काका चतुर पुतण्या आतुर : पत्रकार हेमंत जोशी
कालपर्यंत तुम्ही मला सतत मिठीत घेतले मुठीत ठेवले कुशीत घेतले कितीतरी कधी अगदी उघड तर कधी अंधारात पटापट मुके घेतले तर कधी भर चौकात झोंबले आणि कित्येक रात्री पलंगावर लोळवले, मला स्वप्ने दाखवलीत वचने दिलीत आश्वासने दिलीत गिफ्ट दिल्या कधी माझ्या मांडीवर डोके ठेवून आठवणीत रमलात तर कधी माझे डोके तुमच्या खांदयावर घेऊन मला तुम्ही प्रेमाने कुर्वाळलेत, मला वाटले आता माझे सारे आयुष्य सुखासमाधानाने तुमच्या सोबतीने जगणे पण कसचे काय ती माझ्यापेक्षा सरस आणि सेक्सी तरुणी तुमच्या आयुष्यात आली आणि लग्न करणे तर दूर पण मला आता तुम्ही जवळून गेली तरी ओळखेनासे झाला आहात, हे असे आठवण व्याकुळतेने सांगणाऱ्या प्रेयसीसारखे शरद पवारांनी त्या राज ठाकरे यांचे करून ठेवले आहे कारण विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या राजकीय आयुष्यात राज पेक्षा काहीशा अधिक प्रभावी उद्धव ठाकरे यांनी प्रवेश केला आहे. कालपर्यंत अतिशय जवळ असलेल्या सख्य्या पुतण्याला अजितदादा यांना त्यांनी राजकीय जगणे मुश्किल करून टाकले नंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतण्यावर देखील तीच वेळ त्यांनी आणली, यापुढे फारसे आश्चर्य वाटणार नाही जर याच शरद पवार यांनी श्रीकांत ठाकरे यांच्या पुतण्याला देखील राज आणि अजित यांच्या पंक्तीला आणून बसविले भलत्याच, तिसऱ्याच नेत्याच्या एखाद्या प्रभावी पुतण्याला जवळ घेतले तर…
www.vikrantjoshi.com
लोकसभा निवडणुकी दरम्यान राज ठाकरे यांच्या गर्दी होणाऱ्या भाषणांचा विशेषतः त्यांच्या लावा रे तो व्हिडीओ, या लोकप्रिय ठरलेल्या भाषणातल्या फितींचा आपल्या विरोधकांना नामोहरम करण्या पवारांनी नेमका उपयोग करवून घेतला हे त्यावेळी राजकीय जाणकारांच्या फारसे लक्षात आलेले नव्हते पुढे मात्र ते बिंग फुटले आणि शरद पवारांनी मग अगदी उघड राज ठाकरे यांच्यावर असलेले प्रेम साऱ्यांना सांगितले. पुढे विधानसभा निवडणूक आली, या निवडणुकीत राज ठाकरे लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक प्रभावी ठरतील, भाजपाचे फार मोठे नुकसान करणारे असतील हे चाणाक्ष दिल्लीकरांच्या लक्षात आले आणि पवार राहिले बाजूला ईडीच्या चौकशीला ज्यांच्या खांदयावर पवारांनी बंदूक ठेवली होती ते राज ठाकरे सामोरे गेले त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत काहीसे अस्वस्थ राज ठाकरे लावा रे तो व्हिडीओ एकदाही म्हणू शकले नाहीत आणि त्यांची भाषणे लोकसभा निवडणुकीच्या माननाने जरी प्रभावी ठरली नाहीत तरी त्यांच्या प्रचाराचा फार मोठा फायदा भाजपा सेनेचे उमेदवार पाडण्यात आणि राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणण्यात शरद पवारांना झाला…
मीडिया च्या बाबतीत एरवी अतिशय सावध जागरूक असलेले भाजपा नेते विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत गोंधळात मात्र काहीसे गाफील राहिले आणि प्रत्येक बातम्यांच्या वाहिनीवर इतर कोणत्याही म्हणजे ना फडणवीसांची ना मोदींची ना उद्धव ठाकरे यांची भाषणे सतत दररोज खूप वेळ दाखविल्या रिपीट केल्या गेलीत ना हॅमर केल्या गेली, सतत दरक्षणी प्रत्येक बातम्यांच्या वाहिनीवर विधानसभा निवडणूक प्रचार दरम्यान भाषणे दाखविल्या गेली हॅमर केल्या गेली ती फक्त आणि फक्त राज ठाकरे यांची, हे कसे आणि कोणी घडवून आणले त्याची नेमकी माहिती जर मोदी शाह यांनी घेली तर मोठे बिंग फुटेल आणि ज्या वाहिन्यांनी मोठ्या प्रमाणावर भाजपा विरोधकांकडून आर्थिक फायदा करवून घेतला त्यांना मोदी शहा यांच्याकडून वठणीवर आणणे सोपे जाईल. जाऊ द्या, याठिकाणी मला फक्त हेच सांगायचे आहे कि राजकारणात चालू प्रियकरासारखे नेते कायम आढळतात, कालपर्यंत जेथे राज यांचे मुके घेतले जायचे आज ती जागा उद्धव यांनी घेतलेली आहे, उद्या तेथे नक्की वेगळे कोणीतरी असेल, हे त्यांच्याबाबतीत इतिहास सांगतो. कालपययंत पवारांच्या संगतीने राज यांचा बोलबाला होता आता ती जागा उद्धव यांनी घेतली आहे. या दिवसात राज कोठेही नाहीत त्यांना अडगळीत जणू टाकल्या गेले आहे कारण आता त्यांना उद्धव महत्वाचे वाटू लागले आहेत जे उद्धव यांना अजिबात लक्षात आलेले नाही, त्यांनाही पुढे धोका आहे…आहे
तूर्त एवढेच : हेमंत जोशी