उत्साही आणि उत्सवी ४ : पत्रकार हेमंत जोशी
ती स्त्री कोणत्या क्षेत्रातली येथे मला सांगता येणार नाही, नेमका संदर्भ सांगितला तर तुम्हाला ते ओळखणे सहज शक्य होईल, म्हणून सांगणे टाळतो. किस्सा अलिकडल्या काही वर्षांपूर्वीचा, एके सकाळी तिचा मला यासाठी फोन आला कि तिच्या नवऱ्याला जे. जे. इस्पितळात तातडीने दाखल करणे गरजेचे होते पण वॉर्ड फुल असल्याने ते शक्य नव्हते म्हणून तिने मला फोनवरून सांगितले कि डॉ. तात्याराव लहाने यांना मी सांगून तिचे तेवढे काम करून द्यावे. मी डॉक्तरांना फोन केला, त्यांनी माझी विनंती लगेच मान्य केली कारण एड्स च्या वॉर्ड मध्ये गर्दी असते, दाखल करून घेणे कठीण असे काम असते…
ती तरुण स्त्री दिसायला आकर्षक पण एड्स झालेल्या पतीसंगे कित्येक वर्षांपासून केवळ वन रूम किचन च्या सदनिकेत राहत होती. नवर्याला एड्स झाल्याचे म्हणे तिला फार उशिरा कळले होते. त्यामुळे एकंदरीत सारेच चित्र संशयास्पद आणि धोकादायक देखील, तिच्या मागे भले भले फिरणारे बघितलेत कि मलाच कसेतरी होते. पण चूक त्या ऐय्याशी नवऱ्याची, तिचे
काय चुकले? अनेकदा कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर पडलेल्या तरुण स्त्रिया भरकटतात बिघडतात. तरुण त्यात देखणी स्त्री एकदा का तिच्या मजबुरीमुळे पुरुषांच्या तावडीत सापडली रे सापडली कि तिच्या शरीराचे आणि आयुष्याचे पोतेरे आणि मातेरे झालेच म्हणून समजा. राजकीय क्षेत्र तर त्या सिनेसृष्टीपेक्षा कितीतरी अधिक गचाळ व गलिच्छ, राजकीय वर्तुळात एखादी तरुण स्त्री पैशांसाठी किंवा सत्तेसाठी वावरतांना दिसली रे दिसली कि तिची हंसा वाडकर व्हायला अजिबात वेळ लागत नाही. ज्या मात्र प्रोटेक्टेड राजकीय कुटुंबातून येतात त्या तेवढ्या नक्की सुरक्षित असतात जर स्वतः आगाऊ नसल्या तर, अन्यथा आमचे विकृत पुढारी दलाल आणि अधिकारी तावडीत सापडलेल्या स्त्रियांचे गावजेवण करून ठेवतात, पाळीपाळीने आणि तेही एकमेकांना निरोप देत अशा भंडाऱ्यावर सारे तुटून पडतात…
अगदी अलीकडे वर उल्लेख केलेली ती स्त्री मंत्रालयात वीजमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भेटली, तिचे काही काम त्यांच्याकडे होते, नेहमीप्रमाणे बावनकुळेंच्या कार्यालयात प्रचंड गर्दी होती, ते अँटी चेंबर मध्ये कसल्याशा मिटिंग मध्ये व्यस्त होते.तिने मला गळ घातली, तेवढे त्यांच्याकडून काम करवून देण्याची, बावनकुळे यांच्याऐवजी जर बायकांच्या बाबतीत चालू असलेल्या एखाद्या मंत्र्यांकडे ती भेटली असती तर मी त्या मंत्र्याला आधीच सावध केले असते अन्यथा एक दिवस तो मंत्री जे जे इस्पितळात दाखल झाल्याचे कानावर आले असते…
मी बाहेर उभ्या असलेल्या बावनकुळेंच्या स्वीय सहाययकाला तिचे काम करवून द्यायला सांगिले आणि तेथून निघालो. दुसरे दिवशी हा किस्सा मी बावनकुळेंना सांगितला. स्त्रियांच्या बाबतीत तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही काम घेऊन आलेल्या स्त्रियांकडे खालची नजर वर न करता त्यांच्या उरोजांकडे न बघता तेथल्या तेथे काम करून देता हे मला माहित व खात्री असल्याने मी तुम्हाला सावध केले नाही. अर्थात त्यांनी तिचेही एक झटक्यात काम करून दिले, तिचे नाव देखील विचारले नाही. पण हि स्त्री कामे करवून घेण्यासाठी आणखी कोणा कोणाकडे जाते, याची पक्की माहिती घ्यावी लागणार आहे. एक मात्र नक्की आहे, बावनकुळे जागेवर नसतील तर भेटणारी माणसे हमखास विश्वास पाठक यांना भेटतात, तेही भेटायला येणाऱ्या तरुण स्त्रियांच्या बाबतीत सहानुभूती पुरते, त्यापुढे जात नाहीत. पैशांच्या बाबतीत देखील पाठक एवढे सोवळे कि त्यांना एखाद्याला आर्थिक मदत द्यायची झाल्यास ते थेट बँकेतली मुदत ठेवी मोडून एखाद्याला आर्थिक सहकार्य करतात, अशी माझी माहिती आहे…
हिच स्त्री अलीकडे देवाघरी गेलेल्या माझ्या एका कंत्राटदार उद्योजक मित्राकडे अनेकदा त्यांच्या पवई येथील कार्यालयात जात असे पण त्यांनाही मला कधी सांगावे लागले नाही कि हे व्यक्तिमत्व कसे डेंजरस आहे कारण ते देखील परस्रीयांच्या बाबतीत अतिशय सुसंस्कृत आणि सज्जन होते, पण त्यांच्या निधनानंतर ती त्या उद्योगपतींच्या धाकट्या मुलाकडे जाते का, हे मात्र चेक
करायला, माहिती घ्यायला मी विसरलो आहे, माहिती घेतो. एक मात्र नक्की, ज्या मंत्र्यांसभोवताली चांगली माणसे नसतात, ज्यांचा स्टाफ हलकट हेकट बनेल भ्रष्ट उर्मट नालायक असतो आणि जो मंत्री काम घेऊन तरुण स्त्री आली रे आली कि तिच्या छातीकडे आधी बघतो आणि कामे घेऊन येणाऱ्या पुरुषांच्या खिशात किती पैसे आहेत, त्याचे राजकीय करिअर संपवायला आणि संपायला फार अवधी लागत नाही….
वर सांगितलेले किस्से आणि विनोद तावडे किंवा एकनाथ खडसे यांचा येथे तुम्ही बादरायण संबंध लावू नका पण त्या दोघांनाही मी अगदी तळमळीने हेच सांगत आलोय कि आलेल्या संधीचा जर तुम्ही सकारात्मक फायदा घेतला तर एक दिवस या राज्याचे मुख्यमंत्री होणे तुम्हाला अगदी सहज शक्य आहे, चंद्रकांत पाटलांसारखे शांतपणे ऐकून घेतात आणि सावध देखील होतात, खडसे यांनी ऐकले नाही, तावडेनी देखील माझे सांगणे फारसे मनावर घेतलेले नाही, हि मंडळी अनेकदा माझ्या तळमळीने सांगण्याचा वेगळा अर्थ काढतात. पुढे असे नेते हमखास राजकारणातून अस्ताव्यस्त होतात, बरेचदा त्यांचा राजकीय अस्त होतो. येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत तावडे यांना त्यांच्या मतदारसंघात आणि भाजपामध्ये मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. तावडेंना तब्बल दहा वर्षांपूर्वी मी सांगितले होते कि ज्या आशिष शेलार यांना तुम्ही राजकारणात मोठी संधी देऊ बघताहात ते आशिष एक दिवस तुमच्या फार पुढे निघून जातील, मी जे सांगितले ते तंतोतंत खरे ठरले. मला असे वाटते, विनोद ऐवजी जर त्यांच्याच तोलामोलाच्या पत्नी वर्षा यांना जर भाजपाने संधी दिली असती तर विनोदजींच्या पत्नी वर्षा यांना वर्षा बंगल्यावर स्थान मिळविणे कठीण गेले नसते पण त्या अडगळीत पडल्या आणि आता तर त्या केवळ कविता कारण्यापुरत्या उरल्या, असे समजते, त्यांच्या बऱ्याचशा कविता म्हणे वैयक्तिक आयुष्याशी निगडित आहेत, वाचून ठरवूया. वर्षा नक्की विनोदजींच्या आहेत पण विनोदजी वर्षाजींचे आहेत का, हेही कधीतरी विचारायला हवे…
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी