अधू मेंदूचा मधू १ : पत्रकार हेमंत जोशी
मुंबईत दोन वेगवेगळ्या पक्षात दोन वेगवेगळे मधू चव्हाण आहेत, दोघेही प्रथितयश नेते आहेत त्यातले पहिले मधू चव्हाण हे भाजपाचे नेते आहेत, ज्यांच्यावर अलीकडे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश थेट न्यायालयाने दिलेले आहेत. दुसरे मधू चव्हाण काँग्रेसचे नेते आहेत.ज्यांचे स्वतःचे ढुंगण खरकटे आहे पण ते स्वतः कायम विविध वाहिन्यांवर येऊन इतरांना, तुमच्या ढुंगणाला गु कसा चिकटलेला सांगण्यात दाखवण्यात गुंतलेले असतात ते भाजपाचे मधू चव्हाण आधुनिक लखोबा लोखंडे आहेत आणि त्यांच्या या प्रवासात त्यांचे आणखी कोण मित्र सामील आहेत, मी नेमके सिद्ध करणार आहे.काँग्रेस चे मधू चव्हाण कायम हसतमुख असतात. भाजपाच्या मधू चव्हाणांची बायकांची लफडी बाहेर यायला लागली रे लागली कि ते सर्वात आधी बायकोच्या मागे नंतर बाळ माने, विनोद तावडे, भास्कर जाधव या मित्रांच्या मागे लपतात नंतर अगदीच गरज पडली तर ज्यांच्याकडे त्यांच्या लफड्यांची माहिती असते त्या सर्वांना भेटून आधी मोठ्यांदा भोकांड पसरतात नंतर प्रकरण कसे विविध वाहिन्या दाखविल्या नाही किंवा वर्तमानपत्रवाले छापणार नाहीत याची काळजी घेतात…
मधू चव्हाण यांनी आम्हाला फसविले आहे असे थेट पुराव्यांसहित सांगणाऱ्या पाच बायका मला माहित आहेत त्यांची इतरही अनेक प्रकरणे आहेत, होती पण बदनामीच्या भीतीने फारसे पुढे कोणी आलेले नाही पण या फसविलेल्या गेलेल्या बायकांमध्ये दोघी मात्र थेट पुढे आल्या, दामिनी चे रूप त्यांनी घेतलेआणि मधू चव्हाण बायकांच्या बाबतीत विकृत लंपट लखोबा लोखंडे कसे त्यांनी समाजासमोर आणले, विशेष म्हणजे ज्या स्त्रियांची मधू चव्हाण यांच्या कडून फसवणूक झाली त्यापैकी बहुतेक स्त्रिया या एकतर त्यांच्या शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या आहेत किंवा भाजपामध्ये त्यांना नेत्या म्हणून पुढे जायचे होते. आणखी एक महत्वाचा मुद्दा मधू चव्हाण यांच्याविरोधात जी स्त्री न्यायालयीन लढा लढते आहे तिला पडद्याआड राहून साथ देणाऱ्या काही स्त्रिया मधू चव्हाण यांच्या वासनेला बळी पडलेल्या आहेत अशी माझी माहिती आहे, पण कौतुक मात्र नायकायात लढणार्या स्त्रीचे वाटते..
जेव्हा मधू चव्हाण यांच्या शैक्षणिक संस्थेत काम करणाऱ्या या महिलेने चिपळूण येथे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली होती तेव्हा त्या तक्रारींचे सारे पुरावे एखाद्या हिंदी सिनेमात शोभावे त्यापद्धतीने थेट पोलिसांनीच गायब करून टाकले होते,आणि शोध मोहीम बंद करण्यात येते आहे असे पोलिसांनी थेट न्यायाधीशांसमोर सांगितले होते, या पोलिसांवर नेमका त्यावेळी कोणाचा राजकीय दबाव आला होता, ते शोधून काढण्याची आज खरी गरज आहे किंवा मधू चव्हाण आधी विवाहित असतांना आणि दोन मुलींचे बाप असतांना त्यांनी भाजपा मधल्या ज्या महिला नेत्याशी लग्न केले होते त्या प्रसंगी आजचे शिक्षण मंत्री विनोद तावडे हे देखील तेथे उपस्थित होते का किंवा आणखी त्या विवाह प्रसंगी कोण कोण उपस्थित होते ते तर दस्तुरखुद्द विनोद तावडे यांनीच पुढे येऊन सर्वांना सांगण्याची मोठी गरज आहे…
मधू चव्हाण त्यांच्या मित्रांच्या चौकडीत बायकांना फसविण्यात एकमेव तरबेज आहेत कि त्यांच्या या चौकडीत आणखी कोण नेमके लखोबा लोखंडे आहेत हेही समाजासमोर येणे अत्यंत गरजेचे आहे, आणि ते पुढे येणार नसेल तर मी तो पत्रकार असेल, मधू चव्हाण आणि त्यांच्या इतर बाईलवेड्या मित्रांची नेमकी प्रकरणे तुम्हाला पुराव्यांसहित सांगून मोकळा होईल. मी जेव्हा दहा बारा दिवसां पूर्वी मधू चव्हाण स्त्रीलंपट आहेत, थेट लिहून मोकळा झालो होतो, तेव्हा अनेकांनी मला हेच बिचारले कि तुम्ही जेव्हा एखाद्या नेत्यांवर असे थेट आरोप करून मोकळे होता, तुमच्यावर न्यायालयात बदनामीचा खटला दाखल होऊ शकतो, भीती वाटत नाही का, तेव्हा मी त्या सर्वांना हेच सांगितले होते कि अमुक एखाद्या नेत्यावर जेव्हा मी थेट आरोप करतो कि तू अमुक पद्धतीचा नालायक आहेस तेव्हा त्या नेत्याला देखील माहित असते कि माझ्याकडे कोणते पुरावे आहेत…
भाजपा नेते मधू चव्हाण हे स्त्रीलंपट किंवा लखोबा लोखंडे कसे त्यांना टॉन्ट मारणारे हे वाक्य केवळ काही दिवसांपूर्वी लिहिले होते आणि काल परवा सर्वांसमोर नेमके न्यायालयाने तेच आदेश दिलेत कि मधू चव्हाण यांनी फसवणूक केलेल्या स्त्रीला न्याय मिळवून देण्याची गरज आहे. कौतुक त्या पवित्र शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेने सतत ८-१० वर्षे कधी पोलिसात तर कधी न्यायालयात मधू चव्हाण यांच्याशी टक्कर दिली, पंगा घेतला आणि निदान न्यायालयाने तरी तिला शेवटी न्याय दिला, मी त्या स्त्रीच्या पाठीशी नक्की उभा असेल, भाजपा नेत्यांनी देखील या प्रकरणी मधू चव्हाण यांना साथ देऊ नये, अगदी नेमके शिक्षणमंत्री असलेल्या विनोद तावडे यांच्यासारख्या त्यांच्या मित्रांनी देखील त्यांना पाठीशी घालू नये, माझ्या प्रत्येक वाक्याला येथे नेमका अर्थ आहे हे वाहिन्या, पत्रकार, नेत्यांनी लक्षात घ्यावे. आपली बहीण त्याठिकाणी असती तर किंवा आपली एकुलती एक मुलगी त्याठिकाणी फसविल्या गेली असती तर, हा सवाल साऱ्यांनीच स्वतःला विचारावा कारण मधू चव्हाण प्रकरण फार फार गंभीर आहे, भाजपा संघ संस्कृतीत असे घडता कामा नये…
क्रमश :
पत्रकार हेमंत जोशी