि काही गोष्टी वाईट आहेत माहित असते पण कानाडोळा करावालागतो हे मराठी राज्य अमराठीच्या हाती जाऊ नये त्यासाठी. भारतीय लष्करावरून आठवले, एकदा मी एकटाच रशियाच्या सीमेजवळ असलेल्या युरोपातल्या लाथविया वरून बसने थेट लीजवानीयाला निघालो होतो, बाहेर कडाक्याची थंडी, लीजवानीयाच्या राजधानीत जसा बसमधून खाली उतरलो, थंडीने पार गारठलो, वाटले आता येथेच आपला मृत्यू होईल, कसेबसे फक्त आणि फक्त वीस पावले समोरच्या डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये गेलो, रम विकत घेतली, पोटात ओतली आणि जीव वाचवला. कधीतरी दोन तीन महिन्यातून एखादा पेग मी नक्की घेतो पण त्यादिवशी अर्धी बाटली रिचवली होती, सीमेवर काम करणाऱ्या सैनिकांवरून सहजच हे उदाहरण आठवले…
सर्वश्री दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, एकनाथ शिंदे, डॉ. दीपक सावंत, हे मंत्री आणि संजय राठोड, दादाजी भुसे, विजय शिवतारे, दीपक केसरकर, रवींद्र वायकर, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर हेच ते राज्यमंत्री ज्यांच्यावर अलीकडे अगदी उघड जाहीर आणि जहरी टीका आमदार बाळू धानोरकर यांनी केलेली आहे, टीका रास्त आणि योग्य नक्की होती, आहे. मी मनात आणले तर या सार्या मंत्र्यांचे कितीतरी पुरावे माझ्याकडे आहेत पण बदनाम मंत्र्यांचे नेते होतील जर मी उद्या अगदी पुराव्यानिशी सांगितले कि परिवहन खात्यात काय चालले आहे किंवा एकनाथ शिंदे यांची मालमत्ता सर्वाधिक कुठे आहे म्हणजे साताऱ्यात कि ठाण्यात कि पुण्यात पण असेही नाही कि कधीही पुरावे उघड करणारच नाही जर पाणी डोक्यावरून वाहून जायला लागले तर कोणतीही भीती मनात न बाळगता जे धाडसी पत्रकार करतो तेच करून मी मोकळा होईल म्हणजे सांगून मोकळा होईल कि महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी नस्त्यांची सुनावणी घेतांना नेमके कोणते व का वादग्रस्त निर्णय घेतलेले आहेत किंवा सुभाष देसाई यांनी उद्योग खात्यात नसते कोणकोणते उद्योग करून ठेवलेले आहेत, त्यापेक्षा योग्यवेळी मातोश्रीवरून भाकरी परतविल्या गेली असती तर आज हे असे अस्वस्थ आणि अशांत वातावरण शिवसेना किंवा भाजपा आमदारांच्या गोटात निर्माण झाले नसते अर्थात ज्यादा अस्वस्थता शिवसेनेत आहे भाजपाकडे चाबूक हाती घेतलेले आणि निर्णय घेण्याचे अधिकार स्वतःकडे राखून ठेवलेले हेडमास्तर मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या आमदारांच्या नाराजीचे प्रमाण अगदीच कमी आहे हि झळ शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर बसते आहे, त्यावर दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांनीच योग्य मार्ग काढून त्वरित आणि तडफेने निर्णय घेणे अत्यावश्यक आहे, गरजेचे आहे…
जाऊ द्या, फार डोके खराब करून घेऊ नका, चला हसू या, एक चुटका सांगतो, पावसाळी अधिवेशनात अमरावतीचे संजय खोडके दिसले, ते भ्रमणध्वनी सतत, जवळपास अर्धा तास कानाला लावून होते, मला राहवले नाही, मी विचारलेच, लोकांना दाखवता आहे काय कि तुम्ही कसा नवीन आणि महागडा भ्रमणध्वनी संच विकत घेतलाय ते, मी बघतोय एकही शब्द तुमच्या तोंडून निघालेला नाही.जरा गप बसाल का, क्षणभर भ्रमणध्वनी बाजूला सारत खोडके म्हणाले, पुढे ते असेही म्हणाले, अहो, पलीकडून बायको बोलते आहे…
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी