काका बेरक्या पुतण्या बारक्या : पत्रकार हेमंत जोशी
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उगाच बरळले बडबडले गडबडले बोलले कि चंद्रकांत पाटलांचे संतुलन बिघडले आहे. उद्या राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पद चालून आले तर शरद पवार अजितदादा यांना नव्हे तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील असे जे चंद्रकांत पाटील म्हणाले त्यात तथ्य आहे अर्थ आहे ते उगाच बडबडले नाहीत उलट त्यांचे संतुलन बिघडले आहे असे म्हणणार्यांचेच डोक्याचे संतुलन बिघडले कि काय इतपत शंका घेण्यास हरकत नाही आणि कारण देखील उघड आहे जे अजितदादा खाजगीत अलीकडे नेहमी सांगतात कि तीन दिवसांसाठीचे नाटक काकांनीच मला करायला सांगितले होते ज्यात मी विनाकारण बदनाम झालो आणि ज्या फडणवीसांनी मला अनेक प्रकरणात वाचविले त्यांनाच धोका दिल्याने मी आतून कमालीचा अस्वस्थ आहे वरून काका मात्र नामानिराळे झाले, सारे काही त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी केले ते त्यात अलगद बाजूला राहिले आणि बदनामी माझी कायमस्वरूपी झालेली आहे ज्याची मोठी किंमत यापुढे मला मोजावी लागणार आहे कारण दादा हे देखील धोका देण्याच्या बाबतीत काकांच्याच पावलावर पाऊल असे सारे माझ्याबाबतीत उघड उघड बोलायला लागले आहे, धोका देणे माझ्या स्वभावात नाही मात्र आता माझा पण काका झाला आहे…
राजकीय प्रवाहात असे अनेकदा अनेक नेत्यांच्या बाबतीत घडते ज्यावर तुम्हाला देखील अनेक उदाहरणे आठवत असतील, माहित असतील, म्हणजे अमुक एखाद्या प्रमुख नेत्याला आपल्याच पक्षातल्या तमुक नेत्याचे महत्व कमी करायचे असेल तर अशा नेत्याकडे वाळीत टाकल्यासरखे दुर्लक्ष केल्या जाते ते तसे अगदी जाणून बुजून अजित पवार यांच्या बाबतीत राष्ट्रवादी पक्षात गेल्या वर्षभरापासून घडते आहे म्हणजे अगदी उघड त्यांना बाजूला ठेवले जाते किंवा अमुक एखादा अजितदादांच्या गटतातला असे जर विशेषत: शरद पवार यांच्या लक्षात आले तर जसे अजितदादा यांना अप्रत्यक्ष दुर्लक्षित व अपमानित करण्यात येते ते तसे दादांच्या गटात वावरणाऱ्या दिसणाऱ्या नेत्याच्या प्रमुख कार्यकर्त्याच्या बाबतीत देखील घडते त्यामुळे या दिवाळीत दादांपेक्षा एकेकाळचे त्यांचे कट्टर समर्थक सुनील तटकरे आणि कुटुंबीय बारामतीला ऐन दिवाळीच्या दिवशी अजित दादांपेक्षा काका शरद पवार यांना अधिक बिलगून चिपकून चिटकून होते थोडक्यात अजितदादा यांना कसे एकटे पाडून त्यांना फारसे महत्व नाही हे दाखविण्यात अलीकडे मंत्रालय किंवा राष्ट्रवादी परिवारात काका गटाकडून मोठे प्राधान्य देण्यात येत आहे त्याऐवजी सुप्रिया सुळे यांच्या शब्दाला अधिक मान व किंमत हेही दाखविण्यात कसर सोडली जात नाही हि वस्तुस्थिती आहे त्यामुळेच अजित पवार अधिक अस्वस्थ अशांत अस्थिर आहेत, नेमके काय करावे कसे वागावे त्यांना सुचत नाही कारण दादा यांचा मामा करण्यातच यावेळी काका यांना अधिक रस आहे तीच त्यांची मोठी किंवा पहिली पसंती आहे जसे संशयी बायकोला जर नवऱ्याचे मोलकर्णीबरोबर शरीर संबंध आहेत कळले कि नवरा जसा अगदी मुद्दाम बायकोसमोर मोलकर्णीकडे दुर्लक्ष करतो किंवा मुद्दाम तिला हाडतूड करतो तेच अजितदादा यांचे झाले आहे, माझे भाजपाशी अजिबात सलोख्याचे संबंध नाहीत हे काकांना दाखवण्यासाठी म्हणे दादा उगाचच मुद्दाम अलीकडे भाजपाच्या नावाने आणि तेही साऱ्यांना ऐकू जावे म्हणून मुद्दाम मोठ्यांदा भाजपा किंवा त्यांच्या नेत्यांच्या किंवा फडणवीसांच्या नावाने कडाकडा बोटे मोडत असतात…
शरद पवार यांचे हे असे वागणे अनेकांना खटकते किंबहुना राजकीय विरोधकांना तर ते सिनेमातल्या खलनायकासारखे भासतात किंवा वाटतात पण मला असे वाटते कि ते असे वागतात म्हणून या वयातही सारे त्यांना टरकून दचकून घाबरून असतात, महत्वाचे म्हणजे पवारांच्या मनात अमुक एका राजकीय भूमिकेवर नेमके काय आहे हे जेथे सुप्रिया किंवा त्यांच्या पत्नीला देखील माहित नसते तेथे इतरांचा प्रश्नच उरत नाही म्हणून पवारांचा धाक आजही कायम आहे जे नेमके छगन भुजबळ किंवा समीर भुजबळ यांना जमले नाही, ज्या चार ते पाच मंडळींनी भुजबळ यांना अडचणीत आणले तुरुंगात धाडले नेता म्हणून कायमस्वरूपी बऱ्यापैकी महत्व संपविले त्या किरीट सोमय्या ललित टेकचंदानी अंजली दमानिया सुनील कर्वे सुनील नाईक अशा प्रमुख मंडळींचे भुजबळ आजतागायत बालही बाका करू शकलेले नाहीत म्हणजे ज्या मंडळींनी भुजबळ काका व पुतण्याला रस्त्यावर आणले आज भुजबळ सत्तेत असून किंवा स्वतःला ओबीसी नेता समजून देखील त्यांना अडचणीत आणणारे रुबाबात फिरताहेत आणि भुजबळ मात्र आयुष्याची मोठी किंमत मोजूनही चिडीचूप आहेत, येथेच भुजबळ यांचे महत्व संपले, थोडक्यात ते अगदी सामान्य विरोधकांना देखील घाबरले, पवारांनी त्यांना जवळ घेतले नसते तर त्यांची अवस्था यापेक्षा अधिक बिकट झाली असती पण भुजबळ काका पुतणे तुरुंगातून सुटून आले तरीही छगनरावांना पवारांनी मंत्री केले ते सारे श्रेय पवारांना जाते आणि भुजबळ त्यांच्यासमोर एकेकाळी अगदी क्षुल्लक वाटणार्या पण त्यांना तुरुंगात घडणाऱ्या वर उल्लेख केलेल्या मंडळींना घाबरले असा चुकीचा मेसेज त्यांच्या व समीरच्या बाबतीत राज्याच्या जनतेत गेल्याने जे आपला विरोधक संपवू शकत नाहीत ते लोकांचे कसले सरंक्षण करतील असे वाईट मत भुजबळ काका व पुतण्याविषयी झाले आहे. शरद पवार यांचे या वृद्ध वयातही असे नसते म्हणजे त्यांना जो नडला तो भविष्यात अडचणीत आलाच म्हणून समजा आणि नेता हा असाच खमक्या खलनायकी असायला हवा तरच तो अखेरच्या श्वासापर्यंत राजकारणात टिकून राहतो…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी