अळवणी कामांची उजळणी : पत्रकार हेमंत जोशी
सतत कायम सामान्य लोकांमध्ये वावर, पायाला भिंगरी लागल्यागत मतदारसंघात फिरायचे लोकांचे नेमके प्रश्न समजावून घ्यायचे शक्यतो तेथल्या तेथे सोडवायचे तेही उद्धट उर्मट भाषा न वापरता, विलेपार्ले विधानसभा हे नावापुरते प्रत्यक्षात त्यात अंधेरी आणि सांताक्रूझ चा परिसर देखील व्यापलेला, अफाट जनसंपर्क, पाच वर्षात तब्बल २८ हजार नागरिकांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात भेटी दिलेल्या, या सार्या नित्य कामांचा पराग अळवणी यांना मोठा फायदा झाल्याचे चित्र मतदार संघात बघायला मिळते आहे, अगदी विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांना देखील मनातल्या मनात हेच वाटत राहते कि पुन्हा अळवणी हेच आमदार व्हावेत तसे वातावरण तर आहेच, अळवणी विक्रमी मताधिक्याने निवडून येतील हे जो तो मतदार ज्याला त्याला सांगत सुटला आहे. जनसंपर्क अभियान सतत वर्षभर आराम न करता राबविणे हा मला वाटते पराग अळवणी यांनी जोपासलेला छंद आहे, त्यांना लोकात राहण्याचा नाद लागला आहे. मतदारांना अळवणी यांच्याशिवाय करमत नाही आणि अळवणी यांचे जनतेशी नाते म्हणजे माशाशी पाण्याचे नाते…
केलेल्या प्रत्येक कामाचा पुरावा लोकांसमोर मांडणे हे अळवणी यांचे नेहमीचे आवडते काम. त्यामुळे आपल्यासाठी नेमके या आमदाराने काय केले हे त्यांना पुरावे वाचल्यानंतर घरबसल्या कळत असते त्यामुळे केवळ निवडणुकीच्या तोंडावर धूळफेक करून अळवणी यांना त्यांचा उमेदवार म्हणून प्रचार आणि प्रसार करावा लागत नाही. केवळ औपचारिकता म्हणून ते या दिवसात लोकांना भेटतात आणि पुढल्यावेळी नेमके कोणते प्रश्न सोडवायचे आहेत त्याची तेवढी उजळणी करून ठेवतात. लोकांना मोलाच्या सूचना करायच्या, स्वतः कायद्याचे पदवीधर असल्याने सामान्य मतदारांना नेमके सल्ले द्यायचे त्यांना एक कुटुंब प्रमुख या नात्याने सढळ हस्तें मदत आणि सहकार्य तेही या कानाचे त्या कानाला कळू न देता करायचे, अळवणीचे आमदार म्हणून छान चालले आहे. पुन्हा निवडून येतील त्यासाठीं त्यांना त्यांची जन्म कुंडली दाखविण्याची गरज नाही, आवश्यकता नाही. सारे कसे नियोजनबध्द आणि काटेकोर म्हणजे मतदारसंघात त्यांनी उभे केलेले टीमवर्क, इतर अनेक नेते किंवा आमदार देखील मुद्दाम ते बघायला येतात, आळवणी यांच्या कार्यपद्धतीची नक्कल करून मोकळे होतात. अळवणी मोठ्या फ़रकाने निवडून येण्यासाठी आता जबाबदारी त्यांच्यावर अगदी मनापासून प्रेम करणार्या मतदारांची त्यांनी मतदान न चुकता करायलाच हवे…
पत्रकार हेमंत जोशी.