त्यांचा तो बलात्कार आमचा तो चमत्कार ..
या मथळ्याला तसा येथे फारसा अर्थ नाही उगाच तुमचे लक्ष वेधण्यासाठी केलेला हा आगाऊपणा !! काही गोष्टी आपण ठरवतो काही स्वप्ने पूर्ण होतात काही अपूर्ण राहतात. आमच्या बुलढाणा जिल्ह्यात पूर्वी एक नेते होते त्यांना अनेक नाद होते पुढे त्यांच्याच सवयी जडलेला त्यांचा मुलगाही नेता झाला हुबेहूब बापाच्या वळणावर गेला,नेत्याच्या या शौकीन मुलाला गावातली एक तरुणी मनापासून भावायची जिच्या आठवणीत तो अनेकदा अंथरुणातून आपले तारुण्य बाहेर काढायचा, पुढे त्याच्या मनासारखे घडले, ती तरुणी त्याच्याच घरात नांदायला आली पण त्याची सावत्र आई म्हणून, आता त्याच नेत्याच्या आसपासच्या परिसरातला नेता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहे, पुन्हा एक अवदसा म्हणजे काँग्रेसने उगाचच बऱ्यापैकी धावपळ करून हल्लाबोल करणाऱ्या नाना पटोले यांना केवळ संशयावरून हटविले, नानांचे फडणवीसांशी मैत्रीचे सहकार्याचे घट्ट नाते आहे असा आरोप कम निरोप नागपुरातल्याच काही आगाऊ नेत्यांनी उथळ राहुलजींकडे पाठविला आणि नाना हटविल्या गेले, नितीन राऊत तर खाजगीत नानांना थेट नाना फडणवीस असा म्हणे उल्लेख करायचे, आमच्या एका दिवंगत पत्रकार मित्राची पत्नी देखणी होती, जो तो निमित्त काढून त्याच्या घरी जायचा युक्तीने त्याची बायको बघायला पण याला मस्ती होती त्याने तिला घटस्फोट दिला, दुसरे लग्न करताना हा बदनाम झाल्याने त्याला बायको मिळत नव्हती शेवटी त्याने हुबेहूब जुनी नटी टुणटुण सारख्या हुबेहूब दिसणाऱ्या मुलीशी लग्न केले, ती एवढी अगडबंब कि ती अनेकदा त्याला कडेवर घेऊन बाजारहाट करायची, घरात त्याला लहान बाळासारखी अंगाखांद्यावर खेळवायची, राज्यातल्या काँग्रेसचे नेमके मित्रासारखे झाले, रुबाबदार नाना काढले आणि बुलढाण्या पलीकडे फारसे न दिसणारे हर्षवर्धन सपकाळ नावाचे कच्चे लिंबू प्रदशाध्यक्ष झाले केले….
प्रत्येकाचा यशाचा एक काळ असतो, जो यशाच्या शिखरावर असतांना निवृत्ती घेतो त्याला अमरत्व मिळते, देवानंद थांबला नाही शेवटी शेवटी त्याच्या घरातले देखील त्याचा रिलीज होणारा सिनेमा बघणे टाळायचे हि वस्तुस्थिती आहे किंवा विनोदी नटांचे नेमके तेच होते, मेहमूद राजू श्रीवास्तव जॉनी लिव्हर कपिल शर्मा यांचे जे झाले म्हणजे पुढे पुढे त्यांचे तेच ते रटाळ विनोद सुरु झाले कि प्रेक्षक लघवीला बाहेर पडायचे, आता तेच समीर चौगुले याचे होते आहे म्हणजे चौगुले दिसला कि मी टीव्ही बंद करतो. माझे फडणवीसांबाबत नेमके तेच झाले आहे म्हणजे दररोज न चुकता चार दोन वेळा फडणवीस दिवसभरात दरक्षणी काय करताहेत याची आम्हा काही मोजक्या पत्रकारांना माहिती येते, देवेंद्र फडणवीस अपडेट्स या ग्रुपवर ती माहिती पाठविल्या जाते, मी ती वाचणे यासाठी बंद केले आहे कारण त्यांचे दिवसभरातल्या कामांचे केवळ अपडेट्स वाचून देखील माझी छाती दडपते, सतत वाचत बसलो तर मला कदाचित हृदयविकाराचा झटका येईल, म्हणजे केवळ माहिती वाचून जर माझी छाती दडपत असेल तर जे फडणवीस त्या कामांचे निर्णय घेतात पूर्तता करतात त्यांना केवढे दडपण असेल पण हा सारा त्यांच्या पाठीशी असलेला म्हणाल तर दैवी चमत्कार म्हणाल तर जनतेचे आईवडिलांचे थोर मोठ्याचे मनापासून आशीर्वाद. एक गोपनीय माहिती येथे उघड करतो, 2047 पर्यंत आपल्याला सक्रिय राजकारणात समाजसेवेत देशसेवेत व्रतस्थ म्हणूनच जगायचे आहे हे त्यांनी ठरविलेले असल्याने 2047 पर्यंत देशासाठी आजतरी राज्यासाठी नेमके काय करायचे त्यावर आराखडा त्यांचा तयार आहे आणि त्यांच्या पक्षाची राज्याची त्यांच्या मतदार संघाची कुठली कामे उरकायची हे त्यांनी प्रदेशाध्यक्ष असल्यापासूनच तसे ठरविले असून अगदी तेव्हापासून त्यांचे 2047 पर्यंतच्या आराखड्यावर सतत काम सुरु असते त्यासाठी त्यांची इतरांना फारशी परिचित नसलेली डिव्होटी टीम सतत मेहनत घेत असते जे आजतागायत कुठल्याही नेत्याने यापद्धतीने प्लॅनिंग केल्याचे निदान मला तरी आठवत नाही….
नामदार आशिष शेलारांना निदान मुंबई महापालिका निवडणुका आटोपेपर्यंत मुंबई भाजपाध्यक्ष म्हणून बदलायचे नव्हते असा एक सूर भाजपामध्ये सतत कानावर पडतो आहे कारण शेलारांना मुंबईतल्या राजकीय वातावरणाची महापालिकेच्या कार्यपद्धतीची जेवढी सखोल माहिती आहे….तेवढी नक्कीच इतर कोणत्याही नेत्याला नाही ….त्यातूनच शेलार अगदी सुरुवातीपासून त्या त्या वेळेच्या विशेषतः शिवसेनेला आणि इतरही विरोधकांना पुरून उरले त्यांच्यामुळे बहुतेकवेळा भाजपाचा वरचश्मा तुम्हाआम्हाला महापालिकेत बघायला मिळाला. शिवसेना सत्तेत असतांना मुंबई महापालिकेतल्या आर्थिक भानगडी त्यांनी वेळोवेळी चव्हाट्यावर आणल्या ज्या आजही आमच्या हुबेहूब लक्षात आहेत मग त्यांची ऐनवेळी उचलबांगडी का तर हे त्यांची हकालपट्टी नाही याउलट त्यांनीच आपणहून ती जबाबदारी झटकली आहे…त्याजागी स्वतः दिल्लीत वजन खर्च करून त्यांचे फॉलोअर आमदार अमित साटम यांची मुंबई भाजपा अध्यक्ष म्हणून नेमणूक करवून घेतली आहे वास्तविक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मनात दुसरी दोन नावे प्राधान्याने होती पण यश शेलारांच्या पदरी पडले. एक मात्र नक्की यापूर्वी आमदारकी पलीकडे फारसे माहित नसलेले अमित साटम यांच्यासाठी तोंडावर आलेली महापालिका निवडणूक फार मोठे आव्हान आहे पण भलेहि मुंबईकरांच्या पसंतीला साटम एक नेतृत्व म्हणून कच्चे लिंबू असतील पण शेलारांच्या तोडीस तोड महापालिकेत जर कोणी अभ्यासू प्रसंगी वादग्रस्त पण जबरदस्त आणि महापालिका भोंगळ ओंगळ भ्रष्ट कारभाराचा माहितगार नेता कोणी भाजपात असेल तर ते एकमेव आमदार अमित साटम, त्यातूनच शेलार यांनी त्यांच्या पक्षाच्या मान्यवर आणि प्रभावी नेत्यांशी पंगा घेत साटम यांना हे बक्षीस मिळवून दिलेले आहे. बघूया साटम काय दिवे लावतात ते…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी