Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

विकृतांची मदत : पत्रकार हेमंत जोशी

tdadmin by tdadmin
January 31, 2021
in Uncategorized
0
विकृतांची मदत : पत्रकार हेमंत जोशी

OFF THE RECORD on just one headline…

1. Mumbai Commissioner of Police to change-Times of India.

I don’t know from where does The Times of India gets this info, and how any news makes it to the front page? Yes, it is true that Sanjay Barve current CP is set to retire this month but as written by me time & again, CM till the last minute does not give information including to the ACS Home what he has in his mind. And yes, second clarification, the North Indian/Kayast/DG/ACS Home lobby’s candidate is Rashmi Shukla. The candidate was never Parambir Singh. Parambir should be happy with what he has got..But I’m sure Barve is too strong to fight against all these odds and CM might  grant him extension for sure; not only him but also to CS Ajoy Mehta too. CM will not disturb current set up till elections are over. Rest, everyone is a smart reader. Don’t believe in everything that appears in papers folks! Below in marathi, my father has written on how people are making a mockery of giving donations towards CM’s relief fund, clicking a selfie with CM and making a living out of this! Read on…


विकृतांची मदत : पत्रकार हेमंत जोशी 

मराठवाडा सोडून कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी म्हणजे एखाद्याला चार मुली, चार पैकी तिघींचे नवरे थेट साहेब मिळाले पण चौथीला चपराशी नवरा मिळाल्यासारखे, हे घडले आहे. जेथे जेथे विशेषतः अतिवृष्टीने अनेक असंख्य कुटुंब उध्वस्त झाली, तेथे लोकांनी नेत्यांनी सरकारने मदतीचा ओघ सुरु केला सुरु ठेवला आहे, पण आपले नेमके चुकते, आपण एखाद्याला केलेल्या मदतीचे या कानाचे त्या कानाला कळू न द्यायला हवे पण ते फार मोजक्या लोकांकडून घडते, केलेली मदत दिलेले सहकार्य याचे जाहीर भांडवल करण्याची अत्यंत वाईट सवय बहुतेकांमध्ये आहे. एकदा या विषयावरच मी दिवंगत भय्यू महाराजांना सुनावले होते, उठसुठ कसले हो किरकोळ मदतीचे फोटो टाकून भांडवल करून मोकळे होता तुम्ही ? जाऊ द्या गेलेत ते वर आणि तो अनिरुद्ध किंवा नाणिजचा नरेंद्र देखील बिळात लपून बसून असले उद्योग करताहेत, भामटे बुवा कुठले….

नेते, दान करणारे विविध फोटो वृत्तपत्रातून छापून आणताहेत. सोशल मीडियावर तर दरक्षणी हे मदत देणारे, फार मोठा दानधर्म केला, या अविर्भावात फोटो सेल्फी काढून मोकळे होताहेत, शोभते का हो या अशा निर्लज्जांन्ना? उद्या समजा तुमची देखणी मुलगी, पत्नी, बहीण पूरग्रस्त म्हणून एखाद्या स्त्रीलंपट करप्ट बदनाम नेत्याकडून मदत स्वीकारते आहे, असा फोटो जर छापून आला कींवा सोशल मीडियावर टाकण्यात आला तर कसे हो वाटेल त्यावेळी तुम्हाला? समजा..तुम्ही पूरग्रस्त आहात, आणि तुम्हाला सुरक्षित ठिकाणी हलवले आहे, लोकांनी तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातल्या मस्त मस्त दिसणाऱ्या बायकांना, पोरीबाळींना मदत म्हणून अन्न, वस्त्र दिले किंवा अन्य काही दिले आणि ते देतांनाचे फोटो काढून सोशल मीडियावर फिरवले, चालेल का, आवडेल का निर्लज्जांनो तुम्हाला ? जरा पुरात सापडलेल्या किंवा दुष्काळात होरपळलेल्या गावकऱ्यांचा कालपरवा पर्यंतचा इतिहास आठवा, त्यांच्या भूतकाळात शिरून बघा, अतिवृष्टीने घायाळ झालेला पश्चिम महाराष्ट्र असो कि दुष्काळाने होरपळलेला मराठवाडा असेल, अतिशय स्वाभिमानी किंवा त्यातले बहुसंख्य सुखवस्तू घरातले आहेत, होते, नैसर्गिक आपत्ती ओढवल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलेले आहे, त्यांना मदत करताहात त्याचे फोटो काढून कसले हो भांडवल करता आहेत तुम्ही थर्ड ग्रेड मंडळी ? देवाने तुमच्यावर देखील अशी आपत्ती आणायला हवी, मग कळेल, खाली मान घालून मदत स्वीकारणे मनाला कसे बोचत असते…

www.vikrantjoshi.com

ओढवलेल्या अचानक, उद्भवलेल्या अस्मानी संकटांमुळे हे स्वाभिमान शेतकरी गावकरी शहरवासी आपल्यावर पहिल्यांदा निर्भर झालेले आहेत, केलेल्या तुटपुंज्या मदतीचे सहकार्याचे विकृत मनोवृत्तीतून असे भांडवल करणे योग्य नाही, विविध पक्षाच्या बेशरम पुढाऱ्यांची तर आपापसात फोटो काढण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. केली मदत कि काढला फोटो नि टाकला सोशल मीडियावर. असंख्य नेत्यांना सोशल मीडियावर फोटोतून मिरवून आणण्याचे जणू घाणेरडे व्यसनच जडलेले आहे. काही ठिकाणी तर सरकारी निम सरकारी अधिकारी कर्मचारी देखील केलेल्या मदतीचे फोटो टाकण्यात आघाडीवर दिसले. कृपया आपल्या या स्वाभिमानी खानदानी भावंडांना अचानक उद्भवलेल्या अस्मानी गहिऱ्या परिस्थितीने झुकवले असले तरी तात्पुरते हतबल झालेल्या या जनतेला सोशल मीडियावरून फिरवून त्यांची क्रूर थट्टा करू नका, आयुष्यात एखाद्याला केलेल्या मदतीचे कृपया भांडवल करू नका. मदत करायची असेल तर मोठे मन ठेवून करा, कोत्या मानाने असे हलकट वागून आपल्याच बंधू भगिनींना खाली मान घालून मदत स्वीकारतानाचे फोटो प्लिज व्हायरल करू नका, ते अपमानित होतील असे वागू नका…


अत्यंत महत्वाचे म्हणजे घरातली अडगळ काढण्याची हि सुवर्णसंधी नव्हे म्हणजे जुने पुराणे काहीतरी नको असलेले दान करायचे, ग्रहणाच्या दिवशी दारावर येऊन ओरडून मागणाऱ्यांना देण्यासारखे हे असले विकृत मनोवृत्तीतून दान करून मोकळे होऊ नका. कमी द्या पण दर्जेदार द्या, विशेष म्हणजे जे प्रामाणिक सेवक आहेत त्यांच्या हाती, योग्य हाती वस्तू पैसे सोपवा अन्यथा गणपती उत्सवा दरम्यान वर्गण्या जमा करून मंडपाच्या मागे त्याच वर्गण्यांतून ऐश करणाऱ्या लोकांच्या हाती तुम्ही काहीही सोपवू नका, सावध राहा, उघडा डोळे करा सढळहस्ते 

मदत व सहकार्य…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Previous Post

महाजन महाविषेशांक ३ : पत्रकार हेमंत जोशी

Next Post

महाजन महाआरोग्याचे महामेरू : पत्रकार हेमंत जोशी

tdadmin

tdadmin

Next Post
महाजन महाआरोग्याचे महामेरू : पत्रकार हेमंत जोशी

महाजन महाआरोग्याचे महामेरू : पत्रकार हेमंत जोशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.