विखारी विचार विषारी प्रचार : पत्रकार हेमंत जोशी
शब्दांमध्ये फार मोठी जादू आहे, शब्द बोलतांना आणि लिहितांना शंभर वेळा विचार करावा मगच पुढे जावे, शब्द जपून बोलावेत आणि मापून लिहावेत, म्हणजे अनर्थ टळतो. मराठी तर द्विअर्थी शब्दांनी वाक्यांनी समृद्ध अशी भाषा आहे, अगदी अलीकडे असाच एक चुटका वाचला,
एका पिटुकल्या नागड्या मुलाला अंगणात खेळतांना बघून,
शेजारचे पाटील काका म्हणाले,
बाळा, आज तुझया आईने चड्डी घातलेली
दिसत नाही…
त्यावर बाळाची आई आतूनच ओरडून
सांगते, मी घातली होती पण त्याच्या
बाबांनी काढली..
त्याच्या बापालाच जरा समजवा कि,
चड्डी घातली रे घातली कि त्यांनी
काढलीच म्हणून समजा, त्यांची ती
जुनी खोड आहे…
कृपया वर सांगितलेल्या वाक्यातून अर्थाचे अनर्थ करवून घेऊ नका. अगदी अलीकडे अनेकांच्या विशेषतः ब्राम्हणांच्या व्हाट्सअप वर एक मेसेज फिरत होता, हा मेसेज देखील असाच अनर्थ पसरविणारा होता पण मी नेमकी माहिती जेव्हा घेतली तेव्हा वेगळे असे विदारक सत्य त्यातून समजले. मेसेज असा होता, सकाळ हे वृत्तपत्र शरद पवार आणि पवार कुटुंबाच्या मालकीचे आहे आणि हा माणूस ब्राम्हणद्वेष्टा आहे हे आपण सारे जाणून आहोत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विशेषतः पुण्यातले जवळपास सारे ब्राम्हण सकाळ वाचतात कारण त्यांचे नानासाहेब परुळेकरांवर आणि परुळेकर कुटुंबावर विशेष प्रेम आहे, प्रेम होते, ज्या परुळेकरांनी सकाळ वृत्तपत्र सुरु केले पुढे याच पवारांनी ५१% भागभांडवल विकत घेऊन सकाळ ची मालकी आपल्याकडे घेतली वपरुळेकरांना च्यू बनवून स्वतःच मालक बनले. दुर्दैवाने नानासाहेबांची मुलगी मरेपर्यंत पवारांच्या विरोधात न्यायालयात लढली, तिला पवारांनी तेथेही यशस्वी होऊ दिले नाही आणि पवारांनी सकाळ व परुळेकरांनी मालमत्ता
यथावकाश हडपली, हे तुम्हा सर्वांना उत्तमरीतीने माहित आहेच. मध्यंतरी सकाळ मधल्या अनेक ब्राम्हण कर्मचाऱ्यांकडून काहीतरी निमित्ते पुढे करून राजीनामे घेतल्या गेले हेही तुम्हाला माहित असून तुमचे सकाळ वृत्तपत्र वाचणे अद्याप बंद झालेले नाही, नको ती सवय लागलेली आहे म्हणून…ब्राम्हणांनी जर ठरविले कि सकाळ वाचणे यापुढे बंद, त्यातून सकाळ चा खप ६० ते ६५ टक्के आपोआप कमी होईल. कृपया हा मेसेज राज्यातील ब्राम्हण मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा…
वर लिहिलेले हे पत्रक वाचल्यानंतर अनेक प्रश्न शंका निर्माण होतात. अत्यंत महत्वाचे म्हणजे वाचणाऱ्या ब्राम्हणाला खरेच हे वाटेल कि कुण्या एका ब्राम्हणाने सकाळ आणि पवारांना अद्दल घडविण्यासाठी मुद्दाम पत्रक काढलेले आहे आणि जे ब्राम्हण नाहीत त्यांनी हे पत्रक वाचले कि आधीच अनेकांच्या मनात ब्राम्हणांविषयी राग आणि शंका कुशंका, सर्वसामान्य माणसे त्यातून अस्वस्थ होतात आणि जाती जातींमध्ये उगाचच विष कालविल्या जाते. विशेष म्हणजे उद्यापासून समजा ब्राम्हणांनी सकाळ विकत घेण्याचे किंवा वाचण्याचे बंद केले तर मला नाही वाटत त्याने पवार आणि कुटुंबियांना फारसा फरक पडेल उलट सकाळ चा खप अधिक वाढेल हे लक्षात घ्या. त्यापुढे जाऊन मी म्हणेन, समजा ब्राम्हणेतर मंडळींनी जर ब्राह्मणांची मालकी असलेले वृत्तपत्रे वाचणे बंद केले तर, ब्राह्मणांचे नक्की पवारांसारखे नाही, वृत्तपत्रांचे ब्राम्हण मालक नक्की रस्त्यावर येतील, त्यांच्या नशिबी पुन्हा शबनम आणि झोळी येईल…
आता जो गौप्य्स्फोट मला करायचा आहे तत्पूर्वी अलीकडे मीच सांगितलेला लिहिलेला एक किस्सा पुन्हा येथे सांगतो, रिपीट करतो. काही वर्षांपूर्वी जेव्हा विदर्भातल्या अकोल्यातून भास्कर ग्रुपचे ‘ दिव्य मराठी ‘ हे दैनिक सुरु झाले तेव्हा याच विदर्भातल्या एका प्रस्थापित वृत्तपत्राने खालच्या पातळीवर जाऊन दिव्य मराठीचा मोठा गेम केला. या हलकट विचाराच्या दैनिकाच्या मालकांनी आपल्या वृत्तपत्रातले काही विश्वासू दिव्य मराठी मध्ये वेगवेगळ्या पदांवर पाठविले आणि दिव्य मराठीचे लवकरात लवकर बारा वाजण्याचे चोख काम त्यांनी पार पाडले. नेमकी तीच पुनरावृत्ती सकाळ च्या बाबतीत देखील घडलेली आहे, अशी माझी माहिती आहे. ब्राम्हणांच्या खांदयावर बंदूक ठेवून समोरच्याला अडचणीत आणण्याचे काम सकाळ च्या स्पर्धेत असलेल्या वृत्तपत्राने केले आहे अशी माझी नेमकी माहिती आहे. येथे ना मला सकाळ ची बाजू घ्यायची आहे ना सकाळ च्या स्पर्धेत असलेल्या कोणत्याही वृत्तपत्राची कारण दोन्ही वृत्तपत्रांविषयी मी चांगले बोलू लिहू शकत नाही त्यामुळे कोणाचीही बाजू येथे घेणे नाही फक्त ब्राम्हणांवर आधीच अनेक संकटे असतांना त्यांच्या खांदयावर बंदूक ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना केवळ रांडेची उपमा देणे योग्य आहे आणि तीच त्यांची कायम आजपर्यँत हलकट स्वार्थी वृत्ती सदा सर्वदा दिसलेली आहे…
तूर्त एवढेच.
पत्रकार हेमंत जोशी