फुकाचे सल्ले : पत्रकार हेमंत जोशी
बायको करायची असेल तर वयाने मोठी करा म्हणजे ती रागावली तरी वाईट वाटत नाही. पावसात भिजण्याचा फायदा जसा मंदाकिनी झीनत अमान आणि शरद पवारांना झाला तसा तुम्हाला करून घ्यायचा असेल असेल तर नियमित पावसात भिजत चला. रस्त्याने फिरतांना एकतर नागडे फिरा किंवा नखापासून तर केसांपर्यंत अनिल थत्ते व्हा म्हणजे प्रत्येकाचे तुमच्याकडे लक्ष वेधल्या जाईल. अलीकडे जवळपास वर्ष झाले पाऊस सुरु आहे तेव्हा सर्दी पडसे होणार नाही याची काळजी घ्या कारण सर्दी पडसे झाले तर कोणीही तुमच्या नाकाचा शेम्बूड पुसायला येणार नाही आणि पाणी गाळून पित चला कारण शेजारी पाजारी मित्र नातेवाईक मैत्रिणी इत्यादी तुम्हाला काही दुःख झाले तर नक्की अश्रू पुसायला येतील पण जुलाब झाले तर त्यातला एकही किंवा बायको सुद्धा तुमचे ढुंगण पुसून देणार नाही. पुरुषांनो अविवाहित असाल तर लग्न करून घ्या किती दिवस सारीच कामे (स्वतःच्या ) हातांनी कराल. रात्री दारू ढोसायची त्यामुळे पोटे सुटलेली आहेत तसेच सकाळी देवपूजा करायची तेही पितांबर नेसून म्हणून सांगतो पीतांबराच्या आत देखील काहीतरी घालत चला नाहीतर ऐन आरती करतांना तुमचे पितांबर अचानक गळून पडते आणि शेजारच्या आरतीला आलेल्या काकूंना मागल्या पावली आरडाओरड करीत पळून जावे लागते. बँकॉक ला गेल्यानंतर नजर पारखी ठेवावी, माझ्या ओळखीचा सरकारी अधिकारी हॉटेलवर रात्र रंगीन करण्यासाठी कंपनी घेऊन आला रात्री फार उशिरा त्याच्या लक्षात आले कि ती ती नाही तो आहे, आश्चर्य म्हणजे तोपर्यंत तो त्या व्यक्तीशी कितीतरी वेळ अश्लील चाळे करीत बसला होता प्रचंड दारू ढोसून, बँकॉकवाल्याने मात्र पैसे आगाऊ घेतले होते याच्या हाती आरडाओरड पश्चाताप आदळआपट आकांडतांडव आणि हात जोडून, जा, हे सांगण्यापलीकडे काहीही उरले नव्हते. उगाच एखाद्या पार्लर बाहेर ताटकळत उभे राहू नका नंतर एखाद्या बाईच्या मागे लागू नका कारण तेथून बाहेर पडणारी कदाचित तुमची थोराड वयाची आत्या मावशी काकू असू शकते. शेवटचा सल्ला, ज्यांना पैसे चारायचे आहेत त्यांना थेट विचारा उगाच मध्यस्थ शोधत बसू नका, वेळ जातो आणि पैसेही विनाकारण ज्यादा मोजावे लागतात….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी