राष्ट्रीय स्वयंसेवक संघ २ : पत्रकार हेमंत जोशी
अगदी सुरुवातीला जेव्हा माझे दिवंगत भय्यू महाराजांविषयी चांगले मत होते तेव्हा एकदा मी त्यांना म्हणालो होतो कि तुम्ही माझ्या विदर्भातल्या गावगाड्यातल्या तरुणांचे आवडते संत, महाराज आहात. ग्रामस्थ तरुण पिढीतल्या आईवडिलांची एक मोठी काळजी तुमच्यामुळे दूर झाली आहे कारण हा रांगडा तरुण वर्ग संध्याकाळ झाली रे झाली कि गरिबी बेकारी नापिकीतुन आलेल्या नैराश्येमुळे जो दारूच्या अड्ड्यांवर परमिट रुम मध्ये एकत्र जमायचा तो आता तुमच्याभोवताली गुरफटल्याने कदाचित नजीकच्या दिवसात हे अड्डे ओस पडतील पण पुढे ते घडले नाही कारण दारूचे अड्डे परवडले पण भय्यू महाराज नकोत असे सर्वांच्याच लक्षात आल्याने हळूहळू एक एक भक्त त्यांच्यापासून दूर गेले, दूर जात होते. याउलट ढोंगी संतपरंपरा हि घडविणारी नव्हे तर बिघडविणारी आणि लुटणारी गुंड विकृत हलकट प्रवृत्ती आहे हे सर्वसामान्य भोळ्याभाबड्या मराठींच्याही अलीकडे लक्षात येऊ लागलेले आहे….
संस्कार देणारे सुविचार सांगणारे काटक पिढी तयार करणारे देशभक्ती रोमारोमात भिनविणारे जाज्वल्य देशप्रेम वाढविणारे हिंदुत्वाचे महत्व पटवून सांगणारे अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे जी वेळ नेमकी तरुण पिढीला व्यसनात ढकलते त्या नाजूक वेळेत तरुण पिढीला गुंतवून गुरफटून ठेवणारे एक मोठे स्थान स्पर्धेच्या आणि टीव्हीच्या युगात आमच्याकडून हिरावले गेले आणि ते स्थान म्हणजे संघस्थान, संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत गावोगावी एकेकाळी भरणाऱ्या संघशाखा. होय, या संघशाखा जवळपास सर्वत्र लयाला गेल्या, संपुष्टात आल्या त्यातून विशेषतः घडण्याचे बिघडण्याचे जे वय असते त्या वयातल्या मुलांचे मोठे नुकसान झाले. संघाचे कार्य भलेहिजगभर वाढले असेल पण संघस्थान संघशाखा मात्र तुमच्याआमच्यापासून हिरवल्या गेल्या, बघता बघता अगदी नजरेसमोरून अस्ताला गेल्या, बंद पडल्या. महत्वाचे म्हणजे माझी पुढली पिढी मी संध्यकाळच्या संघशाखेत उत्तम संस्कार देण्यासाठी पाठवू शकलो नाही याचे तीव्र दुःख मला कायम होत आले आहे. हिंदूंमधल्या जातीपाती विसरायला लावणारे आणि पाकिस्थान विषयी नफरत उत्पन्न करायला शिकविणारे संघशाखा हे अतिशय चांगले उत्कृष्ट माध्यम या राज्यातून या देशातून लयाला गेले अस्ताला गेले संपले हे अजिबात चांगले घडलेले नाही….
www.vikrantjoshi.com
ज्यांच्यावर संघशाखेतून संस्कार केल्या गेले ते अगदीच नालायक निघाले असे क्वचित खचित घडले घडायचे. स्पर्धेच्या युगात आणि पाश्चिमात्य वारे आपल्या या देशात जेव्हा खूप जोराने वाहायला लागले आहेत नेमक्या त्याचवेळी संघशाखा बंद पडणे किंवा ओस पडणे हे हिंदुत्व मानणाऱ्या भारतीयांचे झालेले फार मोठे नुकसान आहे असे येथे ठासून सांगता येईल. संध्यकाळी देवाजवळ बसून शुभम करोति म्हणण्यापेक्षा देखील संघशाखा संस्कारांचे उत्तम माध्यम होते हेही येथे नमूद करावे लागेल. गावातल्या एकमेकांच्या काळजी घेण्याचे एक बलस्थान जणू लयाला गेले, या पिढीला संघशाखा म्हणजे काय, हे देखील माहित नाही यापेक्षा दुर्दैव ते कोणते ? विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी अनेकांचे दुमत असेल विरोध असेल पण संघशाखेत आपल्या मुलांनी जावे हे संघ जनसंघ विरोधी कुटुंबांना देखील वाटायचे हि वस्तुस्थिती होती, आहे. प्रसंगी पोटाला चिमटा देऊन पण भगव्या ध्वजाला साक्षात गुरु मानून वर्षातून एकदा त्याला गुरुदक्षिणा अर्पण करणारे आणि त्या गुरुदक्षितल्या पै पै चा सदुपयोग करणारे त्याकाळचे कट्टर कडवे संघ प्रचारक, पदाधिकारी, संघस्वयंसेवक आज आठवलेत तरी माथा नतमस्तक होतो, या देशाचे हिंदुत्व टिकविण्यात अग्रेसर राहिलेल्या संघशाखा नष्ट होणे म्हणजे एखाद्याची प्रेयसी अपघातात सापडून ठार झाल्यासारखे वारंवार वाटत राहते, लढवय्या सैनिक धारातीर्थ पडल्याचे दुःख होते…
मैदानावरचे रांगडे देशी खेळ त्या लाठ्याकाठ्या फिरविणे देशभक्तीपर गीते, आणि गावातल्या ज्ञानी व्यक्तीकडून न चुकता बौद्धिकातून उत्तम ज्ञानाचे डोस मग वर्षातून अनेकदा एकत्र येऊन जातपात विसरायला लावून मांडीला मांडी लावून एखाद्या निमित्ताने शुद्ध शाकाहारी खाणेपिणे, हे सारे एका कडव्या शिस्तीत तेही गावातल्या उत्तमोत्तम मंडळींच्या सान्निध्यात राहून आणि संघस्थान सुटले कि एकमेकांना साथसंगत करीत करीत घरी पोहोचणे, हे सारे आता दुर्दैवाने संपलेले आहे, पाश्चिमात्य वातावरण सर्वत्र माजले संचारले आहे निदान हिंदूंचे ते मोठे नुकसान आहे. मुस्लिम जसे नमाज पढण्याच्या निमित्ते का होईना दररोज एकत्र येऊन अल्लाची प्रार्थना करतात आणि विचारांचे निरोपाचे आदान प्रदान करून त्यांचा धर्म प्रसार मोठ्या प्रमाणात करतात ते तसे साधन संघशाखा अस्ताला गेल्याने हिंदू धर्माकडे उरलेले नाही हे सांगतांना वाईट वाटते, नजीकच्या काळात संघशाखा पुन्हा पूर्वीच्या जोमाने सुरु होतील असे अजिबात वाटत नाही, तसे दिसत नाही…
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी