रंगलेला सोहळा : पत्रकार हेमंत जोशी
भारतीय रस्त्यांवर धावणाऱ्या असंख्य मोटार गाड्यांचे शेप बघितले आठवले कि मनाशीच खूप हसायला येते जसे टोयोटा इनोव्हा एखाद्या लेकुरवाळ्या बाईसारखी दिसते वाटते, इनोव्हा च्या अंगाखांद्यावर कितीही लेकरं बसू द्या, तरीही ती सुसाट पळते. होंडा कारचे झाज मॉडेल आता बंद झालेले आहे पण त्या कार ची मागल्या बाजूची भली मोठी काच बघून वाटायचे, हि पाठ उघडी असलेल्या बाईसारखी आहे. टाटा कंपनीच्या कार्स कायम बार बालासारख्या, म्हणजे बाहेरून दिसायला एकदम देखण्या आणि आतून एकदम कंडम किंवा विविध महिंद्रा गाड्या म्हणजे घरातून ओवाळून टाकलेल्या तरुणींसारख्या, कुठेही कोणालाही अव्हेलेबल. मर्सिडीज कार्स म्हणजे वर्गातल्या भाव खाणाऱ्या सुंदर मुली, त्यांना वाटत असते आमच्यासारख्या आम्हीच, स्कोडा कार्स नवरा कर्जबाजारी झाला तरी खर्चिक स्वभावाच्या बायकांसारख्या, त्यांची येणारी मोठाली बिले बघून ते वाटते. मारोती कार्स म्हणजे कोरस नृत्यात मुख्य नर्तिकेच्या मागे उभे राहून हातवारे करणाऱ्या मुली म्हणजे नर्तिका एखादीच असते पण कोरस मध्ये नाचणाऱ्या भरमसाठ असतात, भारतीय रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर धावणाऱ्या कार्स म्हणजे मारोती…
नागपुरातल्या एका नेत्याने मात्र आपल्या आयुष्याला अगदी सुरुवातीपासून अतिशय सुंदर शेप दिलेला आहे, गिरीश गांधी हे ते नाव. त्यांच्या मनात अमुक एखादे व्यक्तिमत्व भरले कि ते त्या त्या व्यक्तींसाठी वाट्टेल ते करतात. स्वर्गवासी डॉ मोहन धारिया, संपर्कातून सहवासातून गिरीशभाऊंच्या असेच मनात भरले आणि धारियाजीँच्या नावाने गिरीशभाऊंनी दरवर्षी एका नामवंत व्यक्तीला ‘ राष्ट्रनिर्माण पुरस्कार देण्याचे ठरविले, मागल्या वर्षी थेट दिल्लीत गिरीशभाऊंनी एक दिमाखदार समारंभ घडवून आणला होता आणि राष्ट्रनिर्माण पुरस्कार माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना देण्यात आला, अलीकडे म्हणजे १३ ऑकटोबरला धारिया फौंडेशनने हा पुरस्कार डॉ. स्वामिनाथन यांना देऊन सन्मानित केले, नागपूरचे बनवारीलाल पुरोहित तामिळ नाडू चे राज्यपाल असल्याने हा समारंभ थेट राज भवन मध्ये माननीय राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्स्थितीत साजरा केल्या गेला…
समारंभ गिरीश गांधी यांचा असल्याने तो देखणा आटोपशीर झाला पार पडला हे वेगळे सांगण्याची लिहिण्याची गरजच नसते किंबहुना हे वाक्य नागपुरातल्या प्रत्येक पत्रकाराचे तोंडपाठ झालेले आहे आणि गिरीश गांधी यांना नागपूरकर कार्यक्रम सम्राट म्हणूनच ओळखतात. विविध देखणे समारंभ घडवून आणणारा असा नेता माझ्या पत्रकारितेच्या दीर्घ वाटचालीत मी बघितलेला नाही म्हणजे असा एकही आठवडा जात नाही ज्या आठवड्यात गिरीशभाऊंनी अमुक एखादा समारंभ घडवून आणला नाही किंबहुना उद्या गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड ने त्यांची दाखल घेतल्यास मला, नागपूरकरांना, गिरीशभाऊंना जवळून ओळखणार्या त्यांच्या जगभरातल्या संख्यने फार मोठ्या असलेल्या मित्र परिवाराला त्यावर फारसे, अजिबात, नक्कीच आश्चर्य वाटणार नाही….
आणखी एक महत्वाचे, त्याने यावे भाषण करावे आणि भाषण संपत आले असतांनाच समोर किंवा स्टेजवर बसलेल्यांना १०० टक्के जिंकून बाहेर पडावे, हे उत्कृष्ट भाषण तंत्र मुख्यमंत्री फडणवीस यांना अंगवळणी पडलेले असल्याने देवेंद्र मग ते मला महाविद्यालयात शिकत असतानाचे आठवत असतील किंवा आज ते एक यशस्वी मुखमंत्री म्हणून, त्यांचे जगभरात कुठेही भाषण झाले आणि ते आश्वासक वाटले नाही, आवडले नाही असे आजपर्यंत कधीही त्यांच्या बाबतीत घडलेले नाही त्यामुळे त्यांचे ते त्यादिवशी चेन्नईतले भाषण, ते संपल्यानंतर मला एक चेन्नईकर म्हणाला, वाईट वाटते, फडणवीस आमचे मुख्यमंत्री नाहीत, अर्थात जगविख्यात डॉ. स्वामिनाथन वयाच्या ९१ व्या वर्षी फडणवीसांचे भाषण ऐकतांना तल्लीन झाले होते, तेथे इतर सर्वसामान्यांना देवेंद्र यांचे भाषण न आवडणे म्हणजे एखाद्या खवय्याला देवेंद्रजींच्या आईंच्या हातची पुरणाची पोळी न आवडण्यासारखे…
तूर्त एवढेच.
पत्रकार हेमंत जोशी