लाजिरवाणे जगणें : पत्रकार हेमंत जोशी
काँग्रेस ची अवस्था घनदाट जंगलात हरविलेल्या एकट्या स्त्रीसारखी झाली आहे, बाहेर पडावे तरी कसे अशा गोंधळलेल्या बावरलेल्या अवस्थेत राज्यातली काँग्रेस आहे, कोणीही यावे आणि टपली मारून जावे तसे कोणीही यावे आणि जिंकण्याची अजिबात शक्यता नसतांना देखील तिकीट उमेदवारी घेऊन मोकळे व्हावे ज्या काँग्रेस मध्ये एक काळ असा होता जेथे उमेदवारी मिळविण्यासाठी उड्या पडायच्या, आपापसात मारामाऱ्या व्हायच्या. सुशीलकुमार शिंदे जे म्हणाले आम्ही थकलो आहोत तेच नेमके सत्य आहे, अख्खी काँग्रेस थकली आहे, चार पावले चालू न शकणाऱ्या जक्खड म्हतारीसारखी काँग्रेस ची दयनीय शोचनीय केविलवाणी दीनवाणी अनवाणी अवस्था झाली आहे. अत्यंत धक्कादायक प्रकार सांगतो. आमचे पत्रकार मित्र युवराज मोहिते जमा केलेले पैसे खर्च करण्यासाठी गोरेगाव मधून काँग्रेस ची उमेदवारी घेऊन उभे आहेत अर्थात त्यामुळे विद्या ठाकूर या त्यांचा प्रचार फारसा सिरियसली म्हणे यासाठी घेत नाहीत कि मतदारच त्यांना सांगताहेत ताई, घरी जा आणि आराम करा कशाला तुम्ही स्वतः राजकारणातल्या लता मंगेशकर असतांना शाळेच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांसमोर गाणं म्हणताहात. त्याही पुढली गम्मत म्हणजे याच युवराज मोहिते यांनी प्रचार पोस्टरवर इंदिरा काँग्रेस च्या नेत्यांना फारसे स्थान न देता थेट दिवंगत मृणालताई गोरे यांचा भला मोठा फोटो टाकला आहे, वापरला आहे. मृणालताई जिवंत असत्या तर यासाठी धायमोकलून रडल्या अस्त्या कि ज्या भ्रष्ट काँग्रेस विरुद्ध लढण्यात मोर्चे काढण्यात त्यांनी अख्खी हयात घालविली त्या काँग्रेस चा प्रचार आज त्यांच्या नावाने होतो आहे अर्थात गोरेगावकर मतदार एवढे मूर्ख नाहीत कि जे मतदार मृणालताई यांच्या विचारांचे आहेत त्यांनी मृणालताईंना नफरत असलेल्या काँग्रेस ला मतदान करून यावे. काँग्रेस च्या पोस्टरवर थेट मृणाल गोरे यांचा फोटो, तो त्या फोटोचा, थेट दिवंगत ग्रेट मृणालताईंचा मोठा अपमान आहे, असे नेमके घडता कामा नये असे घडत राहिले तर उद्या राष्ट्रवादी मधून भाजपा मध्ये आलेले उमेदवार सुप्रिया सुळे यांचा फोटो पोस्टरवर लावून मोकळे होतील…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी