उत्सवी आणि उत्साही १ : पत्रकार हेमंत जोशी
बघता बघता चार वर्षे झालीत देवेंद्र फडणवीसांचे सरकार सत्तेत येऊन, फडणवीस आणि ठाकरे या दोन मित्रांनी एक मोठी चूक केली ज्यांचा त्यांना थोड्या अधिक प्रमाणात येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत त्रास होणार आहे, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी किमान सात आठ महिन्यांपूर्वीच राज्यातल्या विविध महामंडळांवर त्यांच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची वर्णी लावणे आणि मंत्रिमंडळ विस्तार व बदल करून विधानसभेत म्हणजे जनतेततून निवडून आलेल्यांची वर्णी लावणे अत्यावश्यक होते. ते त्यांनी तेव्हा केले नाही, आता बऱ्यापैकी वेळ निघून गेली आहे, अमित शाह यांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि बदलाची मुख्यमंत्र्यांनी केलेली विनंती फारशी सिरीयस घेतली नाही, निदान अद्यापपर्यंत घेतलेली नाही आणि तुमच्यासंगे मी पण करेन, असे उद्धवजींनी मित्रवर्य देवेंद्र यांना सांगितले होते, ते तसेच मग सेनेच्याही बाबतीत घडले, मंत्रिमंडळ विस्तार आणि बदलाचे भिजत घोंगडे पडले…
मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे राजकारणापलीकडे एकमेकांचे अतिशय चांगले मित्र आहेत आणि फडणवीसांच्या देहबोलीतून त्यांना उद्धव यांच्याविषयी सिनियर मित्र आणि मान्यवर मराठी नेता म्हणून असलेला आदर अनेकदा ओसंडून वाहतांना उद्धवजी आणि त्यांच्या निवडक जिवलग सहकाऱ्यांनी अनुभवला आहे, बघितला आहे, त्यामुळे इतर उपटसुम्भ जेव्हा त्या दोघात ठिणगी टाकण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते दोघे आपापसात मोठमोठ्याने हसत असतात.एकटा विराट कोहली चांगला कप्तान असून उपयोगाचे नसते अख्खी चमू तेवढीच दर्जेदार असावी लागते अन्यथा कप्तानाची केवढी आणि कशी दमछाक होते हे सर्वांना माहित आहे. फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळाचे कप्तान म्हणून नक्की गांगुली, शर्मा, धोनी, कोहली आहेत पण त्यांच्या संगतीने सचिन तेंडुलकर म्हणून बघावेत किंवा राहुल द्रविड म्हणून अनुभवावेत असे अगदी बोटावर मोजण्या एवढे मंत्री आहेत, त्यातलेच एक आहेत म्हणाल तर फडणवीसांचे सवंगडी म्हणाल तर सहकारी म्हणाल तर सोबती म्हणाल तर साथीदार आणि ते आहेत या राज्याचे जलसंधारण आणि वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री श्री गिरीश महाजन…
गिरीश महाजन यांनी जी दोन ठळक कामे अजिबात आराम न करता केलीत, त्यांना अगदी वाकून त्यावर कुर्निसात, ढोपरापासून सलाम, पहिले अत्यंत अत्यंत महत्वाचे काम म्हणजे आघाडीच्या काळात ज्या हजारो करोडो रुपयांच्या विविध कामाच्या निविदा जलसंधारण खात्यातल्या विविध प्रकल्पांवर निघाल्या ठरलेल्या किमतीपेक्षा त्या कधीही कमी भावाने निघाल्या नाहीत कारण त्यावेळी संबंधित मंत्र्यांना आणि त्यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांना, कंत्राटदारांना, दलालांना, अभियंत्यांना खायचे होते ते फक्त आणि फक्त पैसे, हरामखोर कुठले…आणि युती सत्तेत आल्यानंतर महाजन मंत्री झाल्यापासून आजतागायत जवळपास ज्या चार हजार विविध कामांच्या या राज्यात ज्जलसंधारण खात्यात निविदा काढण्यात आल्या त्यातली एकही निविदा ठरलेल्या ठरविल्या गेल्या किमतीपेक्षा अधिक ज्यादा किमतीने निघाली नाही, विशेष म्हणजे अशी एकही निविदा निघाली नाही जी ठरलेल्या किमतीपेक्षा कमी दराने निघाली नाही, ठरलेल्या आधारभूत किंमतीपेक्षा साऱ्याच निविदा कमी भावाने निघाल्या आणि विशेष म्हणजे अधिकारी आणि अभियंते तेच होते जे आघाडीच्या कार्यकाळात देखील मंत्र्यांसमोर पुढे पुढे करणारे होते, सरकारचे पर्यायाने जनतेचे करोडो रुपये वाचविणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांचे मनापासून आभार…आणि महाजनांचे दुसरे महत्कार्य म्हणजे त्यांनी आमदार पुढे नामदार झाल्यापासून न मोजता येणाऱ्या या राज्यातल्या त्यांच्या जळगाव जिल्ह्यातल्या, उभ्या महाराष्ट्रातल्या रुग्णांची केलेली सेवा, जणू घरातला एक रुग्ण हे नाते त्या साऱ्यांशी निर्माण करून गिरीश महाजन आणि त्यांच्या रामेश्वर सारख्या सहकाऱ्यांनी घेतलेली मोठमोठाली आरोग्य शिबिरे, रुग्णांना दिलेल्या स्वखर्चातून शासकीय खर्चातून विविध सेवा, एक नक्की फडणवीस हे महाजन यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे नसते तर हे शक्य देखील झाले नसते, अत्यंत महत्वाचे म्हणजे कोणत्याही सार्वजनिक उपक्रमात फडणवीस नेहमी आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीशी उभे असतात, महाजनांनी त्यांच्या या चांगल्या वृत्रीचा खूप फायदा करवून घेतला, इतरांची हे असे काही चांगले करण्याची इच्छानसल्याने फार कमी मंत्री ‘ महाजन ‘ होऊ शकले त्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सारखे अन्यथा काही मंत्र्यांना तर भेटायला येणाऱ्या तरुण बायकांची वक्षस्थळे आणि भेटायला येणाऱ्या पुरुषांच्या खिशातले पैसे तेवढे दिसतात, दिसत आलेले आहेत. अगदी अलीकडे गिरीश महाजन यांनी नेहमीप्रमाणे दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातल्या मतदार संघात जे आरोयग्य शिबीर घेतले त्यात अमुक एखाद्या मतदाराचे कुटुंबसदस्य त्याचे घर सहभागी झाले नाही असे मला फडणवीसांचा एक सहकारी सांगत होता आणि महाजन तर मला म्हणाले नागपुरातले हे घेतलेले आरोग्य शिबीर आधीच्या महाजनांनी आयोजित केलेल्या शिबिरांसमोर कितीतरी पटीने लहान होते, म्हणजे केवढे मोठे हे काम, गिरीश महाजन आणि त्यांचे सहकारी चुकले तर नक्की माझया तावडीत सापडणारे पण नेता मग तो कोणीही असो, चांगल्या कामांवर कंजुषी न करता मी वाट्टेल तेवढे कौतुकपर शब्द वापरायला तयार असतो, महाजनांचे अभिनंदन…
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी