महाजन द ग्रेट : पत्रकार हेमंत जोशी
जवळपास साऱ्यांचे फडणवीसांविषयीचे अंदाज चुकले. ज्या आशिष देशमुख पद्धतीच्या विरोधकांनी अस्वस्थ झालेल्यांनी फडणवीसांना बामन्या म्हणून डिवचले चिडवले हिणवले ते किंवा त्यांच्यासारखे पोटशूळ उठलेले विरोधक आज कुठे आहेत, कुठेही नाहीत, जवळपास त्या साऱ्यांचा केविलवाणा शरद पवार झाला आहे. दिवंगत प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे, नरेंद्र मोदी व अमित शाह तसेच शरद पवार या साऱ्यांचा अर्क म्हणजे आजचे देवेंद्र फडणवीस, याच फडणवीसांना अगदी आत्ता आत्ता पर्यंत स्वतःचा प्रभावी गट नसलेला या राज्याचा पहिलावहिला मुख्यमंत्री या पद्धतीने त्यांच्या विरोधातले सारेच बदनामी
करून मोकळे व्हायचे, ज्यांनी त्यांची या पद्धतीने बदनामी केली त्यांना गाढ झोपेतून तोंडावर पाणी मारून उठवून विचारले कि राज्यात प्रत्येक कानाकोपऱ्यात स्वतःचा प्रभावी गट असलेला नेता कोण, क्षणाचाही विचार न करता उत्तर असेल मुख्यमंत्री लोकमान्य लोकप्रिय लोकनेता देवेंद्र फडणवीस…
श्रीमान देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे स्ट्रॉंग पाठीराखे मंत्री गिरीश महाजन या पाच वर्षात एवढ्या झपाट्याने राजकीय समीकरणे बदलवून चर्चेचे कौतुकाचे व्यक्तिमत्व ठरतील असे पाच वर्षांपूर्वी ते जेव्हा सत्तेत आले तेव्हा अगदी त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना देखील तेही स्वप्नातही वाटले नव्हते. “बचपन में जिसको हम समजते थे पगली वो जवान होने पर निकली अनारकली” हे असे महाजन व फडणवीसांच्या बाबतीत घडले. एखाद्या सिनेमासारखे हे घडले ज्या दोघांना ज्याने त्याने सुरुवातीला अंडरएस्टिमेट केले ते भल्याभल्या नेत्यांचे राजकीय बाप निघाले. गेली ३०-३५ वर्षे मी आघाडीच्या नेत्यांना मंत्र्यांना एखादा दुसरा अपवाद सोडल्यास बहुतेक मुख्यमंत्र्यांना हे राज्य नागडे करून स्वतःची घरे भरतांना जेव्हा बघत होतो तेव्हा फक्त हाच विचार मनात यायचा कि एखादा अनिल कपूर त्या नायक सिनेमातल्या मुख्यमंत्र्यासारखा जन्माला यावा ज्याने या आजवरच्या हरामखोरांच्या ढुंगणावर आसूड ओढून सामान्य जनतेच्या डोळ्यांचे पारणे फेडावे आणि ते एकदाचे घडले…
www.vikrantjoshi.com
श्री गिरीश महाजन या राज्याचे वैद्यकीय शिक्षण, औषधे द्रव्ये तथा जलसंपदा खात्याचे मंत्री आहेत अशी त्यांची ओळख करून देणे म्हणजे वाघाचे डोळे घारे असतात हे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सांगण्यासारखे किंवा अमोल कोल्हे यांची संभाजी मालिका अतिशय उथळ आहे हे बाबासाहेब पुरंदरेना सांगण्यासारखे. चांगल्या कामांचे कौतुक व्हावे आणि चुकलेत तर शब्दातून आसूड ओढावेत हे आमचे ठरले असल्याने येथे महाजनांनी मंत्री म्हणून केलेली अजस्त्र सहस्त्र कामे तुमच्यासमोर यायलाच हवीत. मंत्री होणे हि फार कमी नेत्यांना चालून आलेली वास्तविक सुवर्णसंधी असते म्हणजे पत्रकार विवेक भावसार यांची सौ. सनी लिओनी यांनी ओठपप्पी घेतल्या सारखे ते घडलेले असते पण संधीचे सोने करणे दूर संधीची माती करण्यात जेव्हा अनेक मंत्री स्वतःची मती वापरतात, राग येतो, वाईटही वाटते. महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून या राज्यातल्या करोडो जनतेचे वाचविलेले आयुष्य, त्यावर मनापासून सांगतो, महाजन यांचे कौतुक करायला शब्द कमी पडतात…
देवेंद्र फडणवीस म्हणाले तेच खरे आहे, राज्याच्या दुर्गम दुष्काळी भागातला शेतकरी उत्पन्नाअभावी हतबल आहे, बिघडलेल्या आरोग्यावर मात कशी करावी मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला असे पण गिरीश महाजन त्या साऱ्यांसाठी देवासारखे धावून गेले सतत धावून जातात आणि महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून तर त्यांनी अनेकांना जीवनदान दिले, नवीन आयुष्य दिले. मी तर त्यापुढे जाऊन असे म्हणेन कि दस्तुरखुद्द फडणवीसांनी देखील उदारहस्ते या पंचवार्षिक योजनेत गरजू मंडळींना वैद्यकीय उपचार करून घेतांना जी आर्थिक विनाविलंब मदत सढळ हाताने आणि त्वरेने तडफेने केली, सारे अनाकलनीय, डोळ्यात अश्रू आणून या दोघांचे आभार मानावेत असे. फडणवीस म्हणतात, ‘ महाजन यांनी राज्यात सतत ठिकठिकाणी जी महाआरोग्य शिबिरे भरवलीत, महाशिबीर दृश्ये बघून महाजनांनी जमा केलेले हे महापुण्य हे दिलखुलासपणे सांगता येईल.’ वाचकहो, एखाद्या देखण्या तरुणीला जसे दिवसभरात अनेक तरुण आय लव्ह यु म्हणतात तसे जो तो आमदार, गिरीशभाऊ समोर आले रे आले कि म्हणतात, आमच्याही मतदार संघात महाआरोग्य शिबीर घ्या, महाआरोग्य शिबीर घ्या. जेथे जेथे महाशिबिरे घेतल्या गेली तेथे असलेल्या आमदारांची लोकमान्यता लोकप्रियता झपाट्याने वाढली, हे मात्र खरे आहे…
क्रमश: हेमंत जोशी.