राजकारण गेलं चुलीत : पत्रकार हेमंत जोशी
विधान सभा निवडणूक पार पडल्यानंतर आज कितीतरी दिवसांनी मी नेहमीप्रमाणे राज्याच्या राजकीय घडामोडींवर लिहायला घेतले आहे. निदान मला तरी राजकारणात राज्यात पुढे काय घडणार आहे नेमके लक्षात येते कळते कारण गेली ३९ वर्षे सतत हे बघत आलोय त्याचा त्या अनुभवाचा फायदा होतो आणि नेमके कळते. मतदान पार पडले आणि दुसरे दिवशी माझा मूड गेला कारण तेच पुढे काय निकाल हाती येणार आहेत लक्षात आले होते पण यासाठी येथे लिहिण्याचे टाळले कि ज्या दोघांवर माझे अतिशय उघड थेट पूर्ण प्रेम आहे त्या माझ्या विदर्भाची आणि विदर्भ मराठवाड्याचे भले व्हावे असे ज्या देवेंद्र फडणवीसांना मनापासून वाटते त्या फडणवीसांची वाट लागणार असल्याचे माझ्या लक्षात आले नि अक्षरश: रडायला आले. जे फडणवीसांच्या बाबतीत घडणे निकाल येणे अपेक्षित होते ते घडणार नाही त्यामुळे मी प्रचंड अस्वस्थ झालो आणि राजकीय घडामोडींवर लिहिण्याचा मूड गेला…
तुमच्यांत लक्षात आले असेल कि मी राजकारणावर सोडून सेक्स किंवा इतर विषयांवर लिहिणे म्हणजे माधुरी दीक्षित ने अभिनय सोडून सुईणबाईचे काम पत्करण्यासारखे किंवा निखिल वागळे यांनी नाक्यावर वडापावची गाडी लावण्यासारखे किंवा अजित पवारांनी राजकारण सोडून फरसाण तळण्याचे काम सुरु करण्यासारखे पण जेथे काही राजकारणावर लिहावे असे वाटत
नव्हते तेथे उगाच डोके लावून बसण्यात अर्थ नव्हता. उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस तोपर्यँत मावळ विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीतून निवडून आलेले सुनील शेळके हे माझ्या सतत यासाठी संपर्कात होते कि त्यांना भाजपातर्फेच विधानसभा लढवायची होती. वास्तविक तेथे पराभूत झालेले माजी मंत्री बाळा भेगडे माझ्या जुन्या परिचयाचे, जवळचे मित्र देखील पण ते यावेळी मावळ मधून शंभर टक्के पराभूत होतील पण सुनील शेळके जर उभे राहिले तर मोठ्या फरकाने निवडून येतील माझी तशी पक्की माहिती होती खात्री होती पण खूप प्रयत्न करूनही सुनील शेळके यांना भाजपाने उमेदवारी दिली नाही, शेळके उठले आणि त्यांनी थेट अजित पवारांना गाठून अगदी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी घेतली, मोठ्या फरकाने बाळा भेगडे पराभूत झाले जवळपास नव्वद हजारांपेक्षा अधिक मते घेऊन शेळके निवडून आले….
सहकारी मंत्री आणि भाजपाचा हाडाचा कार्यकर्ता या नात्याने फडणवीसांचे बाळा भेगडे यांच्यावर असलेले प्रेम बघून मी एवढेच सांगितले कि पुढे मंत्री भेगडे यांनाच करा त्यासाठी त्यांना विधान परिषदेवर निवडून आणता येईल पण उमेदवारी मात्र शेळके यांनाच बहाल करा, असे एक ना अनेक किस्से मी तुम्हाला सांगणार आहे. वाईट फक्त यासाठी वाटते कि विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर प्रथमच विशेषतः विदर्भाचे आणि काहीशा दुर्लक्षीत मराठवाड्याचे पहिल्यांदा भले जर कोणी अतिशय
मनापासून मुख्यमंत्री म्हणून केले असेल तर ते एकमेव देवेंद्र फडणवीस आहेत पण पुन्हा एकदा त्यांचीच राजकीय दैन्यावस्था होणार असेल त्यासारखे आमचे दुसरे दुर्दैव नाही. सतत पंधरा वर्षे शरद पवार व त्यांच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आमदारांनी खासदारांनी आणि मंत्र्यांनी मराठवाड्याला विशेषतः विदर्भाला केवळ रखेलीच्या नजरेने बघितलेले आहे ते यापुढे देखील तेच करणार आहेत म्हणून वाईट वाटते. अन्यथा सत्तेत कोण, याची व्यक्तिगत मला ना कधी चिंता असते ना कधी काळजी असते ना कधी भीती असते ना कधी पर्वा असते. लेखणी सलामत तो सलाम पचास, भल्याभल्यांना झुकायला लावणारी देशभक्त पत्रकारांची लेखणी त्यामुळे ठोकायचे यांनाही असते आणि ठोकायचे त्यांनाही असते शब्दातून..
क्रमश: हेमंत जोशी.