सुषमा अंधारातून उजेडाकडे :
अलीकडे शिवसेना उद्धव नेत्या सुषमा अंधारे अंजली दमानिया यांना म्हणाल्या कि सतत प्रकाशझोतात राहण्याची त्यांची सवय त्यातून त्या ट्विट करीत माझ्यावर घसरल्या, हे सुषमा यांनी अंजली यांना म्हणणे, मला उगाचच हिंदी सिनेमातले काही डायलॉग्स आठवले, जिनके अपने घर सिसेके हो वो दुसरे के घर पे पत्थर नही मारा करते किंवा एक चोर दुसरे चोर के घर चोरी नही करता…अर्थात अंजली जे म्हणाल्या ते वावगे नाही किंवा त्यात फारसे चूक नाही, हे खरे आहे कि उद्धव यांची आजची अवस्था शोले सिनेमातल्या संजीव कुमार सारखी झालेली आहे, सिनेमातल्या त्या जेलरचे घर मुले नातवंडे सुनांनी भरलेले असते पण गब्बर सिंग तुरुंगातून बाहेर येतो आणि संजीवकुमारचे अख्खे कुटुंब तो आणि सून जया भादुरी सोडून बेचिराख करतो, बदला घेण्यासाठी हात कापलेला संजीव कुमार जसा एकटा हताश मनाने उद्विग्न होत मागे उरतो तेच हुबेहूब आज फारतर उद्या उद्धव ठाकरे यांचे आज झाले आहे किंवा होणार आहे, संजीवकुमार बदला घेतो, उद्धव यांना विरोधकांचा संजीव कुमार पद्धतीने बदला घेणे यासाठी शक्य होणार नाही कारण सिनेमात संजीवकुमारची चूक नसते आणि उद्धव यांची पावलोपावली झालेली चूक त्यांना यापुढे मान वर काढू देईल दूरदूरपर्यंत अजिबात वाटत नाही. अनेक बहुसंख्य त्यांना सोडून गेले आणखी काही जातील आणि शेवटी संजीवकुमार सारखे फक्त उद्धव नवरा बायको फारतर पोटची मुले त्यांच्या सोबतीने अखेरपर्यंत थांबतील…
www.vikrantjoshi.com
दुबईचे जे सत्तेतले शेख असतात राजे असतात त्यांचे महाल बघण्यासारखे असतात, जसे मुंबईतल्या वादग्रस्त वाममार्गी अति श्रीमंतांकडे बाउंसर्स पाळलेले असतात तसे हे शेख आपल्या महालात वाघांना पाळतात अनेकदा जेव्हा त्यांच्यादृष्टीने एखादा विरोधक किंवा संशयास्पद त्यांना भेटायला जातो तेव्हा हे वाघ मुद्दाम मोकळे सोडले जातात जेणेकरून विरोधकांच्या किंवा भेटायला येणाऱ्यांना धडकी भरावी किंवा आपल्याकडे काही नेते जसे आक्रमक शिकारी कुत्रे सभोवताली त्या रामदास कदम पद्धतीने बांधून लोकांना भेटतात, उभे असलेले हलकट पैलवान बाउंसर्स तुमच्याकडे जसे खाउ का ते गिळू नजरेने बघत असतात तसे अलीकडे बहुतेक साऱ्याच राजकीय पक्षातून पाहायला मिळते, टॉपमोस्ट नेत्याला फारसे विरोधकांना अंगावर घेण्याची वेळ येता कामा नये त्यातून जे दुसऱ्या तिसऱ्या फळीतले नेते अंगावर सोडले जातात विरोधकांना आपल्या वागण्या बोलण्यातून भाषणातून सळो कि पळो करून सोडतात त्यात जसे अनेक आहेत साऱ्याच पक्षात आहेत जे तुम्हाला माहित आहेत त्यातल्याच एक सुषमा अंधारे गेल्या काही वर्षांपासून शेख उद्धव यांच्यासाठी वाघिणीच्या भूमिकेतून त्या वावरत होत्या, उद्धव आणि सुषमा दोघांनाही त्यातून मोठे राजकीय फायदे झाले जसे विविध फायदे संजय राऊत यांनी आपल्यासहित कुटुंबाचे करवून घेतले. मात्र जे एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर इतर अनेक नेत्यांचे झाले म्हणजे त्यांनी जसे एकाकी पडत चाललेल्या उद्धव ठाकरेंना सोडले त्याच वळणावर आता सुषमा अंधारे आहेत हे एव्हाना तुम्हा साऱ्यांचा ठाऊक झाले आहे. उद्धव यांच्या शिवसेनेत जाण्यापूर्वी नाही म्हणायला अगदी मनापासून सुषमा यांना त्यावेळेच्या एकसंघ राष्ट्रवादीत जायचे होते पण पवारांच्या ज्या पुणे जिल्ह्यातल्या नेत्यांनी सुषमा यांच्या प्रवेशाला थेट शरद पवारांना घेऊ नका सांगितले ज्यात स्वतः अजित पवार होते, आज राजकीय परिस्थिती एवढी अचानक बदलली आहे कि आता त्याच अजितदादांना सुषमा आपल्या राष्ट्रवादीत हव्या आहेत, त्या दोघांचे त्यादृष्टीने बोलणे व भेटीगाठी सुरु आहेत, वास्तविक सुषमा यांना एकनाथ यांची शिवसेना अधिक सोयीची आहे सुषमा यांचे त्यावर सांगणे असे कि कोल्हेकुई करणाऱ्यांना वाघीण आपल्या बॉसच्या सभोवताली नको असते, म्हणून त्यांना एकनाथांच्या सेनेत जाण्याचा विचार नाईलाजाने बाजूला ठेवावा लागला त्यानंतर त्यांची सेकंड चॉईस अर्थात अजित पवारांचा पक्ष असल्याने, कोणत्याही क्षणी अंधारे यांचे पक्षांतर आणि राष्ट्रवादी पक्ष प्रवेश हे नक्की झालेले आहे. आधी सुषमा अंधारे आणि नंतर प्रियांका चतुर्वेदी कि दोघी एकमेकांचे हात धरून एकाचवेळी दादांकडे धाव, बघूया नेमक्या राजकीय हालचाली आणि घडामोडी कोणत्या दिशेने वाटचाल करणार आहेत…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी