बदलती टगेगिरी : पत्रकार हेमंत जोशी
८० च्या दशकात मुंबईला अगदी बोटावर मोजण्याएवढ्या आमदारांकडे मोटार कार्स असायच्या, मंत्रालय इमारतीमध्ये पत्रकारांना दोन कार पार्किंग असायच्या तेथे मी आणि अनिल थत्ते तसेच नामदेव ढसाळ आमच्या कार्स पार्क करीत असू. ढसाळ आणि माझ्याकडे विदेशी महागड्या कार्स असायच्या माणसे अगदी उभे राहून त्याकडे बघायचे. ९० च्या दशकानंतर नेत्यांकडे आमदारांकडे ज्या वेगाने महागड्या कार्स आल्या, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. पण पूर्वीचे ते देशभक्ती नसानसात
भिनलेले आमदार अलीकडे अगदी अभावाने बघायला मिळतात. नागपुरात मला वाटते आता त्या आमदार निवासात जवळपास एकही आमदार हिवाळी अधिवेशनादरम्यान राहत नाही, त्यामुळे आमदार भेटतील आणि कामे होतील असे सामान्यांच्या बाबतीत घडत नाही, समाजसेवा आणि देशभक्तीलाही अलीकडे खूपच प्रोफेशनल स्वरूप प्राप्त झाल्याचे जागोजाग दिसते. यापुढे देशभक्ती समाजसेवा इत्यादी शब्द राज्यकर्त्यांच्या बाबतीत फक्त पुस्तकात वाचायला मिळतील, सामान्यांची मात्र मोठी लूट होतांना दिसते आहे…
मी नागपुरात हिवाळी अधिवेशनानिमित्ते आलो आहे, रॅडिसन ब्ल्यू हॉटेल मध्ये नेहमीप्रमाणे अनेक लोकप्रतिनिधी सरकारी अधिकारी दलाल उतरलेले दिसले पण यावेळी जे वेगळे दिसले ते याआधी कधीही दिसले नाही म्हणजे जेवढे नेते हॉटेल मध्ये उतरले आहेत त्यापेक्षा मोठ्या संख्यने त्यांचे अंगरक्षक हॉटेलच्या लॉबी मध्ये उभे असलेले दिसले. आपल्या राज्याची हि केवढी मोठी अधोगती, कि लोकप्रतिनिधींना अंगरक्षकांची गरज भासते आहे. याचा सरळ अर्थ असा कि मोठ्या प्रमाणावर काळा पैसा मिळविण्याची ईर्षा ठेवणारे आमदार म्हणून मोठ्या प्रमाणावर निवडून आलेले आहेत, यापुढेही त्यांना तेच करायचे आहे आणि जेव्हा काळे पैसे मिळवायचे असतात तेव्हाच अशा आमदार किंवा अन्य नेत्यांना टग्या अंगरक्षकांची गरज भासते. मला नाही वाटत कि सुधाकर परिचारक यांच्या सारख्या सुविचारी आमदारांना लोकप्रतिनिधींना अंगरक्षकांची गरज पडत असावी, कधीही नाही. अशावेळी मनापासून राग येतो तो या राज्यातल्या तमाम मतदारांचा कि त्यांनी अशा अनेक नालायक मंडळींना लोकप्रतिनिधी मंडळींना मतदान करून विजयी केले आहे…
शरद पवार यांच्या कुटुंबातली अस्वस्थता आता लपून राहिलेली नाही. वरकरणी जरी सारे शांत दिसत असले तरी अजित पवार यांचा अतिशय मूड पूर्णतः गेल्याचे त्यांच्या वागण्या बोलण्यातून जाणवते आहे असे त्यांच्या सभोवताली सतत वावरणारे सांगताहेत. याआधी असे नव्हते म्हणजे शरद पवार तिकडे दिल्लीत रमलेले असायचे व्यस्त असायचे आणि इकडे राज्यात फक्त अजित पवारांची सर्वदूर हवा असायची दादागिरी असायची, त्यांचा शब्द फायनल असायचा पण यावेळी तसे घडतांना दिसत नाही म्हणजे अजित पवार त्यांच्या कुटुंबात थेट चौथ्या पाचव्या क्रमांकावर फेकले गेलेले आहेत. शरद पवार जेथे तेथे राजकीय हस्तक्षेपात रमलेले दिसत असतांना त्यानंतर दस्तुरखुद्द सुप्रिया सुळे यादेखील दिल्ली सोडून कायमस्वरूपी मुंबई आणि राज्यात राजकीय हस्तक्षेप करण्या परतलेल्या दिसताहेत याचा सरळ अर्थ असा कि यापुढे जेव्हा केव्हा मुख्यमंत्री म्हणून पवार कुटुंबाला संधी मिळेल अजितदादा नव्हे सुप्रिया सुळे आघाडीवर असतील आणि त्यांच्या उजव्या बाजूने अजित पवार नव्हेंटर रोहित पवार उभे आहेत असेही दिसेल म्हणून नेमके सांगतोय कि पवार कुटुंबात अजितदादा चौथ्या पाचव्या क्रमांकावर फेकलेले दिसत असल्यानेभाजपा गोटातल्या आशा पुन्हा पल्लवित झाल्याचेही दिसते आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी