महायुती सरकार : वादळापूर्वीची शांतता
कि शांततेपूर्वीचे वादळ :
किस्सा अमरावतीचा आहे ओळखीच्या दोन वेगवेगळ्या तरुणींचा, नावे घेत नाही पण ती अगदी सहजच तुमच्या लक्षात येतील. त्या दोघी ऐन तारुण्यात विधवा झाल्या त्यातली एक चाणाक्ष चतुर दूरदर्शी होती, वर्षभरात ती दुःख विसरली उत्तम स्थळ बघून तिने पुनर्विवाह केला आता तिला वयाच्या पन्नाशीत दोन दोन मुले आहेत ती संसारात रमली आहे. दुसरीने वैधव्य आल्यानंतर सहज शक्य असतांना लग्न केले नाही वय निघून गेले एकटेपण तिला स्वस्थ बसू देईना, तिकडे समाजकार्य इकडे मुंबईत आल्यानंतर विविध वाईट सवयींयुक्त तारुण्याचा बिनधास्त उपभोग, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघात आणि त्या विधवा झालेल्या दोन्हीं तरुणींच्या निर्णयात किंचितही फरक नाही. जेव्हा शिंदेंनी अलगद फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद हिसकावून आपल्याकडे घेतले, आज जी प्रचंड अस्वस्थता शिंदेंना सतावते आहे तेच त्यावेळी फडणवीसांचे हाल, निदान आम्ही तरी सुरुवातीचे काही दिवस अगदी जवळून बघितले आहेत, अनेकदा असा भास व्हायचा कि फडणवीस राजीनामा देऊन नागपूर किंवा दिल्लीला कायमचे निघून जातात कि काय, पण तो साऱ्यांचाच केवळ एक भ्रम ठरला, पुढल्या काहीच महिन्यात अगदी पूर्वीच्या उत्साहात फडणवीस कामाला लागले, शिंदेंच्या कामात कोणतीही ढवळाढवळ न करता आपली रेषा त्यांनी एवढी मोठी केली कि वरचढ कोण, शिंदे कि फडणवीस हे कळेनासे झाले, नेमकी हीच वेळ पुढे शिंदेंवर आली आणि त्यांच्याकडूनही तीच अपेक्षा होती कि अस्वस्थ अशांत न होता मार्ग काढून नेतृत्वात फडणवीसांच्या आसपास निदान त्यांनी असावे याची पण त्या दुसऱ्या विधवेसारखे शिंदे आजही सैरभैर होत अस्वस्थपणे इकडून तिकडे तिकडून इकडे केवळ येरझऱ्या घालताहेत, उत्तम नेतृत्वातले बापबेटे सारखे धडपडतांना पडतांना दिसताहेत….
www.vikrantjoshi.com
शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर चेहऱ्यावर कुठलाही राग द्वेष स्पर्धा त्रागा न दाखवता देवेंद्र यांनी शिंदेंचे मोठेपण मान्य केले आणि त्यांच्या हाताखाली काम करताना कुठेही शिंदे अपमानित होतील अस्थिर होतील असे वर्तन त्यांचे कुठेही कधीही दिसले नाही किंबहुना आपली कामे काढून घेण्यासाठी काही मान्यवर नेते उगाचच सहानुभूती मिळविण्या फडणवीसांकडे शिंदेंच्या चुकांचा पुराव्यांचा पाढा आपणहून वाचायचे पण तशी सुरुवात झाली कि क्षणार्धात देवेंद्र विषय बदलवून मोकळे व्हायचे. एकनाथ शिंदेंना त्यांच्या स्वभावातल्या अनेक गंभीर त्रुटी नडताहेत म्हणजे ज्या आनंद दिघेंना ते फॉलो करतात तो काळ वेगळा होता शिवाय दिघेंना ना कुटुंबाची आसक्ती होती ना त्यांना सत्तेत रमायचे होते त्यामुळे हा फकीर खिसे उपडे होईपर्यंत लोकांना आर्थिक मदत करून मोकळा व्हायचा, तो फकीर होता यांना सत्तेत राहायचे आहे पण आपण कसे पद्धतशीर लुबाडल्या जातोय हे शिंदेंच्या आजही लक्षात येत नाही, अगदी काल परवा त्यांच्या नावाचा मोठा गैरफायदा घेणाऱ्या त्यांच्या जवळच्या दोन नातेवाईकांची नावे मी त्याना आपणहून फोनवर पाठविली आहेत असे कितीतरी, कर्जाचा डोंगर फेडणे शिंदेंसमोर आज याक्षणी मोठे आव्हान आहे आणि नातेवाईक जवळचे नेते जमा झालेले दलाल सभोवताली ठाण मांडून बसलेले मीडियातले, मित्र, व्यापारी, बेरकी अधिकारी, जो त्यांच्या जवळचा मानला गणला जातो त्यातला प्रत्येक वरून पक्षाचे नेते पदाधिकारी त्यांचे मंत्री आमदार खासदार असा एकही माणूस माझ्या यादीत नाही ज्याला अगदी निरपेक्षपणे शिंदेंना मोठे करण्या सहभागी व्हायचे आहे शिंदेंची मनोभावे सेवा करायची आहे, ज्याला त्याला फक्त आणि फक्त शिंदेंना लुबाडायचे आहे बदनाम करायचे आहे त्यांचा आणि त्यांच्या शिवसेनेचा सत्यानाश करायचा आहे, शिंदेंच्या दिवसभरातल्या नेतृत्वातले कार्य व मोठेपण सांगणारा त्यांच्या भोवताली एकही नाही आणि आजच कित्येक मान्यवर कुंपणावर बसून आहेत जे कुठल्यही क्षणी त्यांना बाय बाय टाटा करून मोकळे होतील….
शिंदे मुख्यमंत्री असतांना दरक्षणी जी साद व साथ फडणवीसांनी त्यांना दिली आज नेमके तेच करायचे सोडून शिंदे विनाकारण सैरभैर होतांना दिसताहेत ज्यातून त्यांचे नक्कीच मोठे राजकीय नुकसान होईल आणि संघटनेतला एक उत्तम नेता पायावर धोंडा पाडून घेईल. त्या दोघात समन्वय साधणार्या मध्यस्थाची आज या क्षणाला फार मोठी गरज आहे पण त्याची लाज कोणालाही वाटत नाही किंबहुना असा प्रयत्न जर एखाद्याने केला तर समजून घ्यायचे कि त्याला फडणवीस किंवा शिंदेंकडून स्वतःचे मोठे काम काढून घ्यायचे आहे. या शिंदेंचे भले करणारा एखादा तरी मान्यवर पुढे यावा, शिंदे उत्तम पुरुष आहे…
क्रमश: पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी