भ्रष्टाचार मुक्त राष्ट्र राज्य हेच स्वप्न : पत्रकार हेमंत जोशी
सगळ्या लढाया जिंकता येतील पण सर्वप्रथम भ्रष्टाचार विरोधी लढाई जिंकता यायला हवी आणि हे तुम्हाला मी सांगतो आहे ज्याने स्वतःच भ्रष्टाचार करण्या साथ दिलेली आहे. पण जसे दारुड्या बापाला वाटते कि माझ्या पोराने दारूला स्पर्श देखील करता कामा नये किंवा धंदा घेणाऱ्या स्त्रीला हेच वाटत राहते कि तिच्या मुलीने पतिव्रता निघावे तसे या देशातल्या या राज्यातल्या प्रत्येक भ्रष्ट मंदाचे झाले आहे त्या त्या प्रत्येकाच्या तोंडून कायम सतत दररोज हेच निघते कि हे राज्य भ्रष्टाचार मुक्त झाले तरच या राज्याचे या देशाचे काही खरे आहे. समोर श्रीखंड येईपर्यंत आपण गोड न खाणे ठरविलेले असते किंवा छाती उघडी करून एखादी समोर आली कि पुरुषांचे ब्रम्हचर्य किंवा एकपत्नीव्रत सारे संपलेले असते तसे पैसे खाण्याचे आहे, आपले ज्ञानाचे डोस पाजणे तोपर्यंत सुरु असते जोपर्यंत समोर पैशांचे ताट येत नाही, एकदा का ते आले कि त्याक्षणी आपल्यासारखा काळ्या पैशांवर तुटून पडणारा कोणीही नसतो…
जसे नरेंद्र मोदी मोठे मताधिक्य घेऊन देशाचे पंतप्रधान झाले तसे जर येत्या विधानसभेला देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत घडले तर निदान मी तरी त्यांना सांगणार आहे, त्यांच्याकडे आग्रह धरणार आहे कि भ्रष्टाचारमूक्त राज्य नक्की शक्य नाही पण तुमच्या मंत्रिमंडळात पैसे खाण्याच्या बाबतीत अगदीच रस्त्यावरच्या वेश्यांसारखे सदस्य घेऊ नका, दलालांना बऱ्यापैकी वेसण घाला आणि शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना खतरनाक मुख्यमंत्री किती भयंकर असतो, हे दाखवून द्या. जसे एखादा भित्रा पण चावट शिक्षक शाळेतल्या सेक्सी शिक्षिकेच्या वक्षस्थळांकडे तिच्या नकळत नजर टाकतोच किंवा प्रत्येक घरातला पुरुष बायकोचे लक्ष नसतांना शेजारणीला लाडाने हाय हॅलो करून येतोच किंवा बायको अंघोळीला गेली कि तरुण मोलकरणीची आस्थने चौकशी करून काही लागले तर केव्हाही आठवण कर, म्हणतोच तसे या राज्यात भ्रष्टाचाराच्या बाबतीत घडले तर अजिबात काळजी करण्याचे कारण नाही जसे कायम लेडीज बार मध्ये जाण्याची सवय लागलेला पुरुष कधीकधी घरातून बाहेर पडतांना अधिक पैशांसाठी हट्ट करून बसलेल्या बायकोच्याही ब्लाउजमध्ये पैसे कोंबून पळ काढतो तसे या राज्यातल्या भ्रष्टाचाराचे होणार आहे म्हणजे भ्रष्टाचारविरहित राज्य राष्ट्र हे स्वप्न सत्यात प्रत्यक्षात उतरणे अशक्य पण जे सध्या सतत घडते त्याचे प्रमाण तरी कमी होणे अत्यावश्यक आहे…
www.vikrantjoshi.com
मध्यंतरी सुधीर मुनगंटीवार यांच्या संदर्भात अर्थ विभागात प्रदीर्घ काम केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याशी जेव्हा मी बोलत होतो तेव्हा ते देखील हेच म्हणाले कि संघाचे विचार संघस्थानापुरते मर्यादित असता कामा नयेत ते प्रत्यक्षात देखील उतरायला हवेत, हे कप्तान म्हणून फडणवीसांना घडावे असे वाटते पण ते स्वतः देखील हि लढाई निदान यावेळी तरी जिंकू शकले नाहीत पण जेव्हा केव्हा स्वतः मोदी भ्रष्टाचारविरोधी लढाईला सुरुवात करतील, हे राज्य भ्रष्टाचारमुक्त करणे निदान देवेंद्र फडणवीस यांना सहज शक्य होईल, फडणवीस प्रसंगी अतिशय कठोर आहेत आणि एक दिवस ते नक्की या लढ्यात बऱ्यापैकी उतरतील असे सतत वाटत राहते. पुढले मंत्रिमंडळ स्थापन करतांना निदान भाजपमधून तरी फडणवीस चांगल्या विचारांचे मंत्री राज्यमंत्री निवडण्याचा प्रयत्न नक्की करतील असे वाटते आणि महत्वाच्या ठिकाणी पदांवर चांगल्याची आस असणाऱ्या मग ते शासकीय अधिकारी असोत अथवा प्रशासकीय, अधिकाऱ्यांची पोस्टिंग, शंभर टक्के देवेंद्र यांचा तो कटाक्ष असेल…
भ्रष्टाचार हाच भारताचा अंतस्थ किंवा नंबर एकचा शत्रू आहे तो पाकिस्थांपेक्षा अधिक आक्रमक खतरनाक महाभयंकर आहे. त्याचा विळखा ज्यांना मनापासून सोडवावासा वाटतो त्यातला प्रत्येक त्यातच अडकलेला असल्याने जसे एक वेश्या आपल्या पोरीला वेश्याव्यवसायात पडू नको सांगू शकत नाही तसे भ्रष्टाचाराचे झालेले आहे, जो तो त्यात अडकला आहे, जे त्यात अडकत नाहीत त्यांना अक्षरश: वाळीत टाकल्या जाते, खड्यासारखे बाजूला काढल्या जाते. वेतन कमी आणि आकर्षण अधिक त्यातून सरकारीबाबू किंवा अधिकारी भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणावर खतपाणी घालतात. मी जेव्हा पत्रकारितेत आलो तेव्हा या राज्यातले अगदी बोटावर मोजण्याएवढे प्रशासकीय अधिकारी थोडाफार हात मारायचे पण त्यांची आणि नेत्यांची जशी अधिक जवळीक निर्माण झाली ते देखील त्याचा एक भाग बनून गेले. एखादा तुकाराम मुंडे यांच्यासारखा या लढाईत उतरतो तेव्हा अशा अधिकाऱ्याला अगदी तोंडावर वेड्यात काढण्यात येते. भा. प्र. से. सदस्यांचे जे राजकीयीकरण झाले तेच मुळात धोक्याचे ठरले. अलीकडे तर असे एखादेच आनंद लिमये यांच्यासारखे प्रशासकीय अधिकारी असावेत कि जे वर्षानुवर्षे मलाईच्या पदावर जाण्याची इच्छा व्यक्त करतांना दिसत नाहीत, सारेच कसे कठीण होऊन बसलेले आहे. एड्स किंवा कँसर बारा होईल पण भ्रष्टाचाराचा महारोग दुरुस्त करणे परमेश्वर असेलच तर त्याकाळी ते या देशात शक्य नाही…
तूर्त एवढेच :
पत्रकार हेमंत जोशी