होय ! फडणवीसांनी बुडविला महाराष्ट्र माझा ४ : पत्रकार हेमंत जोशी
अलीकडे मुंबई भाजपा मधल्या एका अतिशय ज्येष्ठ वयस्क प्रतिष्ठित आणि भाजपाकडून अन्याय पीडित नेत्याचा मला फोन आला. त्यांचे दोन सार्वजनिक स्वरूपाचे प्रश्न त्यांनी वारंवार पाठपुरावा करून देखील सुटलेले नाहीत नव्हते, त्यांनी आधी माझ्याकडे खंत व्यक्त केली नंतर म्हणाले दोन्ही प्रश्न आचारसंहिता लागण्यापूर्वी मला सोडवायचे आहेत, ज्यांनी आणीबाणी काळात तुरुंगवास भोगला त्यांच्या मानधनाचा एक प्रश्न होता आणि दुसरा प्रश्न संघ भाजपा भूमिकेतून येथे मुंबईत उभ्या असलेल्या शाळेच्या मैदानविषयीचा होता, त्यांनी सतत वारंवार पाठ पुरावा करून देखील हे दोन्ही प्रश्न अद्याप सुटलेले नसल्याने ते अस्वस्थ होते, शेवटी त्यांनी मला सांगितले, मी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक भाजपचे कार्यकर्ते आणि लातूर विधानसभेचे संभाव्य उमेदवार अभिमन्यू पवारांना फोन करून सांगितले कि कृपया त्यांनी या विषयी मुख्यमंत्र्यांच्या कानावर नेमकी माहिती घालावी व तातडीने त्यांचे प्रश्न सोडवावेत, ते वयस्क भाजपा नेते आणि अभिमन्यू दोघात बोलणेही करून दिले, बघूया पुढे काय घडते ते…
येथे हे यासाठी सांगितले आहे कि कोणत्याही राजकीय पक्षातले तरुण नेते जर त्यांच्या पक्षातल्या बुजुर्ग अनुभवी वयस्क नेत्यांकडे कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून म्हणजे ज्यांनी त्यांच्या पक्षासाठी मोठे योगदान दिले आहे, आयुष्य खर्ची घातले आहे त्यांना लाथाडून बाजूला सारून आपली स्वतःची वेगळी नवी कार्यकर्त्यांची नेत्यांची फळी उभी करून मोकळे होत असतील आणि त्याबळावर मोठे होण्याचा प्रयत्न करीत असतील तर हे कायम लक्षात ठेवावे कि असे ओव्हर स्मार्ट नेते ज्या वेगाने पुढे जातात त्यापेक्षा दुप्पट वेगाने खाली येतात, अशांचे मोठे राजकीय नुकसान होते. त्यावर श्रीमान अजितदादा पवार हे उत्तम उदाहरण आहे. बघा, अजित आणि सुप्रिया यातला मोठा फरक म्हणजे सुप्रिया सुळे पवार राजकारणात उतरल्यानंतर त्यांनी नक्की स्वतःची फळी उभी केली,विशेषतः राष्ट्रवादी मध्ये अलीकडच्या काही वर्षात ज्या बहुसंख्य तरुणी शहर आणि ग्रामीण भागातून कार्यरत झाल्या आणि राजकारणात आल्या त्यामागे उभे राज्य पालथे दिनरात पालथे घालून विविध मेळाव्याच्या माध्यमातून तरुण वर्गाला आकर्षित करणाऱ्या सुप्रिया सुळे पवार केवळ यांनाच त्याचे श्रेय जाते…
पण अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे तरुण पिढीतल्या विशेषतः महिला कार्यकर्त्यांची फळी उभी करीत असतांना सुप्रिया यांनी त्यांच्या पक्षातल्या बुजुर्ग अनुभवी नेत्यांकडे विशेषतः महिला नेत्यांकडे कधीही दुर्लक्ष केले नाही, त्यांना अपमानित केले नाही याउलट मी तर तुमची मुलगी, या पद्धतीने त्यांनी वास्तवात काहीशा उर्मट असूनही पक्षातल्या या वयस्क सिनियर नेत्यांना मानसन्मान दिला, त्यांचे बोलणे कायम सिनियर मंडळींशी अतिशय अदबीने असते त्यामुळे भलेही निवेदिता माने मंदा म्हात्रे यांच्यासारख्या काही महिलांनी प्रसंगी किंवा अन्य बुजुर्ग पुरुष नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पक्षांतर केले असेल पण आजही जर दत्ता मेघे, गिरीश गांधी इत्यादींच्या समोर सुप्रिया गेल्या तर सर्वांना आपली लेक भेटल्याचा आनंद होतो, हि वस्तुस्थिती आहे…
नेमके हेच अजितदादांना अजिबात जमले नाही त्यामुळे ते जेव्हा सत्तेत होते महत्वाच्या खात्यांचे प्रभावी आणि प्रचंड दबदबा असलेले मंत्री होते केवळ त्याचकाळात त्यांच्या भोवताली सभोवताली कार्यकर्त्यांची आणि अतिशय हिशोबी दलालरूपी नेत्यांची मोठी फौज उभी झाली पण हे जमलेले त्यांच्या जिवाभावाचे अजिबात नव्हते तर ते मतलबी स्वार्थी पैशांना सत्तेला हपापलेले बेरकी राजकारणी होते जे अजितदादांच्या अजिबात लक्षात आले नाही, एक मराठ्यांचे नेतृत्व करणारा नेता तर असा काही त्यांच्या किंवा आर आर पाटलांच्या सभोवताली वेटोळे करून बसायचा कि बघणार्याला असे वाटायचे कि अखेरच्या श्वासापर्यंत हे टोपी बदलू महाशय अजित पवार आर आर पाटील किंवा राष्ट्रवादी पक्षाला सोडून जाणार नाहीत पण हेच महाशय सर्वात आधी अजितदादांना सोडून गेले आणि पुढल्या सत्ताधाऱ्यांकडून त्यांचे आता नको नको ते फायदे घेणे सुरु आहे. दादांच्या हातून सत्ता जाताच हे असे अप्पलपोटे सारे दूर पळाले, उद्या सत्ता येतेय असे दिसले रे दिसले कि ते पुन्हा अजितदादांनी येऊन घट्ट बिलगतील, कवटाळत पुन्हा म्हणतील, दादा तुम्हीच आमचे नेते. नेमके सुप्रिया यांना जे जमले ते अजितदादांना जमले नाही, शरद पवारांच्या पाठीशी वर्षानुवर्षे उभ्या असलेल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना अजिबात स्थान नव्हते, ते अजितदादांच्या समोर बुजुर्ग असून देखील जायला उभे राहायला देखील घाबरायचे, हा माणूस सर्वांदेखत आपला कसा केवढा आणि केव्हा अपमान करेल, याची या शरदरावांच्या लाडक्या कार्यकर्त्यांना त्यांच्या मुशीत तयार झालेल्या नेत्यांना कायम भीती वाटायची, त्यामुळे सत्ता गेल्यानंतर अजितदादांच्या आधीचे महत्व मोठ्या गतीने कमी झाले आणि सुप्रिया यांचे महत्व कायम टिकले…सत्तेत आपले महत्व कायम टिकायचे असेल महत्व नेता म्हणून सतत राखायचे असेल तर नेत्याने शरद पवारांची पॉलिसी ऍडॉप्ट करणे गरजेचे असते म्हणजे नवी फळी उभी करतांना बुजुर्ग मंडळींना अजिबात विसरायचे नसते, दुर्लक्षित करायचे नसते…
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी