मनाने खचले सेना भाजपातले : पत्रकार हेमंत जोशी
फुकेत, बँकॉक ला कधी गेला आहेत का, गेला नसाल तर जाऊन या. जायची ऐपत हिम्मत नसेल तर विजय दर्डा यांनी अलीकडे त्यांच्या या आवडत्या देशात लोकमत दैनिकात असलेल्या काही प्रतिनिधींना पाठविले आहे पाठवले होते,त्यांच्याकडून माहिती घ्या. ते तुम्हाला तेथले नेमके सांगतील. फुकेत मध्ये असे असते कि एका हॉल मध्ये अनेक मुलींना भडक रंगरंगोटी करून बसविलेले असते त्यातली जी आवडली तिच्याकडे ग्राहकाने बोट दाखविले कि तडक उभी राहून ती ग्राहकाकडे येते. माझे काही आंबटशौकीन मित्रांचे म्हणणे असे कि त्यातली नेमकी कोणती निवडावी कळत नाही, गोंधळ होतो, हे असेच सध्या सेना आणि भाजपचे झालेले आहे म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्यातले प्रत्येक भागातले नेते त्यांच्याकडे यायला एका पायावर तयार आहेत गोंधळ यांचाच होतोय नेमके कोणाला पक्षात घ्यावे किंवा घेऊ नये…
अत्यंत महत्वाचे असे कि या दिवसात म्हणजे घाऊक प्रमाणावर सेना भाजपा मध्ये नेत्यांची आवक सुरु झाल्यावर सर्वसामान्य शिवसैनिक किंवा भाजपा कार्यकर्ते, संघाचे स्वयंसेवक जेवढे मनाने खचले आहेत त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने ज्या नेत्यांनी शिवसेना किंवा भाजपा उभी करण्यात या राज्यात त्या त्या पक्षासाठी आपले आयुष्य वेचले आहे, खर्ची घातले आहे, ज्यांचा मोठा त्याग आहे, ज्यांनी हे पक्ष या संघटना उभ्या करतांना आयुष्याची मोठी किंमत मोजलेली आहे ते अधिक खचले आहेत, डिस्टर्ब झाले आहेत, मनातून अस्वस्थ आहेत, त्यांच्या मनावरचे एकप्रकारे नियंत्रण चाललेले आहे आणि ते स्वाभाविक आहे. हे
म्हणजे असे झाले कि बायको जुनी वाटल्यावर झाल्यावर तिला अडगळीत सोडून बाहेरच्या उफाडीला घरातली गादी पलंग आणि शरीर सारे काही देण्यासारखे….
www.vikrantjoshi.com
तानाजी सावंत जसे शिवसेनेत आले लगेच विधान परिषद सदस्य तदनंतर लगेच मंत्री झाले हे असे शिवसेनेत भाजपामध्ये घडू लागल्याने हे पक्ष उभे केलेल्यांची अवस्था बाहेरची बाई घरात घेतल्यानंतर अस्वस्थ होणाऱ्या ओरिजनल बायकोसारखी झालेली आहे. अनेक येताहेत, आता काटोल मतदार संघाचे एकेकाळी आमदार म्हणून नेतृत्व करणारे माजी मंत्री अनिल देशमुख शिवसेनेत येताहेत म्हटल्यानंतर या मतदार संघात सेनेचे इच्छुक असलेले खळदकर किंवा हरणे यांच्यासारखे नेते मनातून खचणे, त्यांचे हताश निराश होणे स्वाभाविक आहे. पण ओरिजनल नेत्यांनी हे प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजे कि जेथे जेथे या राज्यात मतदारसंघात शिवसेना किंवा भाजपा कमकुवत होती, जेथे भाजपा किंवा सेनेचे उमेदवार आमदारकीला निवडून येणेच अशक्य होते केवळ याच मतदारसंघातून आलेल्या मोठ्या नेत्यांना भाजपा आणि सेनेने जवळ केले आहे, प्रवेश दिलेला आहे त्यावर मी अलीकडे बीडमधून जयदत्त क्षीरसागर यांना सेनेने आत घेऊन मंत्री का केले यांचे उदाहरण दिलेले आहे…
शिवसेनेत त्यांच्या ओरिजनल नेत्यांचा, शिवसैनिकांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आणि भाजपामध्ये फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या भाष्यावर त्यांच्या ओरिजनल नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा मोठा विश्वास आहे, आता त्या दोघांची हि जबाबदारी आहे कि त्यांनी या साऱ्या हतबल झालेल्या नैराश्याने ग्रासलेल्या ओरिजनल नेत्यांना बोलावून तुमचे आम्ही कवडीचीही नुकसान होऊ देणार नाही, तुम्हाला योग्य पदे मानसन्मान योग्य वेळी नक्की बहाल केल्या जातील हे विश्वासात घेऊन समजावून सांगणे अतिशय गरजेचे म्हणाल तर अति आवश्यक आहे कारण ओरिजनल नेत्यांमध्ये जर नैराश्येचे प्रमाण झपाट्याने वाढीस लागले तर त्याचे विपरीत परिणाम आधी पक्षावर होतील ज्याची कडू फळे प्रसंगी या दोघांनाच चाखावी लागतील. त्यागाने जगणाऱ्या ओरिजनल नेत्यांचे समुपदेशन करणे आज आवश्यक आहे हीच काळ्या दगडावरची रेघ आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी