आमचे मित्र पत्रकार पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी केलेले लिखाण येथे देत आहे, अवश्य वाचावे नंतर त्याखाली असलेल्या माझ्या लिखाणाकडे आपण वळावे… link is
http://vikrantjoshi.com/2020/11/blog-post_7.html
घोळात घोळ वरून गोंधळ : पत्रकार हेमंत जोशी
राज्यपाल कोषारी भलेही तेल लावलेला पहेलवान नसेल पण कसलेला गडी तर नक्की आहे कारण महाआघाडीच्या नाकात त्याने दम आणलेला आहे अन्यथा राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी जाहीर झाल्यानंतरच एरवी सर्वसामान्यांना कळते. यापुढे येणाऱ्या प्रत्येक राज्यपालांनी असा वचक किंवा अशी जरब निर्माण केली तरच भामट्या नेत्यांशिवाय इतर क्षेत्रात वेगळी कामगिरी केलेल्यांना संधी मिळेल अन्यथा मागचे पाढे पुढे पद्धतीचे घाणेरडे राजकारण असेच कंटिन्यू असेल. राज्यपालांकडे महाआघाडीने पाठविलेल्या यादीत शिवसेनेचे व राष्ट्रवादीचे करावे तेवढे कौतुक कमी ठरावे कारण शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही अत्यंत अक्कल हुशारीने त्यांच्या कोट्यातली नावे पाठवली आहेत मात्र राज्यातल्या काँग्रेसची अवस्था सध्या अनौरस पोरासारखी म्हणजे माय बापाचे छत्र नसलेल्या अनाथ मुलासारखी असल्याने त्यांना जसे सुचले जसे जमले जसे सुचविल्या गेले जसे वरून सांगितल्या गेले तशी नावे पाठवून ते मोकळे झाले. पुन्हा तेच घडले म्हणजे यावेळी देखील काँग्रेसने मुजफ्फर हुसेन या कायम थेट निवडणुकीत पराभूत होणाऱ्या वादग्रस्त आणि पराभूत झाल्यानंतर नेहमी विधान परिषदेवर जाणाऱ्या मुसलमानाला संधी देऊन काँग्रेसने नेहमीप्रमाणे यावेळी देखील लोकांच्या मतदारांच्या नाराजीचा सूर स्वतःकडे ओढवून घेतला, नसीम खान ऐवजी मुजफ्फर हुसेन म्हणजे दगडा पेक्षा वीट मऊ असे फारतर त्याच्याबाबतीत म्हणता येईल…
यावेळी यावर्षी नक्की ठरेल नक्की जमेल असे काही उपवर मुलामुलींच्या बाबतीत आपण अनेकदा बघतो पण होते काय बघण्याचा म्हणजे कांदे पोह्याचा कार्यक्रम दणक्यात होतो मात्र दुसरे दिवशी नकार येतो, मुलींचा विटाळ जातो मुलांवर शक्तिवर्धक गोळ्या घेण्याची वेळ येते तरी अनेकांचे ठरता ठरत नाही, राजकारणात विधान सभा किंवा विधान परिषदेवर जाण्यासाठी उतावीळ असणाऱ्या अनेक इच्छुक व उत्सुक नेत्यांचे हे असेच होत असते जे अनेक वर्षांपासून सचिन सावंत किंवा रजनी पाटील यांचे बाबतीत घडत होते, एकदाचे या दोघांचेही गंगेत घोडे न्हाले म्हणायचे, त्यात सचिन सावंत यांचा आता विधान परिषदेत जाण्याने त्यांच्या पक्षाला अधिक उपयोग करून घेता येईल ते परिषद गाजवून सोडतील पण रजनी पाटील या दिल्लीवरून लादल्या गेलेल्या वयस्क महिला नेत्याचा काँग्रेसला फारसा उपयोग होईल असे नक्की नाही त्यांच्या ऐवजी गणेश पाटील यांच्यासारख्या अभ्यासू आक्रमक कष्टाळू नेत्याला पक्षाने संधी दिली असती तर अधिक चांगले निकाल भविष्यात नक्की बघायला मिळाले असते, आमदारकी मिळाल्यानंतर रजनी पाटील यांच्याबाबतीत फारतर असून अडचण नसून खोळंबा असे काहीसे चित्र पाहायला मिळेल शरद पवार यांनी मात्र एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी या दोन पंचतारांकित नेत्यांना संधी देऊन एकप्रकारे राज्यात भाजपाला मोठी डोकेदुखी किंवा खुले आव्हान निश्चित निर्माण केलेले आहे. काँग्रेसने यापुढे राज्यात मुसलमानांचे अधिक लांगुलचालन न केल्यास त्याचा मोठा फायदा त्यांना हिंदू मतदारांकडून होऊ शकतो अन्यथा कालपर्यंत ज्या अशोक चव्हाण यांनी अब्दुल सत्तार नावाच्या मुसलमान नेत्याला घडविले वाढविले सत्तेत आणले मंत्री केले आमदार केले श्रीमंतही केले तेच अब्दुल सत्तर अलीकडे जेव्हा शिवसेनेच्या व उद्धवजींच्या बाजूने बोलतांना उपकारकर्त्या अशोक चव्हाण यांच्यावरच नको तेवढे घसरले थोडक्यात मोठे करूनही अशा वृत्तीचे नेते प्रसंगी याच काँग्रेसला पाठ दाखवून काँग्रेसचे नुकसान घडवून आणू शकतात. मुजफ्फर हुसेन हे तसेही अगदी मुस्लिमांमध्ये देखील फारसे लोकप्रिय लोकमान्य नेते नाहीत त्यापेक्षा नसीम खान मुस्लिम मतदार आकर्षित करण्याच्या दृष्टीने हुसेन तुलनेत अधिक उजवा होता, नसीम खान यांच्या हा घाव चांगलाच वर्मी लागल्याची माझी माहिती आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी