मीडिया ची आयडिया : पत्रकार हेमंत जोशी
वाटल्यास तुम्ही म्हणू शकता कि कावळा बसायची आणि फांदी तुटायची एकच वेळ झाली, झाले असे मी आयबीएन लोकमत च्या उमेश कुमावतांवर लिहिले व त्यांना राजीनामा देण्यास सांगितले. होय, कुमावत एका हिंदी वाहिनीवर आपल्या पूर्वीच्याच जागेवर रुजू होताहेत म्हणजे यापुढे पुन्हा त्यांना बातम्या मुलाखती कव्हर करण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे. आयबीएन लोकमत मध्ये कुमावत यांनी जेथे ज्या जागेवर काहीच महिने काम केले तेथे त्याआधी डॉ. उदय निरगुडकर होते यांनाही तेथे राजीनामा देऊन बाहेर पडावे लागले होते. काही महिने निरगुडकरांनी घरी बसणे पसंत केले आत ते देखील एका मराठी वाहिनी मध्ये रुजू होताहेत. या दोन्ही प्रसंगांवर आता थोडेसे विस्ताराने…
मला आठवते कळायला लागल्यापासून राजेंद्र व विजय दर्डा राम लक्ष्मणासारखे सतत त्यांच्या बापाबरोबर म्हणजे दिवंगत जवाहरलाल दर्डा यांच्यासंगे लोकमत या त्यांच्या वृत्तपत्रात व राजकारणात वावरायचे त्यामुळे त्यांना या राज्यातले या देशाचे राजकारण व मीडिया क्षेत्र तंतोतंत माहित आहे त्यातले खाचखळगे ठाऊक आहेत. पैसे मिळविण्यात वस्ताद मानल्या जाणारे हे दर्डा बंधू पण अगदी अलीकडे विजय दर्डा यांच्याकडे लोकसभा निवडणुकीनिमित्ते एक दिग्गज करप्ट नेते चक्क एक कोटी रुपये घेऊन आलेले असता याच विजय दर्डा यांनी ती रक्कम सन्मानाने नाकारली. उद्या पैसे देऊ पाहणारा नेता तिकडे दिल्लीत मंत्री होवो अथवा पंतप्रधान ते अधिक फायद्याचे असल्याने विजय यांनी मोठ्या मनाने एवढी मोठी रक्कम नाकारली असावी. थोडक्यात मीडिया मध्ये कुठे काय करावे हे नेमके पाठ असलेल्या याच विजय दर्डा यांचे मत जर आयबीएन लोकमत मध्ये विचारात घेतले असते तर डॉ. निरगुडकर यांच्या जागी त्यांच्या नंतर थेट सामान्य कुवतीच्या कुमावत यांना कधीही संधी दिल्या गेली नसती. जसे दोन कलाकार आपापल्या अभिनयात नक्की तरबेज असतात पण अमिताभ बच्चन ऐवजी लक्ष्मीकांत बेर्डेला घेतल्या जात नाही किंवा एखाद्या सिनेमातून आलिया भटला डच्चू देऊन तेथे शुभांगी गोखलेला संधी मिळत नसते पण आयबीएन लोकमत वाहिनीवर विविध पदे भरणारे रिलायन्सचे नेमके हिंदी भाषिक त्यांना उदय निरगुडकर आणि उमेश कुमावत दोघांमधला फरक माहित नसल्याने तेथे एकाचवेळी तिघांचे नुकसान झाले म्हणजे त्या वाहिनीचे, डॉ. उदय निरगुडकरांचे आणि उमेश कुमावत यांचे देखील…
जेव्हा केव्हा अमुक एखाद्याला वाहिनी प्रमुख म्हणून नेमल्या जाते तेव्हा त्याचे नेमके ज्ञान वाचन कसे आणि किती दर्जेदार विशेषतः नेमल्या गेलेली व्यक्ती भाषाप्रभू आहे किंवा नाही हेही तपासणे गरजेचे असते, आवश्यक ठरते पण बहुतेक मराठी वाहिन्यांवर ते न तपासता अतिशय सामान्य मंडळींना महत्वाच्या जागेवर नेमल्या गेल्याचे अनेकदा आढळून आलेले आहे, वृत्तपत्रांचे देखील तेच होते म्हणजे सारे योग्य व्यवस्थित जुळून आलेले असतांनाही नारायण राणे यांना त्यांनी सुरु केलेले प्रहार हे दैनिक पुढे नेता आले नाही कारण एकतर त्यांना चांगले संपादक मिळाले नाहीत आणि जेव्हा चांगले संपादक मिळाले तेव्हा ते त्यांना तेव्हा टिकविता आले नाहीत…
www.vikrantjoshi.com
दोन उदाहरणे देतो. एका मोठ्या उद्योगपतींची मुलगी चुकून मध्यमवर्गीय तरुणाच्या प्रेमात पडून विवाहबद्ध झाली पण ते लग्न टिकणारे नव्हतेच, कारण मिक्समॅचिंग व्यवस्थित नव्हते, त्यांचा पुढे घटस्फोट झाला. आणखी एक उदाहरण देतो, माझ्या एका ओळखीच्या तरुणाचे अतिशय दर्जेदार सुंदर बुद्धिमान तरुणीशी लग्न झाले होते, हा तरुण व्यसनी होता, लग्न टिकले नाही, त्या तरुणीने घटस्फोट घेतला. पुढे काही वर्षांनी त्याने पुन्हा लग्न केले पण दुसरी बायको पहिलीपेक्षा अगदीच वेगळी होती, म्हणजे पहिली थेट कतरिना होती तर दुसरी विशाखा सुभेदार पेक्षा अधिक जाड आणि कावळ्यापेक्षाही काळीकुळकुळीत होती. कुठेही साम्य नव्हते. हि दोन्ही उदाहरणे येथे तंतोतंत लागू पडतात, शांतपणे विचार करा तुमच्या ते अगदी सहज लक्षात येईल…
अपूर्ण :
पत्रकार हेमंत जोशी